Tuka Aakasha Evadha Lyrics Marathi - Sant Tukaram Haripath and Namsmaran
अणुरेणियां थोकडा ।
तुका आकाशाएवढा ॥१॥
गिळुन सांडिलें कलेवर ।
भव भ्रमाचा आकार ॥२॥
सांडिली त्रिपुटी ।
दीप उजळला घटीं ॥३॥
तुका ह्मणे आतां ।
उरलो उपकारापुरता ॥४॥
अभंगाचा अर्थ सांगण्याआधी शब्दांचे अर्थ पहा.
कलेवर ...प्रेत. भव भ्रम... भव ऐहिक जग, भ्रम ..चुकीची समजूत. हे भोवती दिसणारे जग हे सत्य आहे अशी चुकीची समजुत
त्रिपुटी ... (उदाहरण म्हणून) दृष्य-दर्शन-द्रष्टा. ही एक तत्वज्ञानातील संज्ञा आहे. जी गोष्ट दिसते ती दृष्य (उदा. चेंडू). पहाणारा (उदा. मी) हा द्रष्टा. पहाण्याची क्रिया म्हणजे दर्शन. म्हणजे मी चेंडू पहातो यात द्रष्टा-दृष्य-दर्शन हे तिन घटक. अद्वैतात जग ही माया म्हणजे खोटे असे मानल्यामुळे दृष्य नाहीच. मग द्रष्टा दर्शन कशाचे घेणार ? पुढे असे सांगितले की दृष्य व द्रष्टा एकच आहे. कारण या सर्वांत ब्रह्मच आहे. हे ज्ञान झाले म्हणजे त्रिपुटी सांडिली. इतर काही त्रिपुटी..अधिदैव-अध्यात्म-अधिभुत. ज्ञाता-ज्ञान -ज्ञेय. कर्ता-करण-कार्य.ध्याता-ध्यान-ध्येय इ. मूळ वस्तु अखंड आहे; मन:कृत कल्पनेमुळे ती त्रिधा भासते.
घट ..शरीर. घटी दीप उजळला .. ( देहाच्या आंत प्रकाश पडला) आत्मज्ञान झाले
( हे अतिशय थोडक्यात सांगावयाचा प्रयत्न केला आहे. ज्ञाते आणखी प्रकाश पाडतीलच).
आता अभंगाकडे वळू. आत्मज्ञान झाल्यानंतरच्या अवस्थेचे वर्णन बोवा करत आहेत.
तुकाराम ही व्यक्ती म्हणून अगदी नगण्य आहे म्हणून अणुरेणुया थोकडा. अणुपेक्षाही क्षुल्लक. पण आता आत्मज्ञान झाल्यावर आपण म्हणजेच ब्रह्म हे कळले म्हणून तो आकाशाएवढा, अमेय, झाला
हे शरीर, ही खोल, जीवात्मा बाहेर गेल्यावर कलेवर होते. "मी म्हणजे शरीर नव्हे" हे कळल्यावर हे शरीर म्हणजे एक भ्रामक समजुत आहे याची खात्री झाली, जणु ते शरीर गिळूनच टाकले. हे कशामुळे झाले ? अंतर्यामी प्रकाश पडल्याने.
हे ज्ञान झाल्यावर बोवांना स्वत:करिता करण्यासारखे काहीच उरले नाही. आता "बुडती हे जन, न पाहावे डोळा" या करुणेमुळे ते आता फक्त इतरांवर उपकार करण्याकरिताच उरले आहेत.
कलेवर - शरीर.
आता कोठे धावे मन
anu renu ya thokada meaning
आठवणीतली गाणी राग
sant tukaram
तुज सगुण म्हणू की निर्गुण रे
tukaram
No comments:
Post a Comment