Marathi Shabdkosh - कालबाह्य होत चाललेले शब्द

 फर्निचर हा शब्द आपण वापरतो याचा मराठी शब्द सुचवा

झिरमिळ्या ….. konala mahit ahe ka yacha arth?

विजार(पॅन्ट),सदरा(शर्ट),पातळ(पाच वारी साडी), लुगडं(नऊ वारी साडी) पोलकं(ब्लाऊस) कपडे इंग्रजाळले आणि त्यामुळे भाषा.

म्होर (समोर), कालवन (भाजी), फरताळ (भिंतीतला कप्पा), देऊळी (दिवा ठेवण्यासाठी त्रिकोणी आकाराचा भिंतीतला कप्पा)

उपटसुंभ : काहीही काम नसलेला रिकामटेकडा मनुष्य, 

भटकभवानी : अर्थ तोच फक्त स्रीबद्दल वापरला जाणारा शब्द, 

आडदांड : खूप मोठे किंवा जास्त जागा व्यापणारे, 

बोंबलभिक्या : सर्वत्र आरडाओरड करून सांगणारा, 

फुलपात्र : पाणी पिण्यासाठी वापरात येणारे काठ असलेले लहान भांडे, 

पान : जेवणाचे ताट याअर्थी, 

गावडंका : खूप मोठ्याने असलेले बोलणे, 

चहाड्या : कुचाळक्या अर्थात एखाद्याविषयी दुसऱ्याजवळ वाईट बोलणे, 

गब्दुल्ला / गब्दुल्ली : गोबऱ्या गालांचा / गोबऱ्या गालांची, 

गधडा / गधडी : लाडाने संबोधण्यात येणारा शब्द, 

लडदा : आगाऊपणाने वागणारा मनुष्य, 

शिंच्या / व्हण्ण्या : पूर्वी वापरल्या जाणाऱ्या सभ्य शिव्या.!

बारी म्हणजे खिडकी. बारी म्हणजे खेळातील डाव, chance,

चिनखाडणे - रेघोट्या मारणे

पाप्याचं पितर आम्ही अजूनही वापरतो 😂

माझे बाबा अजूनही काही जुने शब्द वापरतात. जसे दरवाजा ला कावड, शोधणे झांबलणे, घमेली म्हणजे धान्य किंवा काही वस्तू ठेवायला वापरला जाणारा मोठा कटोरा.

ढापण्या (चष्मे वाला)

कोरड्यास म्हणजे (कालवन,आमटी, पातळ भाजी) कोरड्यास हा शब्द माझी आजी वापरायची आजीला मी विचारलं कोरड्यास का म्हणतेस काय अर्थ आहे तेव्हा आजी म्हणाली आपली भाकर कोरडी असते भाकरीबरोबर खाणाऱ्या कालवणाला कोरड्यास म्हणतात

दळभद्रीपणा,कंगाल,नाचक्की
ऐतवार - रविवार.
फतकल , झिपरी, खत्रुड उलीसं, तापद्रा,आलबेल, आंदण, बेंटकुळी
परसाकडे जाणे(शौचास जाणे), वाईलं(वेगळा), उलीसा(थोडा), सई करणे(आठवण काढणे), वाढुळ (खूप वेळ), फदकाल मांडून बसणे, सांच्याला ( संध्याकाळी), इरीवारी (नेहमीच्या इतर दिवशी),
१ 'कोरड्यास'- जेवणातील कोरडी भाजी, २ 'पातळ'- नऊवारी साडी, ३ 'परसाकडे जाणे'- शी ला जाणे (go to Toilet), ४ 'विसान/ इसान' - आंघोळीच्या गरम पाण्यात घालावे लागणारे गार पाणी.
चाकी = गोळी/candy
गंजिफराक- पूर्वीच्या काळी पुरुषांच्या वापरायचे एक प्रकारचे बनियन सारखे पण लांब बाही, अंगाभोवती गुंडाळून पुढे बांधायचे वस्त्र
सोक पडणे - खूप तहान लागणे... रवकांडा - म्हणजे भला मोठा(उदा. मोठा बटाटा).... धिबिडका - म्हणजे एकत्र जमलेल्या माणसांचा गोंधळ.... काचकुच - म्हणजे कमी देणे( जेवण वाढताना काचकुच करू नये पोटभर वाढावं).... आकरित - म्हणजे विपरीत... अधाशी- म्हणजे ज्याला खायला मिळतं तरी ना मिळाल्या सारखा खातो तो... आक्षी - म्हणजे अगदी....
भानशिरां (मालवणी) गरम पातले उचलण्यासाठी वारला जाणारा कपडा...!
लंगोट(diaper), आंगड(shirt), टोपडं(topi), लुगडं(saree). माझ्या व्यवसायातील कमी वापरातील शब्द.
तुमका-तुम्हाला, आमका-आम्हाला, हयसर/हय-ईथे, थयसर/थय-तिथे, खयसर/खय-कुठे, झिल-मुलगा, बायेल-बायको, घो-नवरा, बापुस्-वडील, आऊस-आई, चेडू-मुलगी, रे-अरे, गो-अग, अगे/गे=अग(आदरार्थी), कित्या-कशाला, कोणाक-कोणाला, ह्याका-ह्याला, त्याका-त्याला, आसा-आहे, वायच-थोडेसं, ईले-आले, नजा - अशक्तपणा, न्हीम्बार - ऊन, आडाळो - विळी, भानशेरां - फडकं (स्वयंपाक घरात वापरण्यासाठी असलेले), चिटकी - गवार, सार - आमटी, काविलता-उलातणं,
सुबक ठेंगणी, ढिम्म, सांत्वन, अंबाडा, विचका, फडशा... खूप सारे शब्द, खरे तर पुण्यानंतर रिक्षा चालक सुध्दा मराठी बोलत नाहीत, सांगावं लागतं अरे मराठी आहेस तर मराठी बोलत बाबा
पायरव : चाहूल / पायांचा आवाज
माणिकहिंदाण्या ... कधीही काहीही विचारले तर नाही म्हणणारा (मुख्यतः जेवणा किंवा खण्याबद्दल विचारल्यावर). हा शब्द वऱ्हाडाात/विदर्भात प्रचलित असायचा'
फोफसा आम्ही आज पण वापरतो.. नांदेड
बैजवार जा ( सावकाश जा )

कोनाडा, माजघर, देवघर,माडी,पडवी, परसदार, चूल - वैल, बंब, कळशी, घागर, चरवी, सारवणे, शिंपणे

थोडी नकारात्मक संबोधने आहेत. लेमळट, नेभळट, फद्या, अवसान घातकी इत्यादी.

फोपश्या ( गोल मटोल पण आतून फुसका), विचका ( गुंतागुंत ), बाज , दिवाण ( एक विशिष्ठ प्रकारचा पलंग) , ओसरी (Verandah) , सज्जा (Balcony), वंगाळ (ओबडधोबड)
विजिगीषू - जिंकण्याची इच्छा असलेला, मौप - पुष्कळ, बरच , पायरव - चाहूल

' भोज्जा ' म्हणजे खेळताना ज्याला पकडतो त्याच्यावर आलेलं राज्ज.' खुडुक ' म्हणजे पार मोडकळीस आलेले आणि हे विशेषण वस्तू किंवा माणसांनाही लावले जाते.' टंब्रेल ' परसाकडे (संडास) ला जाताना पाणी नेण्याचा डबा. 'परसदार

वनवाश्या , बोंबलगट्ट्या, उकांडाहुडक्या, मसनजोग्या, कान कापलेल्या ही सगळी विशेषणा विनाकारण हिंडत असणाऱ्या ला लावली जातात

पाडोळा म्हणजे भटक्या, उगाच भटकणारा हा आमच्या पालघर , वाणगाव भागातील बोली भाषेतील शब्द आहे.

येरवाळी ...सकाळी, पेचकट ...अशक्त, गडगनेर ...केळवण,

गवण (फ्रॉक )

मेंगळट - हळूहळू काम करणारा/री

वाईच म्हणजे थोडंसं, मोऱ्ह म्हणजे पुढे, गोणपाट म्हणजे पोतं, यंगणे म्हणजे चढणे, थोबाड किंवा मुस्काड रंगवणे म्हणजे कानाखाली वाजवणे, मुस्कडतोंड्या, थोबाडतोड्या हे शब्द पण रागाने किंवा लाडाने वापरतो आम्ही😂

गचपन म्हणजे गवत किंवा झुडपामुळे झालेली अडचण

येरवाळी म्हणजे लवकर

लाळ्या .लाल टाकणारा. वाश्या. वासघेणारा .आय घाल्या . .माधे मधे लुडबूड करणारा.बायल्या बायकोचे ऐकणारा.

सांडली = चिमटा। , घडवंची =चार पायांचे स्टूल , ऐतवार = रविवार , बिस्तरवार =गुरुवार , फडताले =चुलीजवलील भिंतीतील शेल्फ ,

दशमी = पोळी ,उकिडवे पाठीवर झोपणे , जाजम = जाड सुताची दोन पदरी भली मोठ्ठी सतरंजी , खंगालणे। = भांड्यात पाणी घालून भांडे(मोठे )गदागदा हलवून धुणे

तडणी लागलं - पोट कटोकाट भरणे

फदुला - लठ्ठ

पाप्याच पवित्र फओपश्यआ वापरात आहे

झांबल्या म्हणजे ज्याला काम सुचत नाही तो.....विदर्भातील शब्द 😂

वाढवण, खराटा, केरसुणी = झाडु, काढणं = विहिरीतून पाणी काढण्यासाठी दोरी बांधलेले छोटे भांडे, पाखाडी = चढ असलेला रस्ता, दिवाणखाना = living room, hall, शयनगृह, शयनकक्ष = bedroom, न्हाणीघर= bathroom, स्वयंपाकघर = kitchen, सज्जा = balcony , न्याहारी = breakfast,

सांडशी = स्वयंपाकघरात वापरतात पक्कड
दप्तर (school bag) शिसपेन्सिल (pencil) दौत (ink) कचेरी (office)
कवाड-दरवाजा
कोरड्यास(कालवण), वायची (खोटारडी),उलीसं (थोडंसं), ऐतवार (रविवार),बुकणी(चहा पावडर),
खुंटी = hook, धुलाईयंञ = washing machine, mixer grinder oven यांना मराठीत काय म्हणतात?
फुफाटा - धूळ या अर्थी वापरला जातो. येस - गावाची वेस. लै - खूप या अर्थी.देवळी - भिंतीत असणारा कप्पा. आगळ - घराच्या मुख्य दरवाजाला आतून असणारी मोठी कडीसदृष्य गज. काठवट - भाकरी करण्यासाठी वापरली जाणारी लाकडी परात.
दिवे मालव,निज,भुसोट्या मागे घे म्हणजे झिपरे केस,झिंज्या ओढीनं,
तताफुली-आगाऊपणा करणारी मुलगी
आंगडं (शर्ट) कावड (दरवाजा) कोड्यासं (शिजवलेली भाजी) इजार (पँट)
शापी म्हणजे दुपट्टा , बांडीस अथवा बंडि म्हणजे बनियान , विदर्भात जावयाला बाप्पु अथवा बुवा म्हणतात. अलीकडे जावयाला भाऊजी म्हणणं चालत नाही मात्र जिजू हा शब्द वापरला जातो.
नुसता स्वयंपाक हा विषय घेतला तरी १)कणिक तिम्बणे कालबाह्य झालं आहे, त्याऐवजी पीठ मळतात, २)स्वयंपाक करणे च्या ऐवजी जेवण बनवणे, ३)स्वयंपाकघरच्या ऐवजी सर्रास किचन म्हणतो ४)फोडणीदेखील हळूहळू कमी होतंय त्याऐवजी तडका दिला जातो, ५)फरताळ, मांडणी, सांडशी, फुलपात्र, खलबत्ता, वरवंटा, ह्या वस्तू आणि शब्द दोन्ही विस्मरणात गेले नसले तरी शहरी भागात वापर शून्य आहे. ६)रांधने हा शब्दही कुणी वापरत नाही ७)फुकणीच्या हा शब्द शिवी म्हणून माहीत असतो पण फुकणी ही 50 वर्षांपूर्वी स्वयंपाक घरात आवश्यक वस्तू होती.
भूतुर - आतमध्ये, वांगडाक- सोबत, तूका- तुला, त्येका- त्याला, खय- कुठे, माका- मला, खेका- कशाला,
कुड्या - गठ्ठे , झाप्या - हटकून गप बसणारा , निसमाळ - निर्माळ, बजिंदा - हट्टी, लागिरं झालं - ओढ लागली , गैबाना, हुबलाक, चळाक
सुलळी चा तोडा किंवा आसुसा म्हणत... सुक्की भाजी ला कोरड्यास म्हणत.....
झंपर (ब्लाऊज), चाहाटळ, स्वैपाक घर( हल्ली लोक सर्रास किचन म्हणतात). दप्तर, शिस पेन्सिल, विजार, झब्बा,लेंगा, खेटर, निमताळा, अगोचर,......
इद्रा= विचित्र
"ए खवड्या" हा शब्द बर्याचदा आंम्ही आमच्या बालपणी वापरत होतो..😂
माठ = मठ्ठ
लळाफळा म्हणजे पाचपेच नसलेली


आमचे आजोबा होते ते उलटी ला वांती म्हणायचे ताटाला ताम्हण, आणि अजूनही मोडी मध्येच लिहायचं आणि ती यादी नेहेमीच्या वाणसामानाच्या दुकानात त्यांना पण समजायची 
कोरड्यास (भाजी),दुरडी (टोपली), वांती(उलटी),आधन (चहाला किंवा भाजीला उकळणे),वाढुळ(खुप वेळ),यदुळा (यावेळी), धाडलं (पाठवले),भगुण(पातेले),