Friday, April 10, 2020

Nature knows how to do perfect balancing

आख्या जगाला काळजी होती ती पृथ्वी भोवतालचा ओझोन चां लेयर कमी होत चालला आहे ज्यामुळे सूर्याची प्रखरता वाढत चालली आहे.हिमालयाचा बर्फ देखील हळू हळू वितळू लागला होता आणि समुद्राच्या पाण्याच्या पातळीत अत्यल्प वाढ होत होती.हे असच चालू राहील तर अजुन ८० ते ९० वर्षांनी पृथ्वी नष्ट होण्याची भीती निर्माण झाली होती आणि जगातला प्रत्येक देश हा विषय घेऊन चिंतेत होता.
पृथ्वी वरील प्रदूषण ओझोन लेयेर कमी करण्या साठी कारणीभूत होता आणि आहे.
पण म्हणतात ना, Nature knows how to do perfect balancing.
अचानक आख्या जगात कोरोना नावाचं संकट आलं.लोक घाबरले,सगळ्यांना वाटायला लागलं की आता पृथ्वी विनाशाच्या दिशेनी चालली आहे.
पण नाही,आख्या जगाला निसर्गाने एका क्षणात थांबायला लावलं.परिणाम काय झाला?
पृथ्वी वरच प्रदूषण कमी झालं,गाड्या रस्त्यावर नाही त्यामुळे वायू प्रदूषण नाही,कारखाने चालू नाहीत त्यामुळे त्यांच्या रसायनाच पाणी समुद्रात आणि नदी मध्ये सोडलं जात नाही आहे.कित्येक हजार लिटर च्या नैसर्गिक तेल साठ्याची जपणूक केली जाते आहे.
ह्याचा परिणाम? काल पर्यंत दिल्ली सारखं शहर जे जगातलं प्रदूषित शहर म्हणून ओळखलं जायचं त्याच्या हवेची पातळी ही Good कॅटेगरीत आली आहे.
पुणे शहरात प्रदूषणाची पातळी ५२% नी कमी झाली.मुंबई मध्ये प्रदूषण ४०% नी कमी झाले.
स्वच्छता ३६% नी वाढली.जगातल्या कित्येक प्रदूषित देशातल्या प्रदूषणाची पातळी एका झटक्यात कमालीची खाली आली.ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम ओझोन चां पृथ्वी भोवतालचा लेयर वाढू लागला आहे.
निसर्गाने खूप सहन केलं,माणूस सुधारेल ही आशा धरली अखेर त्याला कठोर पाऊल उचलावे लागले आपल्या सगळ्यांना धडा शिकवण्यासाठी.
शेवटी निसर्ग म्हणजे काय ईश्वराने निर्माण केलेलं सुंदर विश्व,तो त्याच हे सुंदर विश्व उध्वस्त होताना थोडाच स्वस्त बसेल? म्हणून थोड कठोर पाऊल त्या विधात्याने उचललं आहे.त्यात बरेच बळी देखील गेलेत.पण एखादी आई जशी आपल्या मुलाला घडवताना कधी कधी कठोर वागते,तसाच आज निसर्ग माणसा बरोबर वागत आहे.लौकरच तो ह्या विळख्यातून माणसाला बाहेर काढेल पण आता तरी माणसाने सुधारण्याची खूप गरज आहे अन्यथा निसर्गाचा अखेरचा घाला खूप भयंकर असेल.

धन्यवाद.....!!!!

No comments:

Post a Comment