Poem on Army in Marathi

सुंदर कविता . भारतीय सैनिकांना समर्पित .

☞ बाबा बघा ना..दिवाळी आलीय ☜

देशासाठी सिमेवर लढताना
शहीद झाले तुम्ही,
तुमच्या या विरमरणाने
मात्र पोरके झालो आम्ही.
तुमच्या शिवाय ऐन सणासुदित
घरावर अवकळा पसरलीय.
बाबा...बघा ना दिवाळी आलीय. ॥ धृ ॥

सांगितले होते तुम्ही
या दिवाळीला सुट्टी घेइंन,
माझ्या साठी फटाके
अन् चिंगीला कपडे आणीन.
वाट बघतोय तुमची आम्ही
खोटिच आशा लागलीय.
बाबा..बघा ना दिवाळी आलीय. ॥ १ ॥

दररोज आजुबाजुचा परिसर
रोशनाइने उजळतोय,
आपल्या घरी मात्र फक्त
तुमच्या फोटो पुढील दीवा मिण मिंणतोय.
तुमच्या नसण्याने आमची
दिवाळी अंधारमय झालीय.
बाबा..बघा ना दिवाळी आलीय. ॥ २ ॥

सुवासिनी त्या नटून-थटून
नववस्त्रानी सजत आहेत,
आईचे मात्र आमच्या दरोज
साड्यांचे पदर भीजत आहेत.
बिना रंगोळीच्या आपल्या अंगणा सारखी,
तिच्या कपाळाची भग्न दशा झालीय.
बाबा..बघा ना दिवाळी आलीय. ॥ ३ ॥

ते आजी-आजोबा सतत
चष्म्या आडुन अश्रु गाळतात,
विचारल्यावर त्याना 'धुर झोम्बतोय फटाक्यांचा'
असा खोटा बहाणा करतात.
न झोप त्यांच्या नयनाना
हुन्दक्यानी मात्र छाती घेरलीय.
बाबा..बघा ना दिवाळी आलीय. ॥ ४ ॥

भाउबीजेला तुम्ही नऊवारी घेऊन,
आत्या कड़े जाणार होता,
मिठाई ची भेट देऊन मग
ओवाळून घेणार होता.
अशी कशी तिच्या आरतीवर
दैवान फुंकर मारलीय.
बाबा..बघा ना दिवाळी आलीय. ॥ ५ ॥

आता मी ठरवलंय...
तुमच्या सारखाच मीही सैनिक होईन...
देशासाठी सिमेवर लढाईस जाइन..
दुष्मनावर विजय मिळविंन..
तेव्हाच मिठाई वाटेन,
तेव्हाच फटाके फोडेन.
बाबा..बघा ना दिवाळी आलीय . ॥ ६ ॥

आणि माझ्या स्वागताला
घरात रोशनाई असेल.
दारात रंगोळी असेल..
आईच्या हाती आरती असेल..
तीच आम्हा सर्वांची दिवाळी असेल. ॥ ७ ॥

कवी अनामिक मित्र ( कमलेश )
=================

करोडो जनता सुखी राहावी

म्हणून लढतो आहे तो सैनिक ।

हसत खेळत आपण राहावे

म्हणून लढतो आहे तो सैनिक,

म्हणून लढतो आहे तो सैनिक।।


चूभलेत काटे कितीतरी,

तरी उभा आहे तो सीमेवर्ती ।

जनतेच्या रक्षणासाठी मात्र तो

विसरलाय स्वतःचीच मूर्ती ।।

म्हणून लढतो आहे तो सैनिक ।।।


रणांगणात उभे राहूनि

वाहिलेत तू रक्त देशासाठी,

माझा नमस्कार तुझ्या

शौर्य अशा कार्यासाठी ।

तिरंगा हातात घेऊनि

रोवला तू हिमालयावर्ती,

आहे तू जोवर उभा

आस नाही येणार कधी देशावर्ती ।।

म्हणून लढतो आहे तो सैनिक ।।।



तुझ्या कर्तृत्वाची आम्हास आहे जाण ,

तुझ्यावर आमची भिस्त तूच आमची आन-बाण-शान ।

सुखी राहावी आई धरती म्हणून

घेऊनि बंदूक दुष्मनांना पडवले तू कित्येक दा माघारी ।

असशील तू अजरामर नेहमी

कारण तुझ्यामुळेच नेहमी आम्हाला बघायला मिळते

दुनिया ही न्यारी ।।

म्हणून लढतो आहे तो सैनिक ।।।


छातीवर्ती घेतल्यात तू गोळ्या देशाच्या विजयासाठी,

तुझ्या बलिदानाची जान ठेवून लढू आम्ही सत्कर्मासाठी ।

कीर्ती तुझी महान आहे तू आहेस अमर ,

मानवंदना आमची तुला तुझ्या प्रत्येक कार्यासाठी ।।


सरते शेवटी एवढेच म्हणेल, सुखाच्या सागरात जनता जगावी,

म्हणून लढतो आहे तो सैनिक, म्हणून लढतो आहे तो सैनिक ।।।
=====================


sainik quotes in marathi
essay on sainik in marathi
sainik par kavita
shetkari kavita
marathi kavita
navy poem in hindi
poem on army wife in hindi
sainik par poem in hindi
sainik geet in marathi
sainik ki chitthi poem lyrics
short poem on indian army soldiers in marathi
5 lines on soldier in marathi
bharat desawar marathi kavita
sainik shayari in marathi
maze nav chinch poem
marathi kavita on indian army
poem in marathi on soldier
army quotes in marathi
essay on my soldier in marathi
short poem on india in marathi
emotional poem on indian army in hindi
hindi poem on veer jawan
poem on indian army soldiers
poem on veer sainik in hindi
poem on soldiers sacrifice in english
poem on fauji in hindi

No comments:

Post a Comment