Saturday, August 28, 2021

Jyotiba God Story In Marathi

 



भगवान शंकराने मणी-मल्ल या दोन उन्मत्त राक्षसांचा वध करण्यासाठी हाती खड्ग धारण केल्यामुळेच या खड्गधारी शिव अवताराचे ‘खंडोबा’ असे नाव जनमानसात दृढ झाले. मात्र मरण्यापुर्वी मल्ल या दैत्याने महादेवाची स्तुती केली व मल्लासुराची वृत्ती बदलल्याचे पाहून महादेवांनी त्यास वर दिला. त्यानुसार भगवान शंकराचे नाव घेण्याआधी मल्लारीचे नाव घेतले जाऊन मार्तंडभैरवास ‘मल्लारी मार्तंड’ असे संबोधिले जाऊ लागले.


महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कुलदेव व कुलदेवता यांना अतिशय महत्त्व आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात या राज्यांतील चारही वर्णांत कुलदेव व कुलदेवता यांचे अधिराज्य घराघरातून दिसून येते. प्रत्येक हिंदूच्या घरातून कुलस्वामी व कुलस्वामिनी यांची पूजा नियमित केली जाते. हिंदू धर्मीय देशात असो वा परदेशात, त्याच्या घरातील देव्हाऱ्यात पूजास्थानी या देवतांचे स्थान निश्चित असते. कुलदेव म्हणून खंडेराय अर्थात खंडोबा या शिवशंकराचे अंशकालीन अवताराचे खूप महत्त्व आहे. खंडोबाची चांदीची प्रतिमा असलेले टाक देवघरात असतात.


महाराष्ट्र व कर्नाटकात प्रामुख्याने खंडोबाची स्थाने असतात. तिथे नियमित अशा यात्रा-जत्रा होतात. भाविक त्या-त्या स्थानी कुलपरंपरेनुसार जातात, पूजाअर्चा करून देवदर्शन घेतात, अनुष्ठाने करतात, हाती दिवटी-बुधली घेऊन आरती करतात, तळी भरतात, हळदीचा भंडारा व सुके खोबरे देवाचे नाव घेऊन उधळतात, देवाचा गोंधळ घालण्यासाठी जागर करतात, देवतेस अर्पण करण्यासाठी नैवेद्य करतात. ज्यांना देवस्थानी जाणे शक्य नाही ते हे विधी स्वतःच्या गावातील खंडोबा मंदिरातही करतात.


शिवशंकराने मणी-मल्ल या दोन उन्मत्त राक्षसांचा वध करण्यासाठी हाती खड्ग धारण केले. यास्तव या खड्गधारी शिवावतारास ‘खंडोबा’ असे नाम जनमानसात दृढ झाले. त्यासच खंडेराय असेही म्हणतात. शिवाने मार्तंडभैरवाचा अवतार धारण करून हाती खड्ग धरून त्या शस्त्राने मणी-मल्ल या दोन दैत्यांचा वध केला. या वधप्रसंगी मल्ल या दैत्याने मरण्यापूर्वी महादेवाची स्तुती केली व शंकरास प्रसन्न करून घेतले. या मल्लासुराची बदललेली वृत्ती पाहून आनंदून महादेवांनी त्यास वर मागण्यास सांगितले असता मल्लासुर म्हणाला, ‘‘शंकरा ऐका मागेन ते द्यावे । माझे नाम तुझिया नामाआधी असावे ।।’’ भगवान शंकराने त्यावर ‘‘तथास्तु’’ म्हटले. तेव्हापासून मार्तंडभैरवास ‘मल्लारी मार्तंड’ असे संबोधिले गेले. ‘मल्लारी’चा पुढे लोकभाषेत ‘मल्हारी’ हा अपभ्रंश झाला.


महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध राजवटकालीन सैन्य-संचलनानिमित्ताने, व्यापारधंदा, नोकरी यासाठी जे समाज देशात, देशाबाहेर गेले त्या-त्या ठिकाणी संबंधितांनी स्वतःच्या कुलदैवतांच्या प्रतिमा पूजेसाठी नेल्या. ज्या ज्या स्थळी समाज वसले,त्या त्या ठिकाणी त्यांनी कुलदेवतांची मंदिरे उभारली. अशा प्रकारे हिंदुस्थानभर अशा वसाहतीतून ‘खंडोबा’ या कुलदेवतांची मंदिरे दिसून येतात.

शिंगणापूरचा मोठा महादेव, जेजुरीचा खंडोबा व कोल्हापूरचा जोतिबा हे शिवशंकराचे अवतार असून तेही कुलदेवतांच्या स्थानी मानतात. लग्नाअगोदर वधूवरांकडील संबंधित व लग्नानंतर नवपरिणित जोडपे खंडोबाच्या दर्शनास जाण्याची प्रथा आहे. घरी आल्यावर जागरण, गोंधळाचा व प्रसादाचा कार्यक्रम केला जातो.


या देशातील बहुजन समाज, मागास जाती-जमाती, भटक्या-निमभटक्या जमाती या खंडोबास कुलदेव मानतात. हे सर्व लोक खंडोबाची नियमित पूजा करतात. गावोगावी, वस्तीवर मंदिरे उभारतात. यात्रा-जत्रा भरवतात. वारकरी जसा पंढरीस जातो तसा हा बहुजन समाजही वर्षातून एकदा तरी यात्रेनिमित्त खंडोबास कुलपरंपरेनुसार त्यास नेमून दिलेल्या ठिकाणी भक्तीने जातो.


महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, गावागावात खंडोबारायाची मंदिरे असून त्यांची देवस्थाने आहेत. त्या ठिकाणी तिथीनुसार सार्वजनिक समारंभ, उत्सव होतात. यात्रा-जत्रा भरतात. मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठी, अश्विन शुद्ध नवमी, पौष शु. पौर्णिमा या तिथींना यात्रा भरतात. पौष शुद्ध पौर्णिमेस पाली येथे म्हाळसा-खंडोबा विवाह सोहळा साजरा होतो. जेजुरीस जास्त महत्त्व असून गडाचे व मंदिराचे कलात्मक बांधकाम भक्कम व प्राचीन असून प्रेक्षणीय आहे.


मल्हारीमार्तंड श्रीखंडोबाचे अवतारकार्य महान असून ‘श्रीखंडेराय चरित्र व माहात्म्य’ अत्यंत श्रवणीय आहे. खंडोबाची प्रथम पत्नी म्हाळसारूपात प्रत्यक्ष पार्वतीदेवी आहेत. म्हाळसेची पूर्वजन्मीची सखी जयाद्री ही बानूच्या रूपात खंडेरायाची दुसरी पत्नी होते. आजही ही कथा जागरण, गोंधळाच्या अनेक गाण्यांतून सर्वत्र गायली जाते. तसेच तळी-आरतीची प्रथाही आढळते. तळी भरण्याचा साधासोपा विधी कुळाचा कुळधर्म म्हणून पार पाडला जातो. या विधीसाठी पुजारी लागत नसून हा कौटुंबिक विधी धर्म आहे. घरातील लग्नकार्य, चंपाषष्ठी आदी विशिष्ट प्रसंगी हा विधी करतात. तळी नाचविताना खालील गाणे म्हणण्याची प्रथा आहे-


येळकोट येळकोट जय मल्हार,

आगडुम नगारा, सोन्याची जेजुरी ।

निळा घोडा, पायात तोडा,

कमरी करगुटा, मस्तकी तुरा, बेंबी हिरा ।

अंगावर शाल सदाही लाल,

म्हाळसा सुंदरी आरती करी ।

खोबऱ्याचा कुटका, भंडाऱ्याचा भडका,

बोला सदानंदाचा, येळकोट, येळकोट, येळकोट ।

खंडेराव महाराज की जय ।

हर हर महादेव चिंतामणी मोरया,

आनंदीचा उदय उदय, भैरीचा चांगभले ।

खंडेराव महाराज की जय ।



lord jyotiba wife name

chopdai devi information in marathi

ज्योतिबा ची बायको कोण आहे

ज्योतिबा देवाचे फोटो

चोपडा देवी हिस्ट्री इन मराठी

ज्योतिबाचे फोटो


ज्योतिबा देवाचे फोटो

jyotiba wife name

lord jyotiba wife name

chopdai devi information in marathi

jyotiba god wife name

ज्योतिबा ची बायको कोण आहे

No comments:

Post a Comment