Sunday, November 26, 2023

मुंजीच्या हळद घाणा ओव्या | munjichya jatyavarchya ovya | घाण्याच्या ओव्या

 घाणा भारिवेला । विडा ठेविवेला । आधी नमिवेला । गणराजे || 1 ||

आरंभिले कार्य । वडिलांचे बुद्धी 1 गणेशान सिद्धी । पोचवावे ॥ २ ||

आयच्या घरी कार्य । गणराज तुम्ही यावे । मांडवी रहावे । चारी दिवस || ३ ।।

ग्रणेश गणपती 1 गुळाचे लिंपन । जे मनी कल्पीन । सिद्धी जावो || ४ ||

आधी मूळ धाडा । चिपळूण गावां । परशुराम देवा । आमंत्रण || ५ ||

आधी मूळ धाडा । दूर कुळीचिये । आम्हां कुळीचिये ।


आईदेवी (महालक्ष्मी) || ६||

घाणा भारिवेला । खंडिये भाताचा । भारीये गोताचा । गणराज ||७ ।॥।

घाणा मूळ धाडा । घुंगरांची गाडी । शालजोडीचा वऱ्हाडी । गणराज 1॥ ८ ।।

मांडवाला मेढी । काढाव्या ठेंगण्या । बहिणी चांदण्या । तुझ्या ||९||

घाणा भारियेला । अह्योनी सह्योनी । बत्तीस लक्षणी । कांडियला ||9०||

हळद कुटितां । मुसळे घुमती । शिगोळ्या साजती । तुला ||११||

थिंती सारवूनी । वरी काढिले ताह्यन । तुझ्या मुंजीचे सामान । बाळा ||१२1

ओल्या हळदीचे । वाळवण दारी । केळवण घरी । बाळा तुझे ||१३||

आठ वर्षाचा गं । मुंजा हा लहान । कडे घेती ब्राह्मण । तुला ||१४||

आठ वर्षाचा हा मुंजा । मुंजीची काय घाई । वाटते हौस । तुला ||१५||

मुंज आरंभिली । गिरेश्वरा घाला पत्र । शतायुषी तुझा पुत्र । बाई ||१६||

जात्यावरच्या ओव्या मराठी /घाण्याच्या ओव्या / Jatyavarchya Ovya

No comments:

Post a Comment