राष्ट्रवादीच्या लोकांना कोरोना होण्याची शक्यता पवार साहेबांनी फेटाळली...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कारण सर्व जण संधी मिळेल तेव्हा हात धुवून घेत असतात
=====================
Jab kabhi lage ki
aapka ghar chhota hai
toh ek bar
pochha lga kar dekh lena ,
Villa lagne lagega...
😀😋😉😂
=====================
सुरवातीला दारू पिऊन पडलेल्याला कोणी पहात देखील नव्हतं.
पण आता, त्याला उचलून
साईडला घेऊन विचारतात.
भाई कुठं मिळाली.?
🤣🤣🤣
=====================
जगात जितके डॉक्टर कोरोना साठी औषध शोधत नसतील तेवढे जास्त लोक भारतात तंबाखू ,विमल ,गायछाप,सिगारेट, आणि दारू शोधत आहे.😃😃
=====================
Wife was checking her husbands phone and saw a contact named COVID19 & she called the number and her own phone rang.
😆
Husband is now in isolation
=====================
इतिहासातील एक मनोरंजक घटना
स्कॉटलंड मध्ये एक अतिशय तुटपुंजी आर्थिक परिस्थिती असलेला एक शेतकरी होता. एके दिवशी नेहमी प्रमाणे त्याच्या शेतीच्या कामात व्यस्त होता तेंव्हा त्याला, एका लहान मुलाच्या किंकाळ्या ऐकू आल्या. जीवाच्या आकांताने ओरडत असलेल्या त्या हाका ऐकुन त्या शेतकऱ्याने हातातली अवजारे/शेतीच काम सोडून आवाजाच्या दिशेने धाव घेतली. सदर जागी जाऊन पाहतो तर एक चिमुरडा, दलदल मध्ये गळ्यापर्यंत रुतलेला दिसला. काही क्षणांचा विलंब आणि त्या मुलास जिवंत समाधी, अशी स्थिती पाहून त्या शेतकऱ्याने स्वतः चा जीव धोक्यात घालून, प्रचंड आटापिटा करीत त्याच्या आजूबाजूचा गाळ काढला, आणि त्या जीवघेण्या संकटातून त्या मुलाची सुटका केली.
दुसऱ्या दिवशी लवाजम्या सहित एक आलिशान बग्गी त्या शेतकऱ्याच्या घरापाशी येऊन थांबली. त्या बग्गी मधून एक अतिशय धनवान व्यक्ती उतरली आणि त्या शेतकऱ्याच्या घरी गेली. त्या व्यक्तीने शेतकऱ्यास स्वतःचा परिचय दिला, की काल ज्या मुलाला तुम्ही मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं, त्या मुलाचा ती व्यक्ती पिता आहे, म्हणून शेतकऱ्याने केलेल्या उपकाराबद्दल धन्यवाद देणे करिता ते आले आहेत. त्यांचा वार्तालाप चालू होता, त्या धनाढ्य व्यक्तीला त्या दरम्यान जाणवलं की हा शेतकरी आर्थिकदृष्ट्या तितका सक्षम नाही, तथापि अतिशय स्वाभिमानी आहे, हा कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत घेणार नाही.
त्या शेतकऱ्याचा मुलगा, दरवाज्यातून आत येतो. त्या धनाढ्य व्यक्तीने त्या मुलाबद्दल शेतकऱ्याला चौकशी केली की हा कोणत्या वर्गात शिकत आहे. शेतकऱ्याने त्यास उत्तर दिले की त्याचा मुलगा हा काही विद्यार्जन करत नसून, शेती कामात मदत करतो. यावर त्या धनाढ्य व्यक्तीने शेतकऱ्यास असे सुचविले की, की माझ्या मुलाला तुम्ही जीवनदान दिलं त्या बदल्यात तुमच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी मला घेऊ द्या, जेणेकरून मी तुमच्या मुलास उत्तम भविष्य, देऊ शकेन. यावर त्या शेतकऱ्यानं सहमती दर्शविली.
त्या शेतकऱ्याच्या मुलाला इंग्लंड च्या नामांकित शिक्षण संस्थेत प्रवेश दिला गेला आणि त्या मुलाचं शिक्षण सुरू झालं. काही दिवसातच कळाल की हा मुलगा सर्वसामान्य नसून विलक्षण बुद्धिमान आहे, त्या मुलाने शिक्षण क्षेत्रात अतिशय कौशल्य दाखविले, आणि तो उच्चशिक्षण देखील घेऊ लागला. पुढे तो मुलगा संशोधन कार्यात उतरला.
ही दोन्ही मुलं त्यांच्या ऐन तारुण्यात असताना, त्या धनाढ्य व्यक्तीचा मुलगा आजारी पडला. आजार वाढतच चालला होता, आर्थिकदृष्ट्या अतिशय बलवान असल्याने त्याच्या पित्याने उपलब्ध असणाऱ्या सर्व वैद्य, औषधोपचार केले, पण तरीही आजार उतरत नव्हता. त्या वेळेला त्या आजारास कोणतेही ठोस आणि खात्रीलायक औषध नव्हते. याच दरम्यान त्या शेतकऱ्याच्या मुलाने, त्याच्या संशोधन कार्यात एक जबरदस्त मजल मारली, आणि एक लस शोधून काढली, आणि नेमकी हीच लस म्हणजे त्या धनिकाच्या मुलाच्या आजारावर रामबाण औषध होती. त्या लसिमुळेच पुन्हा एकदा हा मुलगा मृत्यूच्या तोंडातून परत आला.
बालपणी ज्याने जीवदान दिले, त्याच्याच मुलाने तारुण्यात पुन्हा एकप्रकारे त्याच धनिकाच्या मुलाचा जीव वाचविला होता. हा कुठेतरी प्रामाणिक पणाने, कृतज्ञ पणाने स्वतः च्या मुलाला वाचविले ची परतफेड करणे करिता केलेल्या कार्याची ही एक प्रकारे परतफेड होती.
आता ही सर्व पात्रे कोण ते सांगतो,
तो धनिक व्यक्तीचा मुलगा, म्हणजे इंग्लंडचा माजी पंतप्रधान, विन्स्टन चर्चिल,
तो शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे, थोर शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग, आणि त्याने शोधून काढलेली लस म्हणजे, पेनिसिलीन.
म्हणून इतरांना मदत करा,नेहमी परतफेड मिळेलच या अपेक्षेने नव्हे तर स्वतःच्या मानसिक समाधानासाठी.आपण या सृष्टीचा अंश आहोत आणि चांगल्या लोकांच्या त्यागातून च नवीन काहीतरी निर्माण होत असते..
लेख आवडल्यास शेअर करून वाचनाची आवड प्रत्येकामध्ये रुजविण्याचा कामाच्या गोष्टी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा ही विनंती.
वाचाल तर वाचाल
=====================
पडोसन ने अभि अभि हिम्मत दी है
वो बोली कोरोना हाथ मिलाने से फैलता है....
नजरे मिलाने से नही
=====================
दिवस रात्र एकच विचार येत आहे
आणि एकच भीती वाटत आहे
कोरोना गेला आणि तो जर
जाता जाता बोलला की,
मी पुन्हा येईन
मी पुन्हा येईन
मी पुन्हा येईन
😂🤣😂😂😂😂😂🤣
मग कसं होईल.
=====================
ह्या लाँक डाउनने एक मोठी शिकवण दिली
आयुष्यात कितीही लाख मोलाची माणस कमवा
पण त्यात एक तरी जिवाभावाचा वाइन शॉप वाला आणि एक पानपट्टी वाला असावा
🤣🤣🤣🤣🤣
घश्याला कोरड पडलेली संघटना
=====================
लॉक डाऊन नंतर येणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाय
A
1) अनेकांच्या नौकऱ्या जाऊ शकतात किंवा पेमेंट कमी होऊ शकते .
2) बिझनेस अडचणीत येऊ शकतात किंवा आपले प्रॉफिट कमी होऊ शकते !
3) एक जॉब गेल्या नंतर दुसरा जॉब मिळणे कठीण होऊ शकते !
4) आज आपल्याला जी काय लक्झरी मिळते नौकरीच्या ठिकाणी किंवा घरी " ती " भविष्यात कमी होऊ शकते ! ( निदान काही काळ तरी मिळणार नाही )
5) यात कोणत्याही
शासनाची काहीही चूक असणार नाही !
6) कोरोनामुळे घडणाऱ्या जागतिक घडामोडींचा तो दुष्परिणाम असणार आहे !
7) आपले लिव्हिंग स्टँडर्ड डाऊन होऊ शकते !
8) एखाद्या वेळेस अगदी जेवणाचे सुद्धा वांदे होऊ शकतील !
B) आपण काय उपाय करावेत ?
---------------------------------
1) कोणत्याही परिस्थितीत संयम सोडायचा नाही , खचून जायचे नाही !
2) कोणतेही काम करण्याची लाज बाळगायची नाही !
3) फोर व्हीलर , टू व्हीलर चा वापर कमी करून सायकल व पायी चालणे यावर भर द्यावा लागेल !
4) इस्त्रीचे कपडे , सौंदर्य प्रसाधने , साबण , क्रीम अशा गोष्टी वापरणे बंद करावे लागेल , किंवा कमी करावे लागेल !
5) पुन्हा गरिबीत राहण्याचा प्रसंग येऊ शकतो !
6) अशा प्रसंगी कोणाला हासू नका , चिडवू नका , टोमणे मारू नका !
7) भांडणे , तंटे , न बोलणे या गोष्टी सोडून द्या !
8) भाऊ-भाऊ , बहिणी-बहिणी , बहीण-भाऊ , मित्र , शेजारी या सर्वांनाच एकमेकाला मदत करावी लागेल , त्या शिवाय गुजराण होणे अशक्य होईल !
9) सर्व जातीधर्मातील लोकांनी पहिल्या पेक्षा जास्त आपुलकीने राहणे गरजेचे असणार आहे !
10) लग्न , मौंज , दहावे , चौदावे अतिशय साधेपणाने करावे लागतील !
11) लग्न , मौंज किंवा कुठलेही तत्सम कार्य " मोठेपणात " न जाता साधे पणाने करावे लागेल . वास्तव स्वीकारावे लागेल , अनेक गोष्टी फक्त घरच्या घरी कराव्या लागतील !
12) विजेचा वापर अत्यंत काटकसरीने करावाच लागेल !
13) घरापासून 2
/3 Km. पर्यंतच्या कामाला जाण्यासाठी कुठल्याही , पेट्रोल डिझेलच्या वाहनाचा वापर टाळावा लागेल , म्हणजे तो करणे परवडणारे नसेल !
14) कुठलीही नवीन खरेदी जवळ जवळ बंदच करावी लागेल !
15) शेतीचे महत्व वाढेल असे वाटते , त्यामुळे शेती शक्यतो विकू नये !
16) जे कपडेलत्ते पूर्वी आपण सर्रास फेकून देत होतो , आता तसे करता येणार नाही !
17) लहानपणी जसे आपण एकमेकांचे अडजुने कपडे वापरायचो तसे करावे लागल्यास , अजिबात कमीपणा समजू नका !
--------------------------------
C ) कौटुंबिक कलह
1) माणूस आर्थिक अडचणीत सापडला की त्याची चीड चीड होत असते , बोलण्यावर संयम रहात नाही .....हे सगळे आपल्याला जाणीवपूर्वक टाळावे लागेल !
2) बायकांनी नवऱ्याला आर्थिक टंचाई वरून घालून पाडून बोलू नये , अपमानीत करू नये !
3) कोणत्याही गोष्टीची डिमांड करतांना , नवऱ्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घ्यावी लागेल !
4) जे नवरे काही व्यसन करतात त्यांनी ते व्यसन सोडून द्यावे ! बऱ्याच घरात यावरूनच भांडणे होतात !
5) नवरा म्हणणार्याने घरी किंवा ऑफिस मध्ये बेताल , वायफट बडबड करू नये !
6) घरातील मुला-मुलांनी या सर्व गोष्टी समजून घ्याव्यात !
7) शाळांनी विद्यार्थ्याना खर्चिक प्रोजेक्ट्स देऊ नयेत !
8) चहा करणे ,भाजी चिरणे , कणिक तींबने , कप-बश्या विसळणे , झाडाझुड करणे , फरशी पुसणे , दुखत असल्यास आई वडिलांचे पाय दाबून देणे ....असे प्रोजेक्ट्स द्यावेत ! ( ही गोष्ट हसण्यावर नेण्याची नाही )
9) प्रत्येकाने आपले नाते संबंध जपावेत , त्यामुळे जगणे सुसह्य होते !
10) स्त्री पुरुषांनी ब्युटीपार्लरच्या सेवेचा लाभ घेणे टाळावे !
11) शारीरिक सौंदर्या पेक्षा वैचारिक सौंदर्य कसे वाढेल याकडे लक्ष द्यावे !
12) पूर्वी सारखे खर्चीक पर्यटन न करता , कमीत कमी खर्चा मध्ये पर्यटन करावे !
13) पर्यटनाच्या व्याख्या व ठिकाणे बदलावी लागतील !
14) कॉलनीतल्या कॉलनीत अंगत-पंगत ( डबा पार्टी ) किंवा शेतात दशम्या धपाटे घेऊन जाणे याला सुद्धा पर्यटनच समजा वे लागेल !
=====================
सोलकढी ही जगातील एकमेव रेसिपी आहे ज्यात तिखट, गोड, आंबट, खारट आणि तुरट समप्रमाणात टाकले जाते. मालवणला जेव्हा मराठी साहित्य संमेलन भरले तेव्हा आचार्य अत्रे यांनी सोलकढीला भैरवीची उपमा दिली होती.
🍒🍷 सोलकढी :🍸🍒
हल्लीच कधी मी एका दक्षिणात्य मित्राच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो, उन्हाळा हा हा म्हणत होता. एका बाजूला सनई-चौघडे वाजत होते, दुसऱ्या बाजूला गजरे वाटणे सुरू होतं. सर्व पाहुणे मंडळी, माझ्या मित्राकडची मंडळी त्यांच्या त्यांच्या भाषेत बोलत होती, मला त्यांची भाषा अवगत नव्हती. त्यांच्या संभाषणातला एक शब्द कळेल तर शपथ ! तेवढ्यात केटरिंगवाल्यानी "वेलकम ड्रिंक" घेऊन आले. काचेच्या ग्लासमधून दिलेलं ते ड्रिंक मला प्रथमदर्शनी पेरू किंवा गुलाब सरबत असावं असे वाटले. माझ्या हातात वेटरने ते ग्लास दिलं आणि ते पिऊ लागलो. त्या पेयाची चव चाखली आणि मी उडालोच !
ते थंड पेय म्हणजे चक्क सोलकढी होती; होय, आपल्या कोकणातील सोलकढी लग्नसमारंभात वेलकम ड्रिंक म्हणून मिरवतेय या पेक्षा आनंद तो कोणता... !!
एका दाक्षिणात्य लग्नात लोक सोलकढी आवडीने पितात हे बघून आनंद होत होता. सोलकढीचे गुणधर्म त्या लोकांना माहीत असतील का ? किंवा जे लोक सोलकढी वाटत होते त्यांना तरी तिचे गुणधर्म माहीत असतील का ?... सुतराम ही शक्यता नसेल. पण हल्ली उन्हाळ्यात जागोजागी थंडगार सोलकढी मिळेल असे बोर्ड दिसतात.
सोलकढी ही प्रादेशिक खाद्यसंस्कृती आहे, याचे कारण सोलकढी बनवण्यासाठी लागणारी रातांबीची झाडे मुख्यतः कोकणात - त्याहीपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळतात.
त्यामुळे ही सोलकढी सिंधुदुर्ग जिल्ह्याला जवळची वाटणं तशी स्वभावीक आहे. रातांबी धरली म्हणजे ते झाड फळांनी लगडून वाकलं आहे असं कोणी सांगताच, घरातले सर्वजण हातात फाटी आणि मोठी काठी घेऊन रातांबीच्या झाडाजवळ जातात. कोणतरी एकजण झाडावर चढून रातांबीची फळं खाली पाडतो आणि मग खालची मंडळी ती फळं निवडतात. रातांबीची लाल बुंद झालेली फळं अगदी डोळ्यात भरतात. डॉ महेश केळुसकर यांनी या रातांबी रंगाला मराठी कवितेत स्थान दिलं. त्यांच्या मोर या कवितेत.
तिळफुलांच्या शेतात
तू हात घेतलेस हातात
तेव्हापासून साखरझोपेत माझे
रातांबी ओठ उगाचच हुळहुळतात...
हे रातांबी ओठ म्हणजे लालसर रंगाचे. रातांबी रंग जसा कवितेत आला त्याचप्रमाणे सोलकढी देखील मराठी साहित्यात मान मिळवून आहे. कवी विजय चिंदरकर यांनी आपल्या कवितेत,
हा सारा अन थाट हवा
अन हवीत सारी अवतीभवती
सोलकढीची हवी भैरवी
तृप्तीच्या त्या तानेवरती
अशी एक ओळ आहे. ही कविता १९५८ साली औमालवण येथे झालेल्या साहित्यसंमेलनात सादर केली. त्यावेळी उपस्थितांपैकी आचार्य अत्रे यांना त्या कवितेतल्या सोलकढीचे इतकं भारावून टाकलं की, या मालवणच्या साहित्य संमेलनाची सांगता सोलकढीच्या भैरवीने झाली असा आशय घेऊन या संमेलनावर अग्रलेख आपल्या मराठा या वर्तमानपत्रात लिहिला. ज्या आचार्य अत्र्यांना ह्या सोलकढीचे भुरळ घातली त्या सोलकढी बनवण्यासाठी जे कष्ट लागतात ते मात्र तोंडातून फेस आणणारे असतात असं म्हटलं तरी वावगं ठरू नये.
झाडावरून पाडलेले रातांबीची फळं गोळा केली की, ती खळ्यात पसरून ठेवायची. ती लालबुंद फळं मधोमध फोडून त्याचे दोन-तीन भाग करून त्यातील बिया वेगळ्या करायच्या आणि सालं बाजूला करायची, ही फळं फोडताना हाताच्या बोटांची चामडी नरम होते. एखाद्याला जर बोटाला जखम झाली असेल तर रातांबे फोडताना त्या जखमेला भगभग व्हायची, रातांब्याच्या फळात असणाऱ्या रासायनिक आम्लचा तो परिणाम असतो. ही फळं फोडताना गावच्या गजाली मात्र रंगतात, इथल्या कोकणी माणसाला ज्या गजालींचं वरदानच आहे. वर्षानुवर्षे ह्या गजाली मारण्यात काही विशेष फरक पडला नाही.
ज्या फळांना झाल्यानंतर ती फोडलेल्या फळांना सुकवून, आतील बियांच्या पाण्यात टाकून ठेवतात, ज्याला तळकोकणात आगुळ म्हणतात. ही आगुळ पिऊन तृप्त झालेली रातंबीची फळं मग आपला रंग बदलतात, काहीशी काळपट रंग धारण करतात आणि मग कोकम किंवा सोलाच्या रूपाने आपल्या पुढे सादर होतात. ह्याच कोकमाची किंवा सोलाची नारळाचा रस काढुन जी कढी बनवतात त्यालाच सोलकढी म्हणतात .
आजकाल टीव्हीवर कॉफीची जाहिरात दाखवतात, त्यात अशी कॉफी माझ्या घरी पण बनवू शकतो का ? हा प्रश्न विचारल्यावर तो शेतकरी त्याला जे उत्तर देतो ते फार समर्पक आहे तो म्हणतो, ही चांगली कॉफी बनवण्यासाठी कॉफीची फळं त्या दर्जाची असावी लागतात. हाच नियम सोलकढीला देखील चांगल्याप्रकारची चविष्ठ सोलकढी बनवण्यासाठी कोकमाचा दर्जा देखील त्या प्रतिचा असावा लागतो. ती कोकमं किंवा सोलं ही तळकोकणातच मिळतात. सोलकढी ही संस्कृती जगभर रूढ होण्याआधी ती तळकोकणात रुजलेली आहे, तिची पाळंमुळं ही इथल्या खाद्यसंस्कृतीशी आपले नातं सांगते. मांसाहारी विशेषतः मटण, चिकनच्या जेवणानंतर सोलकढी ही हवीच. गावच्या घरात "भट" वाढला की, जेवणात भटजीकाकांना सोलकढी करा म्हणून सांगायला यजमानी विसरत नाही, का तर ती संस्कृती तिथे मुरली आहे.
या सोलकढीचे आता केवळ कोकण किंवा महाराष्ट्र जोडला नसून, संपूर्ण भारत जोडत आहे. जी सोलकढी सिंधुदुर्गाखेरीज बाकी जिल्ह्यात माहीत नव्हती ती आज जगमान्य झाली आहे, यात त्या मुलूखतील मातीचे विशेष गुण आहेत हे मान्य करावे लागेल...
=====================
भडगाव तालुका (जळगाव) निंभोरा येथिल हा आदिवासी भिल्ल समाजाचा मुलगा असून त्याच नाव गोलू अस आहे.
त्याने कुठलेही नाचण्याचे प्रशिक्षण न घेता ईतका छान डान्स करतो तर त्याच्या या टॅलेंट ला वाव मिळाला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ ईतका शेअर करा की डान्स इंडीया डान्स सारख्या रीयॅलीटी शो पर्यंत पोहचला पाहिजे.
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================