The Bharatiya
July 26, 2020
मित्रांनो ही कविता जे वाडीत किंवा चाळीत राहीले असेल त्यांना नक्कीच जवळची वाटणार
शेवटी ते माझ्याशी सहमत होणार
शीर्षक
चाळीची मजा कधीच टॉवर ला नाही येणार...
छोटीशी घर आमची पण नेहमी भरलेली असणार...
सावंत काकूंच्या मटणाची वाटी देसाई मामीच्या घरा पर्यंत पोहोंचणार...
हमेशा कवाड उघडीच आमची, कधी टाळ नाही लावणार...
चाळीची मजा कधीच टॉवरला नाही येणार...
सण साजरी करायला माणसाची कमतरता कधीच नाही भासणार...
मयतीला आणि लग्नाला
नातेवाईकांपेक्षा हीच जास्त दिसणार...
चाळीची मजा कधीच टॉवरला नाही येणार...
अब्दुलचां शिरकुरमा आवडीने जोशी ही खाणार...
परेराच्या ख्रिसमस पार्टीला शर्माही येणार...
गणपती असो रेडकरांचा इथे कांबळे ही नाचणार...
चाळीची मजा कधीच टॉवर ला नाही येणार...
गावडेंच्या पोरीला जाधवांनी ओरडल तरी चालणार...
पक्याच्या बाबांना हॉस्पिटलला पूर्ण चाळच नेणार...
पैश्याची गरज भासली तर
तांदळाची डब्बी सगळ्यांची उघडणार...
चाळीची मजा कधीच टॉवरला नाही येणार...
करोडोंची फ्लॅट तुमचे माणसांना किंमत कधी देणार...
गगनचुंबी इमारतीवरून खाली तर किडेच दिसणार...
मरून पडले घरात तर कोणीच नाही बघणार...
बंद दरवाजा सारखे
मन ही का बंदच ठेवणार?...
चाळीची मजा कधीच टॉवर ला नाही येणार...
स्वतः च्या कमीशन साठी
दलाल (नेते मंडळी)
आमची चाळ तोडणार...
Development च्या नावा खाली आणखी एक टॉवर उद्या उभारणार...
देवच जाणे माणसातल नातं किती दिवस टिकवणार...
चाळीची मजा कधीच टॉवर ला नाही येणार...
सहमत झालाच असाल