मराठी कविता संग्रह – Marathi Kavita
Marathi Poem
मराठी सप्तसूर कविता
सप्तसुरांच्या येती लहरी
अरे माणसा मार भरारी
भरारीचे वादळ सारे
या जगी तू बोल खरे
खरे बोलूनिया जो-तो गेला
म्हणून या या जगी अमर झाला
अमर वाणी निघे मुखातुनी
म्हणून गाऊ गोड गाणी
गाण्याची झाली मधुर गीते
सुमनाने उधळु फुले इथे
कळीची ही फुले झाली
वाढत गेल्या फुलांच्या वेली
फुले म्हणाली देवाला
माझा नमस्कार पहिल्यांदा तुम्हाला
– संतुझा
एकांतवास कविता
एकांतवास होता छान
रंगाचा मुखडा गोरा पान
सांगत गेली ती सांगत
बसली होती अशी पंगत
नववतीचा रंग निराळा
होऊ आपण सारे गोळा
इंद्रधनुचे सप्तरंग
भिजून गेले माझे अंग
सारे मिळून सांगू त्याला
काय रे झाले माझ्या मुला
– संतुझा
उन्हाळा मराठी कविता – Summer Season Poem in Marathi
उन्हाची आली गरम लहर
माणसाने केला जिवाचा कहर
माणूस म्हणतो उन्हाला काय हा थकवा
गरम पणाचा आम्हाला आलात चकवा
गरमपणा आम्हालाच सोशिना आता
टेकवतो मी तुझ्या पुढे हा माथा
माणूस म्हणतो उन्हाला हे लेकरू घे पोटात
उन्ह म्हणते माणसाला आपण सर्व मिळून जेवूया ताटात
माणूस म्हणतो उन्हाला तू ऐकून घे जरा
आम्ही करणार नाही असा नखरा
माणूस म्हणतो उन्हाची झळ नको बाबा आम्हाला
यश दे तू आमच्या कामाला
यश दिले सूर्याच्या उन्हाने
जग जिंकले आपल्या मनाने
– संतुझा
झोप मराठी कविता – Sleep Poem in Marathi
झोप काळाची बहीण
तिचे नाव चांडाळीन
ते बेशुधीचे आवरणा
हे आहे आळस पणाचे लक्षण
झोप करते खानाखून
झोप करते शरीराचे भक्षण
झोप काळाची बहीण
तिचे नाव चांडाळीन
झोपेचा हा ओघ निराळा
आळसपणा हा करा वेगळा
पाहतो तो पांढरा बगळा
झोपेचा हा खेळ वेगळा
झोपे वरती बंधन ठेवा
देव देईल तुम्हाला दुवा
झोप काळाची बहीण
तिचे नाव चांडाळीन
– संतुझा
शूर मराठे कविता
शूर मराठे सह्याद्रीचे
डोंगर माथे खणूनी खाचे
त्यामध्ये एक वीर जन्मला
शिवनेरी वर शिवबा आला
मराठी राज्य स्थापन करण्या
परकीयांना झोकून देण्या
परकीयांची होती सत्ता
रयतेला कोणी वाली नव्हता
म्हणून आले शिवबा आता
रयतेला मिळाला असा त्राता
मिटून गेली रयतेची चिंता
सांगतो मी शिवबा आता
स्वराज्य रक्षण कर हे नाथा
म्हणून वंदन करतो आता
रयतेचा शिवबा वाली होता
हरपून गेली रयतेची चिंता
– संतुझा
सूर्यास्त मराठी कविता – Sunset Poem in Marathi
सूर्यास्त होताच अंधार पडला
अंधाराचा अंत नाही कुणाला कळला
येथेच मानवला रस्ता नाही वळला
पूर्ण माणुसकीचा संगं नाही जुळला
अंधाराची माणूस चालतो वाट
स्वार्थासाठी माणूसपणाची काढतो काट
म्हणूनच झाली नाही मानवाला सज्जनाची भेट
चाल तू तुझ्या रस्त्याने चांगली वाट
सूर्योदय दाखवितो तुला चांगला दिवा
मानवा तू त्यामध्ये रस घे नवा
अंधारात नको तू करू हेवा
उजेडाचा घे तू असाच ठेवा
जगतारण्या जो तो आला
जगाचा उद्धार करण्या भूमीहीन झाला
अंधाराशी नको तुझी मैत्री
अशी लागेल तुझ्या देहाला कात्री
– संतुझा
गरिबी मराठी कविता – Poverty Poem in Marathi
गरीबी घालवू या देशाततून
मुक्त होऊ या पाशातून
पाच लावू नका गरिबाला
सांगतो मी या माणसाला
माणूस करतो आपले ते खरे
श्रीमंतीला करितो हात वारे
बोला तुम्ही या जगी खरे
माणसातील माणूसपण जागवारे
गरिबीची दुनिया नष्ट करू
आपण सारे मिळून कष्ट करू
कष्टाचे होईल असे सोने
आनंदाने गाऊ कष्टाचे गोड गाणे
आपण सुख संपन्न होऊ
गरिबीला आपण पळवून लावू
दारिद्र्याचा आपण नाश करू
सुख समृद्धीचा ध्यास धरू
– संतुझा
नित्याचा वाली आहे परमेश्वर – Marathi God Poems
नित्याचा वाली आहे परमेश्वर
म्हणून आहे तो सुंदर
घेऊ देवाजीचे नाव
होईल सुंदर ते गाव
जाऊ देवाचिया गावा
देव देईल विसावा
करू देवाजीचे ध्यान
होईल शांत आपुले मन
करू देवाचे भजन
गावू देवाचे गुणगान
देवा सांगू सुख दुःख
देव निवारीला भूख
गेलो देवाचीया ठाई
तिथे आमची विठाई
लावून कपाळी बुक्का
देहु वरूनी आला पंढरपूरी तुका
– संतुझा
एकांतवास २ मराठी कविता
एकांतवास होता छान
करू आपण देवाचे ध्यान
देव देईल तुम्हाला सद्बुद्धी
देवाची करू आपण विधी
देवाची करू आपण प्रार्थना
सद्बुद्धी दे तू सर्वजना
देव देईल तुम्हाला विसावा
म्हणून देवासाठी एकांतवास हवा
एकांतवासाने मन होते शुद्ध
म्हणून उभे ते महावीर व बुद्ध
महावीर व बुद्धांनी दिली चांगली शिकवण
आपण गाऊ त्यांचे गुणगान
सर्वांसाठी आम्ही करितो प्रार्थना
सद्बुद्धी दे तू नारायणा
– संतुझा
ऋणानुबंध मराठी कविता
ऋणानुबंध असता आपुल्या आईचे
सदैव प्रेम पाठीवरती माय बापाचे
जिन्हे केला आपल्या मुलांसाठी हाताचा पाळणा
माय म्हणते मुलांसाठी बाळ का खेळेना
तिन्हे केला लेकरासाठी जिवाचा कहर
म्हणून बाळ दिसते ते असे सुंदर
आईने केले ह्र्यदयापोटी असे उपकार
बाळा तू कर त्या आईच्या उपकाराचा स्वीकार
माया ममतेने आईने वाढविले तुला
जपून खेळ रे तू माझ्या मुला
आईचे ऋणानुबंध आहे तुझ्यावरती
पसरव या जगी तू आईची कीर्ती
आईच्या वास्तल्यामध्ये आहे तो ठेवा
म्हणून करू नकोस तू आईचा दुरावा
माऊलीच्या पोटी ज्याने जन्म घेतला
वास्तल्ये आईने सदैव दिले त्याला
जिने आपल्याला जन्म दिला तिचे आपण पांग फेडू
म्हणून आनदाने आईसाठी आपण हात जोडू
आई देईल तुम्हाला आनदाने आशीर्वाद
मनामध्ये ठेवू नका आई विषयी खेद
म्हणून आई देईल तुम्हाला चांगला आशीर्वाद
वाईट संगतीमुळे लेकरा होऊ नकोस बरबाद
आईची राख तू अशीच शान
म्हणून आईची उंचावेल अशीच मान
– संतुझा
मन मराठी कविता
जगास जिंकणे नवल नाही
प्रथम आपल्या मनास जिंका
चांगले वर्तन घडेल ते तुम्ही शिका
मन म्हणते मानवाला मला भरकटू देवू नका
अशाच प्रकारे समाजामध्ये होईल तुमचा त्रागा
म्हणून तुम्ही मनाला जरा न्याहाळून जरा बगा
चंचल मनाचा तुम्ही करू नका हेवा
त्यामध्ये मिळणार नाही तुम्हाला चांगला विसावा
चंचल मनाचा करू नका तुम्ही आस
सज्जन मनाचा धरा तुम्ही असाच ध्यास
आले मन करा तुम्ही असेच खंभीर
म्हणून मिळेल तुम्हाला चांगला आधार
स्वच्छतेणे करा तुम्ही मनाचा स्वीकार
म्हणून एकाग्र करू मनाचा हा भार
मन एकाग्रतेसाठी करू याचना
मिळेल आपुल्या मनाला आल्हाद पुन्हा पुन्हा
– संतुझा
रम्य देखावा
निसर्ग रम्य देखावा पहावयास हवा
आंदमय वातावरणात दिसतोय चांगला दिवा
दिव्याचा प्रकाश पडतो या जगी
चांगले गुण यावेत तुमच्या अंगी
करा तुम्ही आता चांगुलपणाचा ठेवा
घेऊ नका तुम्ही दुर्गुणाचा विसावा
तेजाने भरून आले सारे हे नभ
तुम्ही राखा तुमची अशीच हि ठेवा
निसर्ग देईल तुम्हाला असाच आसरा
जपून चल रे तू माझ्याच वासरा
वासरू चाले आईच्या संगे
आई व वासरू निसर्गामध्ये रंगे
– संतुझा
लेखन करा (साक्षरता) – Literacy Poem in Marathi
लेखन करा साध्य करा
उमगेल आपल्या अंगी अभ्यासी झरा
अभ्यास करून जो तो गेला
म्हणून या जगी सत्पुरुष झाला
सत्पुरुषाच्या अंगी उमगतो द्यानियाचा झरा
तुम्ही सर्व जनतेला सावरा
जनता करा तुम्ही महान
भारत देश आपुला होईल छान
साक्षरतेचा प्रसार करू
निरक्षरतेचा नाश करू
संयमतेने आपण अभ्यास करू
यशाची आपण कास धरू
अभ्यासी वृत्ती अंगी धरू
अभ्यास करण्याचा आपण वसा घेवू
जिद्दीने घेऊ अभ्यासी भरारी
जीवन तुमचे होईल साक्षात्कारी
कर्म करुनी जो तो गेला
म्हणुनी या जगी तो सफल झाला
अशी आहे अभ्यासी कला
तिला आपण सावरू चला
– संतुझा
दीपस्तंभ समाज
दिवा आपण जळूनी प्रकाश देतो नवा
म्हणून या समाजामध्ये चांगला आदर हवा
आदर पणाचे आपण घेउनिया जगी हे लेणे
समाजातील माणुसकीला आपण करू शहाणे
दिव्यासारखे जळूनिया प्रकाश द्या तुम्ही
समाजामध्ये पडणार नाही तुम्हाला काही कमी
दिव्यासारखे लख्ख तेजस्वी व्हा तुम्ही
म्हणून देतो मी तुम्हाला यशाची हमी
दिव्यासारखे प्रकाशीत होऊन समाज चांगला घडवू
समाजातील माणुसकीचा झेंडा उंच फडकवू
समाज सुधारण्यासाठी आपण घेऊया हा वसा
समाज कंठकांना देवू चांगला हा ठोसा
दीपस्तंभासारखा आपण समाज हा घडवू
अंधारातल्या समाज कंठकांना असेच आपण रडवू
– संतुझा
भ्रष्टाचार कविता मराठी – Corruption Poem in Marathi
भ्रष्टाचार माजलाय या जगी किर
गरिबांना यातना होतात कार
श्रीमंतीला सावरण्या जो तो आला
गरिबीला तारण्या कोणी नाही गेला
अशीच आहे जगताची भ्रष्टाचार कथा
काय सांगू अशी हि गरीबीची व्यथा
गरीबीला नाही चांगला कायदा
श्रीमंतीला होतो त्याचा हा फायदा
गुलामीचे जीवन जगतो आहे गरीब
श्रीमंत मात्र जाऊ देत नाही आब
गरीब झिजतो आहे वितभर पोटासाठी
श्रीमंत लागतो पैशाच्या पाठी
गरीब खातो कांदा भाकर
श्रीमंत खातो मेवा साखर
करू नका तुम्ही भ्रष्टाचार वाद
सुख संपन्नतेचा ऐकू येईल साद
– संतुझा
बाळ – Marathi Bal Kavita
कोवळ्या उन्हात चालते हे बाळ
पायी वाजते हे खूळ खूळ चाळ
बाळासाठी गाते आई हि अंगाई
बाळ पाहुनी आई आनंदमय होई
गोजिरे बाळ चाले दुडूदुडू
बाळासाठी आई देते हे लाडू
लाडू खाण्यासाठी बाळ येतो झरझरा
आई म्हणते बाळा गाते जरा
कोवळ्या उन्हाची लडिवाळ किरणे
बाळासाठी आई गाते गोड गाणे
– संतुझा
तरुणपण मराठी कविता
तरुणपणाचे लेऊनिया लेणे
माणुसकीचे गाऊया असेच गाणे
होऊया आपण सर्वजण शहाणे
करू नका असे तुम्हीच बहाणे
आंनदमय होऊ आपण चला
सुंदर जग हे बनवण्याला
सुंदर जगामध्ये या लाऊ आपण वृक्ष
आपण सर्व मिळूनी होऊ चला दक्ष
दक्षतेने आपण अभ्यास करू चला
पर्यावरणाची कास धरू मुला
पर्यावरणाला येईल अशीच कळा
म्हणून माणसा माणूसकिला सांभाळा तुम्ही
पर्यावरणाला आपण सारेजण तारू
सदैव सृष्टीचे आपण मिळूनी रक्षण करू
रोगराईचा आपण करू नाश
जीवाला लागणार नाही असाच फास
– संतुझा
विठ्ठूमाउली – Motivational Marathi Kavita
संगतीच्या तालावरती नाचत होता हरी
माझा सखा पांडुरंग आहे पंढरपुरी
नाचत येतो वारकऱ्यांचा असा हा ही मेळा
लाविला भक्तांसाठी विठ्ठूरायाने लळा
अभंगात वीठ्ठू नाचतो भक्तांच्या संगे
भजनात विठ्ठू डोलतो भक्तांमध्ये रंगे
करा तुम्ही सदैव चिंतन विठ्ठू माउलीचे
पाप नष्ट होऊन जाईल आता सारे तुमचे
भक्तासाठी विठ्ठू माउली आली तुमच्या दारी
प्रसन्न मुद्रेने नाम घेतो सदैव तुमचे हरी
पुंडलिकासाठी तू उभा आहेस एका विटेवरी
ज्ञानाचा तू ठेवा पोचविला सर्वांच्या तू हि परी
सदैव तुमचे चिंतन आमच्या हृदयामध्ये असुदे
तुझेच आमच्या अंत:करणी नाम हे वसुदे
अशीच आहे देवा तुझी पंढरपुरी लीला
म्हणून विठ्ठला भजण्या वारकऱ्याणो पंढरपुरी चला
– संतुझा
फुलांची कविता – Fulanchi Kavita
फुलातील परागकण दिसतील कसे साजरे
म्हणून फुल सुंदर दिसती असे गोजिरे
सुंदर बागेतील सुंदर फुले
म्हणून सुंदर बागेत जमतील मुले
निसर्गाने दिले फुलाला वरदान
फुल दिसते असे छान
फुलाचे आहे असेच महत्व
देवांचे आहे फुलामध्ये सत्व
सत्वासाठी देव धावुनी येई
फुलातील वास दरवळत राही
देवासाठी आपण फुल वाहू
सदैव आपण आंनदमय होऊ
आनंदमय होऊन गाऊ फुलांचे गाणे
देव देईल तुम्हाला चांगले देणे
मन तुमचे तुम्ही प्रसन्न करा
तुम्ही फुलाचा आसरा
फुलातुनी चांगला दरवळे वास देवावरती
घेता येईल तुम्हाला चांगला श्वास
– संतुझा
शेतकरी मराठी कविता – Farmer Poem in Marathi
शेतकरी शेतात राबून करितो चांगले कष्ट
करू नका तुम्ही सारे पिक गुरे घालूनी नष्ट
शेतकरी आहे म्हणून आपण खातो भाजी भाकर
पण शेतकऱ्याच्या जीवावर सावकार खातो मेवा साखर
शेतकऱ्याच्या मालाला नाही चांगला भाव
सावकार करतो शेतकऱ्यावर अरेराव
सावकाराच्या मालाला किंमत फार
शेतकऱ्यावर करतो सावकार अत्याचार
करतो लुटालूट शेतकऱ्याची
भरितो गोण्या आपल्या मालाची
काबाडकष्ट करुनी शेतकरी खातो
सावकार मात्र आरामात राहतो
काळजीचे डोंगर शेतकर्यांच्या पाई
शेतकऱ्याला कोणी आधार नाही
– संतुझा
वेदना कविता मराठी – Heart Touching Poem in Marathi
काटे बोचतात पायी
वेदना होतात काही
वेदानाने त्रस्त होते मन
मेंदू करितो खाणाखुण
संयमतेने तुम्ही चला
नेहमी तुम्ही खरे बोला
संयमता येईल तुमच्या मनी
तुम्ही व्हा चांगले ज्ञानी
ज्ञानाचा घ्या तुम्ही वसा
खरे बोलण्याचा उमठवा ठसा
ज्ञानी तुम्ही लागेल गोडी
अज्ञानी तुम्ही करू नका जोडी
संयमतेने आपण राहू
प्रेमळपणाचे गुणगान गाऊ
– संतुझा
पाऊस मराठी कविता – Paus Marathi Kavita
पाऊस पडतो सर सर सर
झाडे बोलती भर भर भर
गिरक्या घेऊन झाडे वेली
आनंदाने नाचत आली
पाऊस पडतो अंगणी छान
झाडे वेली होतील महान
टप टप पाऊस पडे वळवाचा
म्हणून तुम्ही आनंदाने नाचा
आनंद होईल तुमच्या मनी
होऊन जाल तुम्ही गुणी
पावसासारखे तुम्ही व्हा
आनंदाने सर्वांना सुख द्या
पावसाची सर येती झर झर
पाहून घेवा पाण्याची लहरे
पाऊस सावरण्यासाठी झाडे लावा
निसर्ग देईल तुम्हाला दुवा
– संतुझा
श्रावण कविता
श्रावणाच्या येतील झर झर धारा
फुलाचा चहूकडे दरवळ सारा
श्रावणातील असती दिवस सुंदर
घ्या तुम्ही परमेश्वराचा नितांत आधार
देवाचे करा तुम्ही चांगले चिंतन
मनामध्ये ठेवा प्रभूचे ध्यान
तोच आहे श्रावणी झरा
श्रावणातील फुलाचा दरवळ आहे खरा
सगळेच मिळूनी तृप्त होऊ
आनंदाने श्रावणी गाणे गाऊ
मन रमेल आनंदाने
आपण होऊ सगळे शहाणे
– संतुझा
रणशिंग आम्ही फुंकू
कोलंबस जरी नसलो
तरी किनारा आम्ही जिंकू
शिखर जरी नसले
तरी पायथा आम्ही पकडू!
जिद्दही तारुण्यातील
निशाण आम्ही दाऊ
मधुर वाणी नसतांनाही
शब्द आम्ही फेकू
मनेच तुमची जिंकू
रणशिंग आम्ही फुंकू
–अशोक बुधाजी दळवी
खंत
थोरल्या गावची थोरली अन्नावाचून वारली
पाहण्यास समधी भोळी भाबडी आली
लेकी सुनांनीतर टाहो फोडला
गावच्या गावड्यांनी तर स्तुतीपाठ केला
रित लागण्यासाठी समदं गोळा झालं
धोतर, फडकं, मडकं तिच्या भावानं आणलं
तयारी झाल्यावर तिरडी उचलली
अनवानी पायांनी ती वेशींवर परतली
सर्व जहाले तिरडी मशानी धडकली
स्मशानात थोरल्याने अग्नी देऊन टाकली
काही दिवसांनी पिंड तयार जाहला
पिंडाला म्हणे कावळा नाही शिवला
शेजारी पाजाऱ्यांनी मग आश्वासने दिली
टपून बसल्या कावळ्याची मग जास्तच मजा झाली
घरात म्हातारीला कोन्ही नाहीच पाहिलं
शिळ्या तुकड्याशिवाय काहीच नाही दिलं
पिंडावर मात्र अंड्याहुनी काही
–अशोक बुधाजी दळवी
ब्रह्मचारी म्हणून मिरवायचं
तारुण्यातील मिसुरडी पोरं आम्ही
तरुणपण का दाबायचं ?
कुठे सूत जुळतं का बघायचं
न्हाय तर हायच आपलं
ब्रह्मचारी म्हणून मिरवायचं!
मागून मागून फिरायचं
जमल्यास तिलाही फिरवायचं
आतमध्ये घुसून
भिंतीलाही टेकायचं
जमलं नाही तर उठायचं
न्हायतर हायच आपलं
ब्रह्मचारी म्हणून मिरवायचं
आडून आडून बघायचं
जमल्यास डोळा मारायचं
कुठे बाहु गर्दीत गाठून
हळूच ओढणी ओढायचं
अन् गालावर गणपती उठल्यावर
ताई म्हणून ओरडायचं
न्हायतर हायच आपलं
ब्रह्मचारी म्हणून मिरवायचं
–अशोक बुधाजी दळवी
घाव
जिव्हारी घाव घालून
जेव्हा
मेंदूला येढ लाविलस
तेव्हा तेव्हाच
येड्यावानी
तुझ तुणतुणं वाजवत व्हतो
माझी प्रिया
फक्त माझीच
म्हणून दावा लावित व्हतो
तुझीच मुद्रा
छातीला कवटाळून
कधी ओठाला टेकवत
समाधान करत व्हतो
ओल्या काठावर
जिथे एकमेकांचे
कुरळे केस
कुरवाळत व्हतो तिथच जळाला
तुझा महिमा गात होतो
रेतीतील
पाऊल खुणा ओळखत
आता स्वतःलाच सावरतो
तुझ्या पापणीच्या
इशाऱ्यावर नाचणारा
मीहि एक अभागी
–अशोक बुधाजी दळवी
नोकर माझ्या दारावर
उमटत्या ज्वानीवर नजर खिळता
फिदा झालो मी तुझ्यावर
अन् पहिल्याच भेटीत
हात टाकलिस खांद्यावर
तवा वाटलं नव्हतं
तुझं ओझं पडेल माझ्यावर
आणि दुखणं येईल
गुडघ्यावर
अग तवा तवाच उडाया लागली
जीभ माझीच ओठावर
तवाच मूठ दाबून म्हटलीस
येशील ना माडीवर
माडी चढत मनात म्हटलं
अग माडीवरच का येईन मी क्षितीजावर
तवाच हातात कॅरीबॅग अन् चिटकोरा देत
म्हटलीस येवढे उपकार कर या राणीवर
ही ज्वानी फिदा होईल माझ्या राजावर
चिल्लर नाहीत ना तुझ्याकडे
कशाला नजर पर्सवर
पाकीट गरम असता खिशात माझ्या
हजार उधळीन ग तुझ्यावर
गजरा, सेंट, लिपस्टीक, साडी
पदरानं आणल भरभर
चढण्यास उतावळा मी माडीवर
मनात वाटलं सुवागरात होणार
पाच वर्षाच्या आळणीवर
साठ पगार उधळलेत ना मी तुझ्यावर
अन् ज्वानीची ऊब दाखवून
निभवून टाकलीस आजवर हातावर
वाटलं आता तप
पूर्णत्वाला जाणार
याच क्षणाच्या मुहूर्तावर
पण याच क्षणाला धस्स झालं
अग तुच तुझा सौदा करीत होतीस
साठ हजाराच्या शेठवर माझ्या समोर त्याने पुसता
सांगून टाकलीस
हा नोकर माझ्या दारावर!
–अशोक बुधाजी दळवी
निशाण तुटले, वादळ उठले!
निशाण तुटले
वादळ उठले
बुझले
मातीतील ही झरे
कड्कड् कड्कड्
दुभंग ज्वाला
सरसर सरसर
कोलहाल मग
कडाड
कोसळती अंबरे
गुदमरल्या त्या
रानवेली
क्षणात विरल्या
धुंद अबोली
चहू बाजूला
मशान सडे
पतन होता दृष्टीपथावर
गढूळ झाल्या स्मृतीपटला
भान हरपता
बेभान होऊनी
टाहो फोडती
जीव भाबडे
–अशोक बुधाजी दळवी
माझ्या गावचा माणूस – marathi kavita on village
गळ घालतो रानात
माझ्या गावचा माणूस
घाम विरतो मातीत
माथा तापतो उन्हात
माझ्या गावचा माणूस
संथ सरितेचा भास
मन गुंतले प्रवाही
दिस मोजतो बांधात
माझ्या गावचा माणूस
दिसे आदर स्वरात
कधी भासतो मवाळ
कधी बंडाळ जहाल
माझ्या गावचा माणूस
बघा शोभतो दंडात
संत फाटले अंगात
रक्त सळसळते धमणीत
माझ्या गावचा माणूस
वेडा नाचे कीर्तनात
तानभूक हरपून
दंग टाळ गजरात
मनी विठ्ठलाचा ध्यास
–अशोक बुधाजी दळवी
पोटाची आग विझवताना – heart touching marathi kavita on life
पोटाची आग विझवताना
धाय मोकलून रडत होती
लेकराच्या जगण्यासाठी!
भुकेसाठी तान्ही तिच्या
कोरड्या उराला झटत होती
खरं तर तिला
जगण्याची उमेदच नव्हती
कुंकू पुसले तेव्हाच
कोरडी विहीर
तिला खुणावत होती ॥धृ॥
कटी खांद्यावर चार तान्ही
माय माय म्हणूनी
झुरत होती
पोटाची आग विझवताना
धाय मोकलून रडत होती
आसवे गिळून
पाण्यावरती
आर्धीही भूक शमत नव्हती
कुशी कडेवर निष्पाप
रक्ताचा गोळा सावरत
दारोदार फिरत होती
कुणी दिल्या शिळ्या तुकड्यावर
दारिद्र्यात रात संपत
होती पोटाची आग विझवताना
धाय मोकलून रडत होती
जिवंतपणी मरणाची
कहानी अजून संपली नव्हती
सडक्या कुजक्या अन्नाने
दोन लेकरे संपली होती;
ऊरली दोन तान्ही मात्र
अनाथ आश्रमाच्या नावाने
कुणीतरी विकली होती आता मात्र खरंच
तिला कोरडी विहीर
मोकळी होती
पोटाची आग विझवताना
धाय मोकलून रडत होती
शेवटच्या क्षणी
तिची वाट कुणी
आडवली होती
चार चाकी गाडीत
मारून मुटकुन कोंबली होती
जबरदस्तीने कोणीतरी काया तिची धरली
क्षणात समाज विकृतीला
जिवंतपणी फसलेली
पोटाची आग विझवताना
सर्वस्व हरवून बसली होती!
–अशोक बुधाजी दळवी
दुखणी – sad kavita marathi
सगळीच दुखणी
अंगावरची
मस्तकाला भिन्न करून
अंतःकरण कुरतडणारी
रक्ताच्या थेंबा थेंबात
उपद्रव्यापच
पेशींना पोखरणारी
कोणी ऐकावे कुणाचे?
तेवढेच समाधान
मना मनाचे
भोग सारे
क्षणाक्षणाचे भोगावे
निःसंकोच दुःखाचे
शेवटी आत्मा अमर
आत्म्याविना देह
निर्जीव!
अडसर गाठोडे
–अशोक बुधाजी दळवी
निवडणुकीच्या रणधुमाळीने – marathi kavita on politics
निवडणुकीची रणधुमाळी
वाजत होती
आणि कधी नव्हेते
रस्त्याची धूळ हवेतून
चालू लागली
विकृत सापानी
स्वतःच्या विषारी फणकाऱ्याने अर्ध्या अर्ध्या माझ्या
भोळ्या जनाला भिन्न केलं अन माझ्या
भोळ्या गावच कोकण
त्याच्या बोलण्याला आणि
पैशाला भुलून
गावावरच नांगर
फिरवून घेत होतं
हाताने आणि सूर्याने गावच्या बंधुचे डोळे
आंधळे केले
आणि
चव्हाट्यावरचे देवतेचे
प्रतीक असलेले दगडही
कलंकित झाले
कुणा छपरावरून
कुणाचे माथेही फुटले
स्वबांधवात वैमनस्य पेटले
पुराव्यादाखल
चव्हाट्यावरचे दगडही कचेरीत पडले
आणि आजतागायत
आपापसातील वैमनयस्यामुळे
निर्जीव त्या,
दगडांनाही लाजवून गेले
–अशोक बुधाजी दळवी
पहिल्या पावसाच्या सरी – pahila paus marathi kavita
पहिल्या पावसाच्या सरी
जीवे ओलीचिंब करी
बोले न्हाऊ घातले
आनंद लहरी उभारी!
चिवचिव सूर मोकळे
पंख बोलती रानात
दव साचले पंखात
चोच बोबडी चोचीत
पहिल्या पावसाच्या सरी
धेनू रानात हंबरे
कंप अंगात पसरे
धूम ठोकून वाटेत
दारी पाऊलांची खूण
पहिल्या पावसाची सरी
सूर्य झोपला कुशीत
धुके पसरूनी हात
वारा नाचतो मजेत
सारी धांदल मनात
पहिल्या पावसाच्या सरी
–अशोक बुधाजी दळवी
रानात – ranvedi marathi kavita
दूर रानात रानात
वेलीवर घेते कोणी
झुले!
दूर चांदणी नभात
डुले !
मेघ गुर्जुन
आरूढ झाले
उभ्या पिकात
चिवचिव
सूर हर्षून गेले
कुठे चाहूल
जीवा लागली
फडफड सुसाट
वाऱ्यावर हले!
–अशोक बुधाजी दळवी
चाहूल
अंधार दाटलेला
अंधार दाटलेला
दिसे डोह पेटलेला
पेटलेला
दव साचले साचले
मनी पंख
झोपलेले
लता वेटोळी बुंदयाच्या ऊबेला
पर्ने चिंब मातीत
पहुडलेली
पाय दुमडुनी
कुशीला
धुके मजेत
बेभान
जवळी तेजकाळ
येऊनी टेपलेला
–अशोक बुधाजी दळवी
असे वेगळे
असे नव्हते कधी
आले वाट्याला दिवस
वेड्या मनाला बोचत राहिलेले
दुःख वेगळे होते
आणि सुखही वेगळे होते
क्षणभंगुर मनाचे
द्वंद्व ही आगळे होते
सोबतीला आता
मनाच्या आणि शरीराच्याही
आपले स्वतःचे बंध प्रेमाचे
आले असे वाटते
मन थोडे कमजोर
झाले ही असेल
पन विश्वसारे वाट्याला
आले असे वाटते
–अशोक बुधाजी दळवी
खुशाली – marathi kavita on love
किती दिसानी का असेना?
पुसलीस मज खुशाली
आणि
डबडबते पाणावलेले डोळे पाहुन
पूर्वाश्रमीची ती
कोमेजलेले भावना
ताजेतवाने होईल
असच वाटलं
पण
मी कसा आहे?
हेही तुला कळलच नाही
म्हणूनच टपकले
अश्रू पाहूनही
कसा आहेस म्हणून
पुसलीस
आणत्या क्षणी जसी
वाऱ्यांवर भिरकटायला
सोडून गेल्यावर जे नयन
ओसंडून सजलेले सुखलेले
त्यांना पुन्हा ओलं करायला
भाग पाडलंस
आणि असाच आहे मी
त्यावेळचा वेडा
म्हणायला ही लाविलस!
–अशोक बुधाजी दळवी
फडफडतांना वाऱ्यावर – paryavaran kavita in marathi
फडफडतांना वाऱ्यावर
उंच उभ्या ह्या सड्यावर
विरह स्तंभमिच!
मातीत पद रोवून
स्मरण कशाचे
मन भ्रमणात
मी येते मिलनात
प्रेम सागरात डुंबून जाऊ
कधी गेलीस सोडून वनात
बधीर मस्तक
फिरतांना आता
एकदाच सोडून
तरी ये
मज तपोवनात!
–अशोक बुधाजी दळवी
भुकेले – marathi kavita garibi
सगळेच भुकेले
वेडे जीव
कुणा वाटेना
मातीची किंव
जो तो पसरून
स्वपसारा
क्षणात नोंदतो
डायरी उतारा
आणि मग हुकमाची खूण
जो आला रुळला
पण,
जातांनाही तुकड्याची
खूण
लेकूर बसले
बांध आडवून
हाणामारी अन्
रक्ताची धून
बाप वरून पहातो
आसवे गाळून
(मनात)
तेंव्हाच बसलो असतो
आणि दहा कोस अडवून बडे जीव!
तर पाहिली नसती
लेकरांच्या रक्ताची खूण
सगळेच भुकेले
–अशोक बुधाजी दळवी
दुःख – marathi dukhi kavita
जन्मास येऊनी व्यर्थ
धुसर हेही हसायचे
भंग-भंग ह्या दुभंग ठायी
कितीदा हो रडायचे
जनास काय त्याचे
रोजचेच ह्याचे रडगाणे
अहो,
ज्याच्या पाई काटे ना
रक्त तयाचे भळभळे
सुर सोबती पाखरांचे
सुंदर ह्या बनाबनातले
सूर न कंठात ह्या
देह अधारी आडोसी
टेकले सडले गाठोडे
–अशोक बुधाजी दळवी
कोणी सोसावे हे दुःख – marathi kavita on sadness
कोणी सोसावे हे दुःख
रक्त नासले अंगात
सरले स्वप्नांचे कैलास
ऊरले धुसर हो भास
कोणी सोसावे हे दुःख
जहालि मनगटे लाचार
शिर झुरते बेचार
किडे वळवळती मेंदूत
पोटी आतड्यांचा हो भार
कोणी सोसावे हे दुःख
डोळे ओकती हो रक्त
तोंड माखले फेसात
न हुंगले हो श्वान
देह सडला मातीत
कोणी सोसावे हे दुःख
नको नरक यातना
रोगी कष्टी त्या जना
करू विधात्या प्रार्थना
क्षणभंगुर ह्या जिना
कोणी सोसावे हे दुःख
–अशोक बुधाजी दळवी
कशास गाता धर्माचे नारे! – marathi kavita on caste make u cry
कशास गाता
धर्माचे नारे
स्वः स्वकियांच्या
पायी पेरून निखारे
स्वमाय भगिनीवर
तुटून पडता कावळे
निघताना नग्न धिंडोळे
बघेच धर्म सारे
करूनी हुकमांचे फवारे
निघले स्वातंत्र्याचे वाभाडे
संपलेत कधी आजवर अश्रू?
जुलमी गुलामी ते वारे
ऊर बडवूनी कित्येक भाबडे
पहाती आवाचुनी
तोकड्या आशेकडे
कधी मातीही गिळती
नयन अंबराकडे!
–अशोक बुधाजी दळवी
झुळूकशा वाऱ्याने – paryavaran marathi kavita
झुळुकशा वाऱ्याने
अंग अंग न्हावून उठले
उबदार किरणांनी
मग लोकरीत लपेटले
साचले दंव
शृंगारून उठले
झुकते नवतरू मग
रोमांचून गेले
दडपलेल्या वेलीनी
अंग मोकळे केले
डोकवणाऱ्या वेणीवर
किरण दीप चमकले
–अशोक बुधाजी दळवी
इंद्रायणीच्या काठी – nadi kavita marathi
इंद्रायणीच्या काठी
निष्ठुर धडधडले
ज्ञानपीठ तरंगता
निळाई डोहावरती
कर्मठ आवाक झाले
कोणी अश्रू ढाळूनी
लोटांगण घातले
तुक्याच्या चरणी
आजवरचे दुराचारीपण
तेथेच सोडीले
आणि देव मानूनी
तुक्याच्या संगतीत
सज्जन झाले
–अशोक बुधाजी दळवी
प्रीतीचे लव्हाळे – marathi kavita on love
मनातूनी आले
हृदयातूनी पाझरले
कळीकळीतूनी फुलले
प्रीतीचे लव्हाळे!
शब्दातूनी ओकले
नयनातूनी दीपले
हृदयाच्या काठी
दाटी वाटीने डोकावले!
कधी कठोर होता होता
नम्र जाहले
मुख नया रसाला
पुन्हा भिडले!
–अशोक बुधाजी दळवी
नकोस
वेळी अवेळी
अविचारात घुमसटून
स्व अनर्थ
ओढवू नकोसा
रुद्राक्षांच्या
भडकत्या भ्रमिष्ट ज्वाला
तर, उभा तेथे तू
राहू नकोसा
कपटी साधून संधी
जोडतील हात समोर
तर हात हाती त्यांच्या
घालू नकोसा
ज्योत पेटते
चिमुकली सत्याची
तया संगतीस तू
विसरू नकोस!
–अशोक बुधाजी दळवी
धर्मपुजारी ऐका – marathi kavita on dharm ani shantata
धर्मपुजारी ऐका
तुमचा धर्मच बुडवून टाका
कशास हवी कटकट त्याची
कशास त्या पळवाटा
भोंदूपणी आळवून गाणी
आजवर पोटच वाढवत आला
पण सांभाळा त्या टंबोऱ्याला
कोणीतरी घालतील पिसाळून घाला
माणुसकीची चिरफाड करूनी
स्वःस्वार्थ साधून बसला
पण आवरा असलेल्या स्वार्थाला
तुमच्या शेवटास केव्हाच उद्रेक जन्मला!
–अशोक बुधाजी दळवी
कुणास न पुसावे – dukh marathi kavita
दैव ते हाती कुणाचे
कुणास न पुसावे
आयुष्याच्या एकांताला
एकट्यानेच कुरवळावे
का हे दुःख म्हणून
हताश न व्हावे
आयुष्याच्या एकांतात
तेही भोगत रहावे
पुसण्यास आसवे येईल कोणी
म्हणूनी झुरत न रहावे
टपकत्या अश्रुंना आवरत
स्वगीत आळवावे
चंद्र, तारे येणार सोबती
म्हणूनी आशेवर न जगावे
असल्या अंधार कोठडीत
चांदणे बरसले समजावे
–अशोक बुधाजी दळवी
संसार – marathi kavita on sansar
संसार नव्हे भातुकलीचा खेळ
जो असतो म्हणा सदैव सुखी
संसार आहे प्रेमाचं घरटं
प्रेमाच्या बंधनात बांधावं लागतं
कधी चोचीने भरवावं लागतं
तर कधी उपाशी रहावं लागतं
सदैव येतील सुगरणीचे दिस
असेही नाही
कधी कावळ्याप्रमाणे
जाडजुड काट्यात ही विसावं लागतं
जुळतील जेंव्हा हे बंध प्रेमाचे
तेंव्हाच फुलझाड बहरते
येणाऱ्या कळ्यांना, अंकुरान
पोसण्यास समर्थ ठरते
–अशोक बुधाजी दळवी
प्रणाम बांधवांनो – marathi kavita on brother
धगधगत्या अग्निकुंडातुनी
विरतेच्या विजयी ज्योती
गगनचिंबू लागल्या
अन् मातृभूमीचा कणकण अवयव
सुखरूप येऊ लागला
स्वप्राण घेऊन हाती
संकट पिटाळले वीरपुत्रांनो
स्वआहुती देऊन
रक्त सांडूनी बाहुतूनी
शिंदूर ताठ ठेवीलात
रात्रंदिवस जागूनीही
निशाण योग्य लाविलो
कधी सावरतांना पद ही घसरले
डळमळता थरथरता हिमालय
तरीही सावरलात
आठवण येता स्वमातेची
डोळे ओले केलेत
तरीही कोटी सिंदूर राखण्यास
सरसावलात छातीठोक
उभे राहिलात तोफांपुढे
कोटी कोटी सदिच्छा घेऊन
वीर रक्त सरसावले लक्ष्याकडे
तेंव्हा भ्याड लांडगे पळू लागले
मोकाट तांडव गुहेकडे
तिरंगा तेंव्हा ललकारला
एक एक गिरीकडे
वाटते नतमस्तक व्हावे
तुमच्या आतुलनीय शौर्यापुढे
प्रणाम बांधवांनो प्रणाम!
–अशोक बुधाजी दळवी
प्रेमात गुंग होता – marathi prem kavita
प्रेमात गुंग होता
प्रणयात धुंद असता
मारु कशी भरारी
हृदयात मी भरकटता
इवले जरी किरण चमकले
थोपून आडव्या वाटा
पापणी जरी उघडली
येतोच समोर पडदा
प्रेमात गुंग होता
प्रणयात धुंद असता
काकुळले जरी हे शब्द
बधिर होतो कर्ण पडदा
उठले जरी हे पद
आडवा समोर काटा
प्रेमात गुंग होता
प्रणयात धुंद असता
हरपून भान सारे
पोटी असे उमळते
मारू कशी भरारी
हृदयात मी भरकटता
–अशोक बुधाजी दळवी
भावना विरही जगातुनी – marathi emotional kavita
भावना विरही जगातुनी
स्वतःलाच द्यावे पेटवून
एकदाच व्हावा नाश
जीवनाचा समजून
वाटत असेल ना
आपल्यालाच लाज
मग का राहू बंधनात डांबून
त्यापेक्षा देऊया बंधनच तोडून
आणि मुक्त करूया त्यांना
आमच्या लक्तरापासून
–अशोक बुधाजी दळवी
खरे हे ठरू दे – marathi kavita swapna
किती स्वप्न पाहिले परी मी
पण नखरे ठरले
मनाच्या एकांताने
हृदय माझे जाळीले ॥धृ॥
विश्वास ठेवूनी गडे मी
गात होते वेडे गाणे
हृदयाच्या पटलावरती
आजवर किती कोरले रखाने
दव दव बिंदूनी वितळलेली
काळजाची छाया
अतुरतेने सजना आता
गोठली ही माझी काया
किती स्वप्न पाहिले परी मी
पण खरे न ठरले
आयुष्याच्या शेवटाले
खरे हे ठरू दे
–अशोक बुधाजी दळवी
लगन कर – marathi lagna patrika wordings kavita
बा, बा माझं लगन कर
न्हायतर म्या जित्ता न्हाय राहणार बा !
न्हाय पोरा जरा थांब
गाठीला पैका ऊरू देत
मग बघू
न्हाय बा मग काय बघणार
आदूगर माझं लगन लाव
न्हायतर म्या आड्यात
उडी घेणार नाय जित्ता राहणार!
नग नग पोरा
अस येड्यावाणी करू नगस
करज काढतो
अन् लगन लावतो
पर उडी नगस घेऊ
माझं एकुलतं पोर तू
आणि तुझं लगन
लावणार न्हाय व्हय!
आणि तू येढ्यावाणी
उडी घातल्यावर
आम्हास कोण बघणार हाय
अन् नातवंड कोण
दाखवणार हाय
घाबरू नगस पोरा
करज काढतो जमीन इकतो
आणि तुझं लगन करतो!
–अशोक बुधाजी दळवी
काळजी
राहून राहून काळजी
बावरल्या मनांची
नटवेल्या फुलाची
चंदनी खोडाची
राहून राहून काळजी
तुटलेल्या क्षणाची
दूर उडत्या पाखरांची
डबडबत्या आसवांची
राहून राहून काळजी
मातीतल्या रानाची
कोसळत्या अंबराची
सुसाट वादळ वाऱ्याची
राहून राहून काळजी
तापत्या उन्हाची
बोडक्या माथ्याची
उदरी कळपाची
राहून राहून काळजी
कासवा गतीची
रखडल्या स्वप्नांची
क्षणभंगुर जीवनाची
–अशोक बुधाजी दळवी
डोळ्यात – marathi kavita on eyes
डोळ्यात उभी तू
राहू नकोस अशी
सांजवेळी रातकाळी
धरू एक दिशा कशी
डोळ्यात…
चांदणे हे हरवूनी गेले
मेघ सारे अच्छादलेले
धुके सभोवती पसरलेले
आसवे आता ओघळताना
डोळ्यात…
हृदयी समंदर
खवळूनी उठला
मन दुभंगुनी गेला
काठावर कर केसात घुसले
अटवू नकोस अशी
डोळ्यात…
कधी नव्हे त्या शांतराती
सोबत झाली पडछायेची
तुझ्या गुढ अढव विने
दूर लोटू नकोस अशी
डोळ्यात…
–अशोक बुधाजी दळवी
उल्हासुनी
सळसळतो वारा
उल्हासल्या डोंगर कपारी
नतमस्तक कुरणे
झरा, कोलांट्या उड्या,
फुलली देखणी झुडपे
वेल सळसळ वर चढे
थबकली डोंगरी दगडे
भासती देखणी मेंढरे
झुलती गडाड अंबरे
कडाड विजेचा इशारा
समध उसळल्या लाटा
श्वास रोखुनी किनारा
–अशोक बुधाजी दळवी
दुष्काळ – dushkal marathi kavita
नाही पीक, पाणी, चारा
धरणी ओसाड, फाटलेली
कुणा वैऱ्याच्या कोपात
निसर्गा तुझ व्याधीही जडली
शेतकरी माझा राजा होता
अशेवरती तुझ्या
पिके करपून गेली
गायी, म्हशी कोरड्या
तळ्यात पहुडली
पाहूनी बंधु राजे
गळ्या मंधी गळा घालुनी
रडती मायमेल्यावानी
कोणी तुकड्याला महाग
राजे झाले हो भिकारी
नाव शेतकरी राजा
झाला कर्ज हो बाजारी
कोणी गळ्याला घालुनी फास
झाला नरकातून मुक्त
–अशोक बुधाजी दळवी
पहा मुलांनी पहा – marathi kavita lahan mulanchi
पहा मुलांनो पहा
आम्हा परी भारी बेडकांची शाळा
बेडूक दादा मास्तर
उड्या शिकवतात फार तर
खेळाचा दिवस त्यांचा
चालतो वर्षभर
एकदा पाण्याखालून
येतो जमिनीवर
हिरवळीत लोळून
उंच उड्या मारून
उकाडी आल्यावर डुबतात
पाण्यावर
आमच्या परी शाळा
त्यांचीच आहे भारी
गमभन पाड्यांच्या
–अशोक बुधाजी दळवी
माफ कर दादा – marathi kavita to say sorry
माफ कर दादा
आता मी चुकलो
हळूच जाऊन मी
चिट्टी दिली
चिट्टी देण्यासाठी
त्यानं लावला लळा
कर काम नाहीतर
चॉकलेट घे बाळा
कागद घेऊन तो मी
पळतच सुटलो
पळतांना थांबवून
तिच्या हातात दिलो
हातात दिल्यावर
तिन थोडं वाचलं
त्याच्याकडे पाहून
मला जोरात मारलं
गयावया केल्यावर
तिनं सोडलं
तिथून मी धूम ठोकून
तुझ्याकडे आलो
माफ कर दादा आता
मी चुकलो
चॉकलेटला लागून
मार खाल्लो
–अशोक बुधाजी दळवी
गम्मत जम्मत – marathi hasya kavita
आज शाळेत गम्मत झाली
चिमणा चिमणी हसू लागली
बाईचा झाला तास सुरू
चिमणी मुलांची गोष्ट सुरू
गोष्ट इतकी रंगात आली
सांगता बाई डोलू लागली
तोच बाहेरून आला चिमणा गुरू!
पाहताच बाई बावरली
चिमण्याने केली स्तुती सुरू
बाईच चालल करू करू
बाईच चालल करू करू
–अशोक बुधाजी दळवी
महामानवा प्रणाम – dr babasaheb ambedkar kavita in marathi
तुझ्यामुळे सूर्य उगवला जीवन रेषेतला
पाऊस दृष्टीपथावर आला वळवातला
गुदमरून टाकणाऱ्या ढगाळ दुनियेतुनी
तू तेजस्वीपणे चमकलास
आणि श्वास घेण्यास बुझलेल्या
हजार बांधवांच्या नलिका मोकळ्या झाल्या
जातीवर्णाची रुंदीकणाची भिंत
सवर्ण लांडग्यांनी उभी केली स्वार्थासाठी
पण तुझ्यामुळे तडा गेला भिंतीला खिंडार पडले
आणि नवसंसार उभारण्यास दार उघडे झाले
गुदमरून कोंडून डागाळलेले जीव
हक्काने मीठ-भाकर खाण्यास तयार झाले
तुझ्यामुळेच महामानवा नव्या पर्वाचा आरंभ झाला
प्रणाम महामानवा, अखंड तुझ्या शौर्याला
कीर्ती विचाराला प्रणाम, महामानवा प्रणाम !
–अशोक बुधाजी दळवी
नवे रूप
भजनाचे ताल पांगले
बासरीचे सूर थबकले
टाळमृदंग अधू झाले
संगीताच्या नव्या नृत्याने
नारदरूपी नृत्य गेले
पेशवाईतील तमासे लोपले
खरे नृत्य हरवून बसले
काळाच्या ओघांमध्ये
संगीतात म्हणे क्रांती झाली
हजार वाद्ये वाजू लागली
खरे हास्यलोप पावले
बेगडी सारे समोर आले
सुरातील ती लय गेली
बेसूरपणे वाजू लागली
वातावरणातील तरंग गेले
कायमचे डाग राहिले
नवे रूप आले
वरवरचे दिसू लागले
आतिल ते जुने ध्वनी
दूषित हवेत तरंगू नाही शकले
–अशोक बुधाजी दळवी
निसर्गा – nisarg kavita in marathi
marathi kavita on nature
निसर्गा मी भाळलो
तुझ्यावरती…
कडेकपाऱ्या, जीर्ण झरे
मोहक वसुंधरे वरती
निसर्गा. काळी माती
कणखर दगडावरती निरागस झाडावरती
वेटोळ्या वेलीवरती
निसर्गा…
सुसाट वाऱ्यावरती
समंध ताऱ्यावरती
गडगड मेघावरती
कडकडाट विजेवरती
निसर्गा…
लवलवत्या कुरणांवरती
चरत्या धेनुवरती
उडत्या थव्यावरती
निसर्गा…
अथांग सागरावरती
झेपत्या लाटावरती
स्तब्ध किनाऱ्यावरती
निसर्गा…
–अशोक बुधाजी दळवी
नात अन गोत – marathi kavita on nati
गुंत्यात गुंतलेली
जसी गाठ कात्याची
तथा एक रूप
हे नाते अन गोत
शब्दांच्या काट
कधी मनात मन गुंतत
ममत्वाच्या भावनेन
कधी हृदयी थेट भिडत
नात जेव्हा बेभान होत
तेव्हा सावरता लपेटत्या घडीला
विपरीत ही घडत
आणि लपटलेले सुत
तिथेच तुटत!
–अशोक बुधाजी दळवी
बाहेर पड घरातन – ghar kavita marathi
माझ्या मायेच अण माझ
वाईच घटकल
तवा मधेच भाऊ ओरडला
म्हणला,
बाहेर पड घरातन
काय दिव लावणार
दिसाया लागलय
बाहेर पडणारच की।
डोळे पुसत मनात म्हटलं
कवातरी पंख फुटल्याल पाखरू
दूर उडणारच व्हत !
पण भाऊ अस बोलाया नको होता
तिथच सार बिनसलं
अण दोन मुख कायमची
मुकी झाली.
कधीतरी डोळ्याला डोळा लागायचा
पण तो ही धुसर झाला
कारण मला अठवाया लागलं
बापन्हाय माय न्हाय
पण भाऊ ओरडलाता बाहेर पड घरातनं.
–अशोक बुधाजी दळवी
प्रीत – marathi prem kavita charolya
प्रीत सांग त्या फुलाने
मज का तुझ्यापरी ठुकरायचे
काकुळत्या मनी कसे हसायचे
सांग प्रीत तुझ्या आठवनीने
किती मी झुरायचे?
क्षणधुंद वेड्या प्रितीला
कितीसे मी कुरळायचे
देठास स्पर्श होता
काट्याने का टोचायचे
पाकळ्यातल्या गंध वेडाने
किती मी झुरायचे
श्वासा विना तुझ्या
किती दिस ममगीत अळवायचे
प्रीत सांग त्या फुलाने
मजका तुझ्या परी ठुकरायचे.
–अशोक बुधाजी दळवी
न्याय दे हिंद बांधवाला – marathi bhashevar anyay kavita
स्वमाय रक्षणास
अर्पिले दानवा तुज नयन
स्वमाय रक्षणास अर्पिले
दानवा तुज कर्ण
तरीही भक्षका नराधमा
तोडताच आम्हा लचका
कण ऊरला जरी रक्ताचा
उफाळून होईल ज्वाला
तांडव तुमच्या नृत्याला
भाताड बनविन उद्याला
तरीही सयमाने
विनवितो विधात्याला
थोप तांडव नृत्याला
न्याय दे हिंद बांधवाला
–अशोक बुधाजी दळवी
मज वेड लागले
कोणी म्हणूदे
मज वेड लागले
भटकंतीचे
तया सांगेन
मज वेड लागले निसर्गाचे
फुल पाखरे, रान-वेली
डोंगर माथी झऱ्यांचे
मजवेड लागले निसर्गाचे
रान फुले, जिर्ण झुले
शितल वृक्ष छायचे
मज वेड लागले निसर्गाचे
सरोवरी कमळाचे
अंबरी इंद्रधनुष्याचे
मज वेड लागले निसर्गाचे
–अशोक बुधाजी दळवी
जखम – marathi kavita bhavna
बेभान करूनी
मलाच लुटलस
सर्वांग दाखवून तुझ
मी मात्र एक वचनी
सर्वस्वी झहालो तुझा
मज लुटल्यावर
तु मात्र अशीच बेभान
खेळवत दुसऱ्यांना
मी गेल्यावर स्वर तेच
ओटावरचे सर्वस्वी
झहाले तुझी
तू जनाला व्याभिचारी
मी मानले तुला
बाकी सारा बेभान पसारा
दुसऱ्या संगे खाटीला
क्षणात लोळवलो असतो
माझ्या ऐकेकाळच्या ज्वानीला
पण लाजेन घाव आवरला
शेवटी…
एकतर्फी प्रेमाचा बळी म्हणून
तूच अमर जहाली असतीस
आणि मी मात्र
चार भिंतीत सडलेला
–अशोक बुधाजी दळवी
भर यौवनात
गाणे कधीच गात नव्हते
वेड्या परी मी
पापी तुझ का म्हणू ?
मीच अभागी पापीणी
भर यौवनात
बेधुंद होऊनी
खाज माझीच
सोयर सुतक न जुळता
लुटायला दिली मज ज्वानी
मुक्त होतास पक्षी तू
ऊडुनी स्वैर वाऱ्यावरी
मी तर बंधीस्त
तोंड लपवुनी
ना मातृत्व, ना सौभाग्य
कधिच विरले तारुण्य
होऊनी पिशाच्च
ते लपेटलेच गाणे
जे कधीच गात नव्हते
वेड्या परी मी.
–अशोक बुधाजी दळवी
तुझे वेगळे – aathvan marathi kavita
अटवनी त्या पुसुनी गेल्या
तेज तुझे विझलेले
का ऐकू मी तुझे वेगळे
मधुर गाणे
मनाच्या बेभान प्रलयावेळी
काळीज माझे धडधडले
सुभोवारच्या पाण्यामध्ये
प्रतिबिंब मम घुसमटले
नकोच त्या आठवणी
नकोच तो सहवास
नकोच गाऊ
तुझे वेगळे मधुर गाणे
–अशोक बुधाजी दळवी
एक नूर
एक नूर बघ
जिंकून गेली भारतमातेला
आलि तेव्हा सूर हरवला
श्वास कोंडला हृदय शुन्याला
एक नूर….
कसले नव्हते नाते तिच्याशी
दुषित रक्त प्रतिपक्षाचे
तरी ही जपले आम्ही
माणुसकी नात्याला
एक नूर…
गोंडस् त्या मृतीने
जिंकून घेतले आम्हा भावनेला
स्व खर्चाने आपुलकीने
जीवदान दिले तिला
एक नूर…
–अशोक बुधाजी दळवी
नकार – sad love marathi kavita
तुझ्या नजरेच्या तराजुत
मज का साखारलेस
भास होता की अभास
मज का हेरलेस
स्वप्नांच्या प्रणयात
मज का धुंद केलेस
बेधुंद तुझी काया दाऊनी
मज का वेड लाविलेस
आरशात उजळलेल्या
तुझ्या प्रतिबिंबात मज का डुबवलेस
ओटाना ओट देत
ओढ का लाविलेस
–अशोक बुधाजी दळवी
No comments:
Post a Comment