Marathi Shabdkosh - कालबाह्य होत चाललेले शब्द
फर्निचर हा शब्द आपण वापरतो याचा मराठी शब्द सुचवा
झिरमिळ्या ….. konala mahit ahe ka yacha arth?
विजार(पॅन्ट),सदरा(शर्ट),पातळ(पाच वारी साडी), लुगडं(नऊ वारी साडी) पोलकं(ब्लाऊस) कपडे इंग्रजाळले आणि त्यामुळे भाषा.
म्होर (समोर), कालवन (भाजी), फरताळ (भिंतीतला कप्पा), देऊळी (दिवा ठेवण्यासाठी त्रिकोणी आकाराचा भिंतीतला कप्पा)
उपटसुंभ : काहीही काम नसलेला रिकामटेकडा मनुष्य,
भटकभवानी : अर्थ तोच फक्त स्रीबद्दल वापरला जाणारा शब्द,
आडदांड : खूप मोठे किंवा जास्त जागा व्यापणारे,
बोंबलभिक्या : सर्वत्र आरडाओरड करून सांगणारा,
फुलपात्र : पाणी पिण्यासाठी वापरात येणारे काठ असलेले लहान भांडे,
पान : जेवणाचे ताट याअर्थी,
गावडंका : खूप मोठ्याने असलेले बोलणे,
चहाड्या : कुचाळक्या अर्थात एखाद्याविषयी दुसऱ्याजवळ वाईट बोलणे,
गब्दुल्ला / गब्दुल्ली : गोबऱ्या गालांचा / गोबऱ्या गालांची,
गधडा / गधडी : लाडाने संबोधण्यात येणारा शब्द,
लडदा : आगाऊपणाने वागणारा मनुष्य,
शिंच्या / व्हण्ण्या : पूर्वी वापरल्या जाणाऱ्या सभ्य शिव्या.!
बारी म्हणजे खिडकी. बारी म्हणजे खेळातील डाव, chance,
चिनखाडणे - रेघोट्या मारणे
पाप्याचं पितर आम्ही अजूनही वापरतो 😂
ढापण्या (चष्मे वाला)
कोरड्यास म्हणजे (कालवन,आमटी, पातळ भाजी) कोरड्यास हा शब्द माझी आजी वापरायची आजीला मी विचारलं कोरड्यास का म्हणतेस काय अर्थ आहे तेव्हा आजी म्हणाली आपली भाकर कोरडी असते भाकरीबरोबर खाणाऱ्या कालवणाला कोरड्यास म्हणतात
फतकल , झिपरी, खत्रुड उलीसं, तापद्रा,आलबेल, आंदण, बेंटकुळी
परसाकडे जाणे(शौचास जाणे), वाईलं(वेगळा), उलीसा(थोडा), सई करणे(आठवण काढणे), वाढुळ (खूप वेळ), फदकाल मांडून बसणे, सांच्याला ( संध्याकाळी), इरीवारी (नेहमीच्या इतर दिवशी),
१ 'कोरड्यास'- जेवणातील कोरडी भाजी, २ 'पातळ'- नऊवारी साडी, ३ 'परसाकडे जाणे'- शी ला जाणे (go to Toilet), ४ 'विसान/ इसान' - आंघोळीच्या गरम पाण्यात घालावे लागणारे गार पाणी.
चाकी = गोळी/candy
गंजिफराक- पूर्वीच्या काळी पुरुषांच्या वापरायचे एक प्रकारचे बनियन सारखे पण लांब बाही, अंगाभोवती गुंडाळून पुढे बांधायचे वस्त्र
सोक पडणे - खूप तहान लागणे... रवकांडा - म्हणजे भला मोठा(उदा. मोठा बटाटा).... धिबिडका - म्हणजे एकत्र जमलेल्या माणसांचा गोंधळ.... काचकुच - म्हणजे कमी देणे( जेवण वाढताना काचकुच करू नये पोटभर वाढावं).... आकरित - म्हणजे विपरीत... अधाशी- म्हणजे ज्याला खायला मिळतं तरी ना मिळाल्या सारखा खातो तो... आक्षी - म्हणजे अगदी....
भानशिरां (मालवणी) गरम पातले उचलण्यासाठी वारला जाणारा कपडा...!
लंगोट(diaper), आंगड(shirt), टोपडं(topi), लुगडं(saree). माझ्या व्यवसायातील कमी वापरातील शब्द.
तुमका-तुम्हाला, आमका-आम्हाला, हयसर/हय-ईथे, थयसर/थय-तिथे, खयसर/खय-कुठे, झिल-मुलगा, बायेल-बायको, घो-नवरा, बापुस्-वडील, आऊस-आई, चेडू-मुलगी, रे-अरे, गो-अग, अगे/गे=अग(आदरार्थी), कित्या-कशाला, कोणाक-कोणाला, ह्याका-ह्याला, त्याका-त्याला, आसा-आहे, वायच-थोडेसं, ईले-आले, नजा - अशक्तपणा, न्हीम्बार - ऊन, आडाळो - विळी, भानशेरां - फडकं (स्वयंपाक घरात वापरण्यासाठी असलेले), चिटकी - गवार, सार - आमटी, काविलता-उलातणं,
सुबक ठेंगणी, ढिम्म, सांत्वन, अंबाडा, विचका, फडशा... खूप सारे शब्द, खरे तर पुण्यानंतर रिक्षा चालक सुध्दा मराठी बोलत नाहीत, सांगावं लागतं अरे मराठी आहेस तर मराठी बोलत बाबा
पायरव : चाहूल / पायांचा आवाज
माणिकहिंदाण्या ... कधीही काहीही विचारले तर नाही म्हणणारा (मुख्यतः जेवणा किंवा खण्याबद्दल विचारल्यावर). हा शब्द वऱ्हाडाात/विदर्भात प्रचलित असायचा'
फोफसा आम्ही आज पण वापरतो.. नांदेड
बैजवार जा ( सावकाश जा )
आमचे आजोबा होते ते उलटी ला वांती म्हणायचे ताटाला ताम्हण, आणि अजूनही मोडी मध्येच लिहायचं आणि ती यादी नेहेमीच्या वाणसामानाच्या दुकानात त्यांना पण समजायची
No comments:
Post a Comment