Kojagiri Pournima story in Marathi जाणून घ्या कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व…

जाणून घ्या कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व…

या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ, म्हणजे कोजागरी पर्वतालगत आलेला असतो. त्यामुळे या पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’ म्हटले जाते.



कोजागरी पौर्णिमेचा उत्सव म्हणजे रात्री दुधात चंद्राचे प्रतिबिंब पाहून त्याचा नैवेद्य दाखवणे आणि मग ते दूध पिणे इतकेच आपल्याला माहित असते. पण त्याबाबतची इतर माहिती घेणेही आवश्यक आहे. हा सण अश्विन पौर्णिमेला साजरा करतात. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो त्यामुळे तो मोठा दिसतो. या रात्री लक्ष्मी पृथ्वीतलावर येऊन जागे असणाऱ्यांना धनधान्य आणि समृद्धी प्रदान करते असे मानले जाते. चंद्र हा शीतल आणि आल्हाददायक गोष्टींचे प्रतिक असल्याने त्याची पूजा करणाऱ्यांनाही चंद्रासारखी शीतलता मिळते असे मानले जाते. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ, म्हणजे कोजागरी पर्वतालगत आलेला असतो. त्यामुळे या पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’ म्हटले जाते.


या दिवशी नवान्न (नवीन पिकवलेल्या धान्याने) जेवण करतात. श्री लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेला इंद्र यांची रात्री पूजा करतात. पूजा झाल्यावर पोहे आणि नारळाचे पाणी देव आणि पितर यांना समर्पित करुन नंतर नैवेद्य म्हणून ग्रहण करतात. हा प्रसाद आपल्याकडे आलेल्या सर्वांना देतात. शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या स्वच्छ चांदण्यात दूध आटवून चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात आणि नंतर नैवेद्य म्हणून ते दूध ग्रहण करतात. चंद्राच्या प्रकाशात एकप्रकारची शक्ती असते जी आरोग्यदायी असते असे म्हटले जाते. या रात्री जागरण करुन करमणुकीसाठी निरनिराळे बैठे खेळ खेळतात. दुसर्‍या दिवशी सकाळी पूजेचे पारणे करतात.


लक्ष्मी आणि इंद्र या दोन देवतांना पृथ्वीवर तत्त्वरूपाने अवतरण्यासाठी चंद्र आग्रहात्मक आवाहन करतो. लक्ष्मी ही आल्हाददायक आणि इंद्र ही शीतलतादायक देवता आहे. यादिवशी वातावरणात या दोन देवता तत्त्वरूपाने येत असल्याने आणि त्यांचे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असल्याने त्यांची पूजा केली जाते. मध्यरात्री लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर येते आणि जो जागा असेल, त्याच्यावर संतुष्ट होऊन त्याला कृपाशीर्वाद देऊन जाते. त्यामुळे कोजागरीच्या रात्री जागरण केले जाते.


Kojagiri Pournima 2021: शरद पौर्णिमेच्या दिवशी ‘हे’ उपाय केल्याने पैशांची कमतरता भासणार नाही

१९ ऑक्टोबर रोजी शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा आहे. आजच्या रात्री आई लक्ष्मी आपल्या भक्तांना शोधते. आजच्या दिवशी हे काही उपाय केल्यानं कधीच पैशांची कमतरता भासणार नाही, असं वैदिक शास्त्रात सांगितलंय.


sharad-pournima-2021

१. शंखावर केशरानं स्वस्तिक बनवा, १०८ अक्षता घ्या आणि एक-एक अक्षत महालक्ष्मी मंत्र वाचून शंखावर वाहा… नंतर त्या अक्षता लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत, कॅश बॉक्समध्ये ठेवा.

त्यासाठीचा मंत्र – ओम श्रीं ओम , ओम ह्रीं ओम महालक्ष्मये नम :


तांदूळ चंद्राचं प्रतिक आहे आणि शंख लक्ष्मीचं स्वरूप… हा उपाय रात्री ९ वाजल्यापासून मध्यरात्री १२.३० पर्यंत करू शकता.


२. घरात लक्ष्मीच्या स्थायी निवासासाठी पौर्णिमेच्या संध्याकाळपासून उद्यासकाळपर्यंत अखंड दीप तेवत ठेवा. चंद्रलोकात लक्ष्मी देवी दीप स्वरूपात विराजमान आहे. अखंड दीपाच्या प्रकाशानं देवी धावत येईल.


३. लक्ष्मीच्या तांत्रिक उपायात आपण छोट्या नारळाची पूजा करून त्याची स्थापना देवघरात करा. अष्ट लक्ष्मीवर ९ कमळाची फुलं महालक्ष्मीचं अष्टक म्हणा… लक्ष्मी गरीबांच्या आयुष्यात प्रवेश करेल.


४. दक्षिणावर्ती शंखाद्वारे लक्ष्मी मातेला अभिषेक करा आणि धूप, दीप, फुलानं पूजा करावी. दक्षिणावर्ती शंख पौर्णिमेच्या दिवशीच प्रकट झाला होता. श्रीसूक्तचा पाठ करूनही धनप्राप्ती होते.


५. पौर्णिमेला लक्ष्मी सहस्त्रनाम, लक्ष्मी अष्टावली, सिद्धिलक्ष्मी कवच, श्रीसूक्त, लक्ष्मी सूक्त, महालक्ष्मी कवच, कनकधारा यासारखे पाठ केल्यानं लक्ष्मीची कृपा होईल.


६. पौर्णिमेला आवळ्याची पूजा केल्यानंही लक्ष्मीचा घरात प्रवेश होतो. शरदाच्या चांदण्या रात्री आवळ्यातील औषधी गुण अधिक वाढतात.


७. शरद पौर्णिमेला महालक्ष्मीला खीर, मेव्याच्या खीरचा नैवेद्य दाखवावा. गायीच्या दूधात महालक्ष्मीचा वास आहे, म्हणून ही खीर लक्ष्मीला खूप प्रिय आहे.


जर दिवाळीपर्यंत लक्ष्मी मातानं स्वत: आपल्या घरात प्रवेश करावा असं वाटत असेल. तर या उपायांनी देवीला आमंत्रित करावं.


Kojagari Pournima 2021: शरद पौर्णिमेच्या दिवशी ‘या’ ४ राशींवर असणार आई लक्ष्मीचा आशीर्वाद; पाहा तुम्हीही यात सामील आहात का?

१९ ऑक्टोंबरला शारदीय पौर्णिमा आहे. शरद पौर्णिमेला ‘कोजागिरी पौर्णिमा’ म्हणून ही संबोधले जाते. शरद पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. पाहुयात या दिवशी कोण-कोणत्या राशींच्या व्यक्तींवर असणार आहे आई लक्ष्मीचा आशिर्वाद…


हिंदू पंचांगानुसार यंदा शारदीय पौर्णिमा येत्या १९ ऑक्टोंबरला साजरी केली जाणार आहे. शरद पौर्णिमेला ‘कोजागिरी पौर्णिमा’ म्हणून ही संबोधले जाते. प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला ही शरद पौर्णिमा असे म्हटले जाते. धार्मिक मान्यतनेनुसार, या दिवशी अवकाशातून अमृताच्या थेंबांचा वर्षाव होतो. शरद पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. या व्यतिरिक्त भगवान विष्णूची पूजा केल्याने आयुष्यातील धनाची कमतरता दूर होते असे मानले जाते. पाहुयात या दिवशी कोण-कोणत्या राशींच्या व्यक्तींवर असणार आहे आई लक्ष्मीचा आशिर्वाद…


मेष: शरद पौर्णिमेचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ सिद्ध होईल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता राहील. आदरात वाढ होऊ शकते. रखडलेले काम पूर्ण होईल. कामाच्या ठिकाणी प्रत्येकजण तुमच्या कामाचे कौतुक करेल. प्रवासाचे नियोजन करता येईल. प्रवासातून पैशाची अपेक्षा केली जाईल. गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे. पैसे वाचवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. वाहन खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते.


कन्या: या राशीच्या लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमची लोकप्रियता वाढेल. तुम्ही तुमचे सर्व काम पूर्ण समर्पणाने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. बॉस तुमच्यावर दयाळू असेल. उत्पन्न वाढू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा दिवस शुभ ठरेल. आई लक्ष्मीच्या विशेष कृपेने धन येत राहील. आपण एखाद्या जुन्या मित्राला भेटू शकता.


तूळ: उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता राहील. कोणत्याही कामात मोठा विजय मिळवता येतो. प्रलंबित काम पूर्ण होईल. तुम्ही नवीन गोष्टींवर काम करू शकता. कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळू शकते. खूप काम होईल. ऑफिसच्या कामामुळे तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. ज्यामध्ये पैसे कमवण्याची शक्यता असेल. महत्वाच्या कामात जोडीदाराचे सहकार्य मिळेल. या दिवसाचा पुरेपूर लाभ घ्या कारण तुम्हाला आई लक्ष्मीचा आशीर्वाद मिळणार आहे.


धनु : गुंतवणूकीतून तुम्हाला लाभ मिळेल. कोणताही फायदेशीर करार अंतिम असू शकतो. भागीदारीच्या कामात प्रचंड नफा मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी संबंध दृढ होतील. तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी बॉस तुमच्या कामाची प्रशंसा करतील. जुन्या गुंतवणूकीतून नफा मिळण्याचे संकेत आहेत. आई लक्ष्मीच्या विशेष कृपेने तुम्ही कोणतेही जुने कर्ज फेडू शकता.

==================

शरद पौर्णिमेच्या (कोजागरी) चांदण्यात रात्र जागवण्याची परंपरा आहे. त्याला कारणही तसेच आहे. या पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते. तसेच या दिवशी खीर खाण्याचीही परंपरा असून, चंद्राच्या किरणांमध्ये विशेष शक्ती असते असाही समज आहे.


यंदा कोजागिरी पौर्णिमा आज (13 ऑक्टोबरला) आली असून, अश्विन मासातील पौर्णिमा तिथी आहे. यालाच शरद पौर्णिमा तसेच कोजागरी पौर्णिमा म्हणतात. या पौर्णिमेचे महत्त्व अधिक मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या तिथीला देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि विचारते को जागर्ति? म्हणजे कोणकोण जागरण करत आहे. यामुळे या तिथीला कोजागरी पौर्णिमा म्हणतात. 


चंद्राच्या किरणांमध्ये असे अमृत शरद पौर्णिमेशी संबंधित विविध मान्यता प्रचलित आहेत. धार्मिक मान्यतेनुसार या रात्री चंद्राची किरणं विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात, जे विविध आजारांचा नाश करतात. त्यामुळे जागरण करून चंद्राची किरणे अंगावर घेण्यासाठी नागरिकांचा प्रयत्न असतो. 

==============

कोजागरी पौर्णिमेला धार्मिकरित्या महत्त्वाचे स्थान असल्यामुळे साहजिकच ही पौर्णिमा दरवर्षी उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी 19 ऑक्टोबर म्हणजेच मंगळवारी रात्री कोजागरीचा पूर्ण चंद्र आकाशात पाहायला मिळणार आहे. या रात्रीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे कोजागरीला केले जाणारे दुधाचे नैवैद्य. चला तर मग कोजागरीसाठी मसाला दूध बनवण्यासाठी जाणून घ्या रेसिपी.


साहित्य :

- विलायची-6 किंवा अर्धा चमचा

- केशर- 40 ते 50

- गाईच्या दुधात तूप मिसळून - 1 लिटर

- साखर - कप (100 ग्रॅम)

- बासमती तांदूळ - कप (50 ग्रॅम)

- मनुका - अर्धा टिस्पून

- बदाम - 10

- काजू - 10



कृती :


- सुरवातीला 1 लिटर दूध मंद आचेवर गरम करा. दूध गरम असताना बदाम आणि काजूचे लहान तुकडे करा. 7 ते 8 बदाम आणि 10 ते 12 काजू कापून घ्या.

- हिरव्या वेलचीची पावडर बनवा. तांदूळ धुतल्यानंतर ते अर्धा तास पाण्यात भिजवा.

- दुधाला उकळी येताच त्यात तांदूळ घाला आणि थोड्या वेळाने ढवळत राहा.

- 15 मिनिटांनंतर, खीरमध्ये बारीक केलेलं काजू आणि बदाम घाला, आता मध्यम आचेवर 15 मिनिटे शिजवा. खीर घट्ट झाल्यावर त्यात केशर मिश्रित दूध घाला.

- यानंतर, वेलची पावडर टाकल्यानंतर, नीट ढवळून घ्या आणि आणखी 10 मिनिटे शिजवा.

- त्यात अर्धा कप साखर घाला. साखर विरघळेपर्यंत मंद आचेवर 2 मिनिटे शिजवा. अशा पध्दतीने खीर बनवून तयार झालीय.

----------------------------

नांदेड : निशीथे वरदा लक्ष्मी: को जागर्तिति भाषिणी। जगाति भ्रमते तस्यां लोकचेष्टावलोकिनी।। तस्मै वित्तं प्रयच्छामि यो जागर्ति महीतले।। या श्लोकाप्रमाणे आज कोजागिरी पौर्णिमेनिमित्त शहरात ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कोजागीरी ही वैज्ञानिक दृष्टीकोणातून आरोग्यासाठी फलदायी असल्याचे मानले जाते. 

दसरा आणि दिवाळीदरम्यान येणारी कोजागिरी पौर्णिमा ही खास मित्रमंडळी जमवून गप्पांच्या साथीने रात्र जागविण्याचे एक चांगले निमित्त असते. आज, शुक्रवार शरद म्हणजेच कोजागरी पोर्णिमा आहे. कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव म्हणजे रात्री दुधात चंद्राचे प्रतिबिंब पाहून त्याचा नैवेद्य दाखवणे आणि मग ते दूध पिणे इतकेच आपल्याला माहित असते.   

कोजागीरी पौर्णिमा म्हणजे काय?

कोजागिरी हा सण अश्विन पौर्णिमेला साजरा करतात. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो त्यामुळे तो मोठा दिसतो. या रात्री लक्ष्मी पृथ्वीतलावर येऊन जागे असणाऱ्यांना धनधान्य आणि समृद्धी प्रदान करते असे मानले जाते. चंद्र हा शीतल आणि आल्हाददायक गोष्टींचे प्रतिक असल्याने त्याची पूजा करणाऱ्यांनाही चंद्रासारखी शीतलता मिळते असे मानले जाते. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ, म्हणजे कोजागरी पर्वतालगत आलेला असतो. त्यामुळे या पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’ म्हटले जाते.

चंद्राच्या प्रकाशात असते शक्ती

या दिवशी शेतकरी नवीन पिकवलेल्या धान्याचे जेवण करतात. श्री लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेला इंद्र यांची रात्री पूजा करतात. चंद्राला नैवेद्य दाखवून एकत्रित ते ग्रहण करतात. शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या स्वच्छ चांदण्यात दूध आटवून चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात आणि नंतर नैवेद्य म्हणून ते दूध ग्रहण करण्याची परंपरा आहे. चंद्राच्या प्रकाशात एकप्रकारची शक्ती असते जी आरोग्यदायी असते, असे म्हटले जाते. या रात्री जागरण करुन करमणुकीसाठी निरनिराळे बैठे खेळांसोबतच गाण्यांची मैफिलीचेही आयोजन केले जाते.  

कोजागीरीच्या दिवशी का करतात जागरण?

लक्ष्मी आणि इंद्र या दोन देवतांना पृथ्वीवर तत्त्वरूपाने अवतरण्यासाठी चंद्र आवाहन करतो. लक्ष्मी ही आल्हाददायक आणि इंद्र ही शीतलतादायक देवता आहे. यादिवशी वातावरणात या दोन देवता तत्त्वरूपाने येत असल्याने आणि त्यांचे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असल्याने त्यांची पूजा केली जाते. मध्यरात्री लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर येते आणि जो जागा असेल, त्याच्यावर संतुष्ट होऊन त्याला कृपाशीर्वाद देऊन जाते, अशी अख्यायिका असल्यामुळे कोजागिरीच्या रात्री जागरण करतात.

==============

वर्षातील सगळ्यात आल्हाददायक पौर्णिमा म्हणजे आश्विन महिन्यातील कोजागरी. या काळात वर्षा ऋतू संपून आल्हाददायक शरद ऋतूला सुरवात झाली असते. आकाश निरभ्र होऊन टिपूर चांदणे पडू लागते. हे नितळ चांदणे अनुभवण्याचा उत्सव म्हणजे कोजागरी पौर्णिमा. ह्या दिवशी पाळावयाच्या व्रताला ‘कोजागरव्रत’ म्हणतात. दिवसा उपवास करून रात्री लक्ष्मी, इंद्र यांची पूजा करावी, चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवावा  असा ह्या व्रताचा विधी सांगितला आहे. या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते आणि ‘को जागर्ति’ (कोण जागा आहे?) असे विचारत घरोघर फिरते. जो जागा असेल, त्याला धनधान्य देऊन समृद्ध करते असे मानले जाते.


वैदिक काळात अश्विनी पौर्णिमेला इंद्र, अश्विनीकुमार यांना आहुती देत आश्वयुजिकर्म हे कर्म केली जात असे. काठक गृह्यसूत्रात या दिवशी घरातील पशुधनाला  सजवून पूजन करण्यास सांगितले आहे. वामन पुराणात यारात्री लक्ष्मीच्या स्वागतासाठी सगळीकडे दिवे लावावेत असे सांगत या उत्सवाला दीपदानजागर असे म्हटले गेले आहे. ब्रह्मपुराणात या दिवशी घर स्वच्छ करून गृहद्वाराजवळ अग्नी प्रज्वलित करून त्याची पूजा करावी असे म्हटले आहे. गोपालकांनी सुरभी, हत्ती बाळगणाऱ्यानी विनायक, घोडे पाळणाऱ्यानी रेवंत आणि मेंढे बाळगणाऱ्यांनी वरुण या देवतांची पूजा करावी असे सांगितले आहे. भागवतानुसार शरद पौर्णीमेला श्रीकृष्णांनी गोपिकांसोबत रासक्रीडा केली होती.


उन्मादयंती जातकावरून बौद्धकाळात हा उत्सव कशा प्रकारे साजरा होत असे याची कल्पना येते. विशाखादत्ताच्या मुद्राराक्षस या नाटकात कौमुदी महोत्सव म्हणून या दिवसाचा उल्लेख आढळतो. शरद ऋतूतील आल्हाददायक वातावरणात प्रेमीजनांना उपकारक असा हा शृंगाराचा महोत्सव म्हणून त्याचे विशेष आहे. वात्सायनाने कामसूत्रात यक्षरात्रि, कौमुदीजागर, सुवसन्तक,अभ्यूषखादिका अशा सर्वत्र साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक उत्सवांची माहिती दिली आहे. यातील कौमुदीजागर म्हणजे अश्विनी पौर्णिमेला नगरातील लोक एकत्र जमून चांदण्यात काव्य शास्त्र विनोदात रात्र जागून काढत असत. आयुर्वेदानुसार दिवसा उन आणि रात्री थंडी यांच्यामुळे हा पित्तवर्धक काळ आहे. पित्त शमनासाठी चांदण्यात ठेवलेले आटीव दुध पिण्यास सांगितले आहे. पित्तशामक प्रवाळ पिष्टी हे औषध तयार करण्यासाठी आश्विनी पौर्णिमा हा महत्वाचा दिवस मानला जातो. बौद्ध परंपरेत या दिवशी भिक्खू संघाचा वर्षावास संपतो म्हणून याला महाप्रवारणा पौर्णिमा म्हणतात.


कोजागरी पौर्णिमा भारताच्या विभिन्न भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी होते. महाराष्ट्रात कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून 'आश्विनी' साजरी करतात. बंगाली लोक 'लोख्खी पुजो' असे म्हणत घुबड वाहन असणाऱ्या लक्ष्मीची पूजा करतात. राजस्थानात महिला या दिवशी शुभ्र वस्त्र नेसून,चांदीचे दागिने घालून चंद्राची पूजा करतात. गुजरातमध्ये गरबा खेळत 'शरद पुनम' नावाने साजरी केली जाते. मिथिलेमध्ये या रात्री कोजागरहा ही पूजा केली जाते. ओडिशामध्ये 'कुमार पौर्णिमा' असे म्हणता गजलक्ष्मीची पूजा करतात. भारताच्या उत्तर प्रांतात नव्याने तयार झालेल्या भाताची गायीच्या दुधातील आटीव खीर-‘दूध पौवा’ तयार करतात. अनेक वनवासी जमातीत या रात्री होजागरी नृत्य केले जाते. वनवासी बांधव मायलोमा ह्या भातशेतीचे रक्षण करणाऱ्या देवीची पूजा करतात. शेतकऱ्यांसाठी ही नवान्न  पौर्णिमा एक कृषीउत्सव आहे. शेतात पिकलेले नवीन धान्य घरी आणून त्याची पूजा करून वापरता आणले जाते. कोकणात नवं म्हणजे आंब्याच्या पानात भाताची लोंब, नाचणीचं कणीस, कुर्डूचं फुल एकत्रित करून घराच्या प्रवेशद्वारावर बांधण्याची पद्धत आहे.


भारतीय समाज हा निसर्गप्रेमी आणि उत्सवप्रिय आहे.अगदी प्राचीन काळापासूनच शरद चांदणे अनुभवण्याचा हा लोकउत्सव समाजात प्रचलित होता. यालाच शेतीतून हाती आलेली समृद्धी कृतज्ञतेने देवाला अर्पण करण्याची जोड आहे.जो जागा म्हणजे सजग आहे ,प्रयत्नशील आहे त्याला यशश्री नक्की मिळेल असा विचार देखील यामागे आहे.आत्ताच्या  काळात आटीव दुधाचा आस्वाद घेत रंगलेल्या गप्पांच्या मैफिलीत कोजागरीचे हे प्राचीन संदर्भ आठविणे ही रंजक ठरावे !

--------------------------

No comments:

Post a Comment