Census जनगणनेची काशीयात्रा

 ‘त्यांची’ भारतविद्या : जनगणनेची काशीयात्रा

हाती आलेल्या प्रदेशाची पूर्वपीठिका, महसूल, कायदा सुव्यवस्था सर्व काही ईस्ट इंडिया कंपनीला बरीच अपरिचित होती.



|| प्रदीप आपटे

ब्रिटिशांनी भारतभरातील पहिली जनगणना १८९१ साली केली त्याआधीच, १८३० मध्ये ‘आधुनिक वाराणसीचा शिल्पकार’ म्हणवला जाणाऱ्या जेम्स प्रिन्सेपने या ‘बनारस’ शहराची जातवार जनगणना केली होती…


बिरबलाच्या नावाने एक ‘सांगोवांगी’ कथा आहे. बादशाह विचारतो आपल्या राज्यात कावळे किती? बिरबल सांगतो, ‘दोन लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे बेचाळीस’! बादशाह विचारतो, ‘कशावरून’? बिरबल उत्तरतो ‘मोजून बघा!’- बादशाह विचारतो, ‘कमी किंवा जास्त भरले तर?’ बिरबल म्हणतो, ‘कमी भरले तर काही मरण पावले वा काही अन्यदेशी उडून गेले; जास्त भरले तर नवी पिल्ले झाली किंवा इतर देशांतले आपल्या देशात आले!’ लोकसंख्याशास्त्राचे प्राथमिक समीकरण शिकवताना ही गोष्ट मोठी कामी येते! बिरबल जे कावळ्याबद्दल सांगतो आहे ते प्रजाजनांबद्दल जवळपास तसेच लागू असते. आपल्या हुकमतीखालचे एकूण प्रजाजन किती, याचे नेमके उत्तर पूर्वी सहसा ठाऊक नसे!


अधिक नीटसपणे माहीत असायच्या त्या बाबी कुठल्या? तर राजाने आपल्या पदरी बाळगलेल्या सैनिकांची आणि हत्तीघोड्यांची संख्या, लागवडीखालची शेतजमीन, त्यातून आणि अन्य व्यापारी उलाढालीने उपजणारा नगदी किंवा वस्तुरूपाने मिळणारा करमहसूल. या निकडीच्या बाबी गावोगावचे जहागीरदार, सरदार, देशमुख, पाटील संभाळत आणि त्यांच्याकडून मिळेल ती आकडेवारी! त्यांच्यापैकी काही आपापल्या लबाड हेतूने काही आकडे रोडावून सांगायचे तर काही आकडे फुगवून सांगायचे. त्याची शहानिशा करायला आणि लबाडी रोखायला राजाचे काही खास दूत आणि उपाय‘योजना’ केल्या जायच्या.


व्यापार आणि लष्कराचा राबता असणारी नगरे अधिक दाट लोकवस्तीची असत. त्याची हाताळणी राखण आणि बंदोबस्त करायला शहर कोतवाल आणि त्याचे शिपाई असायचे. शहरे वाढली की सांडपाणी निचरा रस्ते यांची निगा वाढायची. त्यासाठी निरनिराळ्या पट्ट्या, कर लावले जायचे. पण त्यासाठी मोजली जायची ती ‘घरे ‘! म्हणजेच खान- ए-सुमारी! खानेसुमारी हा फारसी शब्द आहे. खाना म्हणजे घर आणि सुमुरदन म्हणजे मोजणे! त्यावरून सुमारे, सुमार, बेसुमार (अगणित) इ. शब्द मराठीत उसने आले.


पण घरात माणसे किती हे फक्त धूसरपणे माहीत असे. जन्ममृत्यूची नोंदणी मोजदाद नसे. रोगाच्या साथी यायच्या. लागोपाठ वर्षांचे दुष्काळ पडायचे. मृत्यू आणि परागंदेपणाच्या झळीने गावेच्या गावे ओस पडायची. प्लेगने किती मरण पावले आणि कोणत्या वयाचे किती बचावले याची एक चौकस पाहणी न्यूटनचा दोस्त हॅलेने (धूमकेतू ख्यात) केली होती. त्यावरून एखादी व्यक्ती सरासरी किती जगते याची संभाव्यता जोखणारे गणित अब्राम डी माव्हर्ने केले (हाही न्यूटनचा सहकारी )आणि जीवन-विमा नामक वित्तीय उद्योगाची सुरुवात झाली. लोकसंख्याशास्त्राची ही देणगी!


हाती आलेल्या प्रदेशाची पूर्वपीठिका, महसूल, कायदा सुव्यवस्था सर्व काही ईस्ट इंडिया कंपनीला बरीच अपरिचित होती. वाराणसीचे उदाहरण बघू. तिथल्या स्थानिक इंग्रज अधिकाऱ्याने १८०० साली तिथला कोतवाल झुल्फिकार अली याला वाराणसीची खानेसुमारी करायला लावली. घरे मोजणे माणसे मोजण्यापेक्षा ढोबळ पण सुकर! त्यानुसार वाराणसी ़ऊर्फ बनारसमध्ये तीस हजार घरे होती. त्यात वस्तीला माणसे किती होती याचा अंदाज कसा केला? एकमजली घर असले तर त्यात पंधरा माणसे, दुमजली घरात वीस, तीन मजली घरात पंचवीस, चार मजलीमध्ये चाळीस असा अनमानधपका लावून! खेरीज हा अहवाल बनवणार कोण तर नगराचा कोतवाल आणि त्याचा सेवक मुन्शी! त्यांनी आपले ‘वैशिष्ट्य’ ठसवायला ठोकून दिले इथे सहा लाख लोक राहतात. त्यापैकी पंधराशे घरे गुन्हेगार किंवा संशयित गुन्हेगारी आहेत! म्हणजे अदमासे २२,५०० गुन्हेगार आहेत!


ब्राह्मी लिपी उलगडणारा जेम्स प्रिन्सेप वाराणसीत अधिकारी म्हणून दाखल झाला. ही आकडेवारी त्याला भलतीच संशयास्पद वाटली. शहराच्या प्रशासनासाठी अनेक धाटणीची आकडेवारी गरजेची होती. हाताशी तुटपुंजे साक्षर अधिकारी होते. त्याने देवनागरीत एक नोंदपत्रक तयार केले. त्यात माहितीचे रकाने होते. घराचा क्रमांक मालकाचे नाव, जात आणि व्यवसाय, इमारतीमधल्या चौकांची रचना आणि संख्या, राहत्या व्यक्तींची संख्या अशी आकडेवारी गोळा करण्याचा आणि अदमासण्याचा त्याने घाट घातला. घरांची दुहेरी वर्गवारी उंचीनुसार (एक मजली ते सहा मजली), बांधकाम साहित्यानुसार (कच्ची, पक्की आणि संमिश्र), पडझडलेली वेगळी नोंदायची. खेरीज इतर वैशिष्ट्ये! बाग आहे का? पाण्याचे टांके? शिवालय आहे का? शहर निरनिराळ्या मोहल्ल्यांत आणि त्यामधल्या भेरींमध्ये पसरून गुंफले होते. फार खोलवर थेट चौकशी करणे म्हणजे राजवटीविरुद्ध संशय आणि असंतोषाला आमंत्रण देण्यागत होते. म्हणून झाडलोट सांडपाण्याच्या सोयीकरता आणि करांसाठी पाहणी आहे असे निमित्त शोधणे भाग होते.


विचारलेल्या थेट प्रश्नांना बिनचूक आणि सचोटीने उत्तरे मिळणार याचा भरवसा नव्हता. त्याची खातरजमा करायचे अनेक प्रकार त्याने चोखाळले. बहुतेक मोहवल्ल्यांना ‘फाटक’ होते. फाटक रात्री बंद व्हायचे. गस्तीचे शिपाई फाटकावर पहारा द्यायचे. कोणत्या मोहल्ल्यात कुठल्या घरात कोण वस्तीला असते याची त्यांना खबरबात असायची. घरामधल्या लोकांनी दिलेल्या माहितीशी गस्तीचे पहारेकरी आणि घरदारीचे नोकरचाकर याची रुजवात करणे शक्य होते. मध्यभागी चौकोनी मोकळ्या अंगणाभोवती समोरासमोर खोल्या अशी ठेवण असणारी घरे अधिक. या खोल्या वेगवेगळ्या मुदती आणि भाड्याने घेऊन राहणारी बिऱ्हाडे होती.


काही मोहल्ले जातवार आणि पेशानुसारी घडत आलेले रहिवासाचे पुंजके होते. त्या त्या पेशांचे, जातींचे मुखंड असायचे. काहींचे आश्रयदाते असायचे! त्यांना जातीनुसार चौधुरी, दलपती, जत्तीदार, कोतवाली, महंत असं ओळखले जायचे. त्या मुखंडांकडून शहानिशा करवून घेतली. लग्न/ बारसे/ मयत प्रसंगांना आलेल्यांची संख्या मुखंडाकरवी ताडून बघितली जायची. सणावारी यात्रेच्या वेळेला प्रतिष्ठित लोक अन्नदान भंडारा चालवीत. त्यांच्याकडून त्या त्या समाजाची संख्या वदवली जायची. प्रशासनाने गोळा केलेल्या आकड्याची अशी खातरजमा आणि उलटतपासणी करण्याचीही प्रिन्सेपने घडी बसविली. त्याने लिहिलेल्या अहवालात अशी खातरजमा कुणाकडून करवून घेतली त्याचाही रकाना आहे. उदाहरणार्थ काशीवासी ‘द्र विड’ ब्राह्मणांमध्ये यजुर्वेदी ब्राह्मणांबद्दलची खातरजमा रघुनाथपंताने, प्रभूंची त्रिंबकरावाने, चित्रापुरी सारस्वतांची बाळ दीक्षित, मेवाडमधील भटांची रतनजी यांनी केली असे लिहिले आहे. यात ब्राह्मणांचे प्रकार खूप कारण त्या त्या प्रांतामधले बहुतेक जातींचे सामान्य पूजा वा अनुष्ठान ते ‘घाऊक श्राद्ध’ त्यांच्या हाताने घडायचे. तीच कथा निरनिराळ्या प्रांतांतून आलेल्या कारागीर जातींची, शूद्रांची आणि हिंदू फकिरांची. ते कोणत्या कसबाचा व्यवसाय करतात, उपजीविका कशावर चालते याची नोंद मिळते. उदाहरणार्थ कानफाटे साधू भैरवनाथ देवळाशी भिक्षा मागतात. कबीर पंथीयांकडे गोरखपुरात जमीन आहे. कथक नाच शिकविणारे एकशे अठरा आहेत. २५०० तेली आहेत. ‘कातडी काम’ चांभार १८५० आहेत तर पादत्राणे बनविणारे ५०० आहेत. हिंदूंची जातवार विभागणी पाहिली तर सर्व प्रकारचे सर्व प्रांतांतले ब्राह्मण २६.४६ टक्के; वैश्य-शूद्रादी कारागीर जाती आणि हिंदू फकीर ६१.९२ टक्के आणि सर्व क्षत्रिय ११.६० टक्के आहेत असे नोंदले आहे. ‘मुसलमान वीस टक्के आहेत. संख्येने ब्राह्मणांच्या आसपास, पण जास्त नाहीत. पण ते बव्हंशी शहराबाहेर वस्तीला आहेत.’ मुसलमानांमधले व्यावसायिक उपगट आणि जाती खेरीज त्याचे वेगळे ‘मुखंड’ नोंदलेले आहेत.


विशेष नोंद म्हणजे ‘एकुणांत स्त्री-पुरुष प्रमाण एकसारखे आहे परंतु लहान मुलींचे प्रमाण लहान मुलांपेक्षा बरेच उणे पडते. याची दोन कारणे- बालविवाह आणि मुले किती विचारले की मुलीमुलांची संख्या सरमिसळ सांगितली जाते’. असेच प्रमाण बंगालच्या वर्धमान जिल्ह्यात आढळले असेही नोंदले आहे.


वाराणसीला ग्रहण, कुंभमेळा आणि अन्य यात्रा काळामध्ये बाहेरून येणारे भाविक फार मोठ्या संख्येने यायचे. त्याचा अदमास घेण्याकरिता त्याने एक पाहणी प्रयोग केला. २१ मे १८२६ ला ग्रहण होते. वाराणसीत बाहेरून येणाऱ्या पाचही मुख्य मोठ्या रस्त्यांवर चौक्या बसविल्या. खेरीज इतर छोट्या रस्त्यांवरही. प्रत्येक चौकीला दोन गडी गोट्याखडी आणि गोणी घेऊन बसविले. येणाऱ्याला आत सोडले की एक गोटी गोणीमध्ये टाकायची. नदीमार्गाने येण्याच्या चार नावाडी वाटा होत्या. तिथल्या होड्यांवरही अशीच व्यवस्था लावली. मुख्य रस्त्याने ३७,८३०; नदीवाटेने २,४७५; तर अन्य वाटांनी १५,००० असे ५५,००० ग्रहण यात्रेकरू आढळले! म्हणजे स्थानिक लोकसंखेच्या सुमारे तीस टक्के!


एवढा खटाटोप करताना राज्यकर्ता महसुली बाजू विसरेल? एकूण लोकसंख्या बघता धान्य- मीठ- तेल यांचा खप किती? त्यांची धारणा काय? धारणेचा दहा सालांचा वेगळा तक्ताही त्याच अहवालात जोडलेला आढळतो. असा हा त्या काळच्या प्रशासकीय गरजेने प्रिन्सेपने घडविलेला जनगणना अहवाल! यंदाचे वर्ष जनगणनेचे! ब्रिटिश राजवटीत त्याची हिंदुस्तान व्यापणारी सुरुवात १८९१ साली झाली. त्या अवाढव्य उद्योगाच्या प्रारंभीच्या प्रायोगिक पावलांमधली ही प्रिन्सेपकृत काशीयात्रा!


'His' Bharatvidya: Kashiyatra of Census


The background of the territory, the revenue, the law and order were all very unfamiliar to the East India Company.






|| Pradeep Apte


Even before the British conducted the first census in India in 1891, in 1830, James Prinsep, the so-called 'sculptor of modern Varanasi', conducted a caste-wise census of the city of Benares.




There is a ‘Sangowangi’ story by the name of Birbal. The emperor asks how many crows are there in his kingdom? Birbal says, 'Two lakh seventy four thousand seven hundred and forty two'! The emperor asks, "From what?" Birbal replies ‘Count!’ - The emperor asks, ‘If more or less filled?’ Birbal says, ‘If less filled, some die or some fly away; If it is overfilled, new chicks will be born or other countries will come to our country! ' What Birbal says about crows is almost as applicable to the population. The exact answer to the total population under your rule was usually not known before!




What are the things you need to know more neatly? The number of soldiers and elephants kept by the king under his patronage, the farmland under cultivation, the cash or commodity tax derived from it and other commercial transactions. These urgent matters are being handled by the village landlords, Sardars, Deshmukhs, Patils and the statistics obtained from them! Some of them used to misrepresent some numbers and inflate some numbers for their own false purposes. Some of the king's special envoys and measures were planned to prove it and to stop lying.




Cities with trade and army were more densely populated. The city Kotwal and its sepoys used to be there to handle and take care of it. As cities grew, so did the maintenance of sewage roads. For this, various leases and taxes were levied. But for that, the 'houses' used to be counted! That is Khan-e-Sumari! Khanesumari is a Persian word. Food is home and Sumurdan is counting! From that, about, innumerable (innumerable) etc. The word came in Marathi.




But he only knew how many people were in the house. Births and deaths were not counted. Let the disease accompany. Droughts followed years of drought. Death and paralysis rained down on villages. Newton's friend Haley (known as a comet) made a curious observation of how many died of plague and how many survived at what age. From this came the mathematics of how long a person lives on average (done by Abram de Mawerne (also Newton's colleague)) and the beginning of the financial industry called life insurance. This is the gift of demography!




The precedent, revenue, law and order of the region was very unfamiliar to the East India Company. Let's look at the example of Varanasi. In 1800, a local English official ordered Kotwal Zulfiqar Ali to carry out a mine survey in Varanasi. Counting houses is rough but easier than counting people! According to this, there were thirty thousand houses in Varanasi aka Banaras. How did you estimate the number of people in the settlement? If there is a one-storey house, there are fifteen people in it, twenty in a two-storey house, twenty-five in a three-storey house and forty in a four-storey house! Besides, who will make this report, the Kotwal of the city and his servant Munshi! Six lakh people live here. Fifteen of those homes are criminal or suspected criminal! That means there are approximately 22,500 criminals!




James Prinsep, a Brahmi writer, entered Varanasi as an officer. This statistic made him feel quite skeptical. A number of haircuts were needed for the administration of the city. There were few literate officers at hand. He made a register in Devanagari. It contains information. He planned to collect and estimate statistics such as house number, owner's name, caste and occupation, structure and number of squares in the building, number of occupants. Double classification of houses according to height (one floor to six storeys), construction materials (raw, pucca and composite), fall apart. Other features besides! Is there a garden? Water tanks? Is there a pagoda? The city was scattered in different neighborhoods and in the villages around it. In-depth direct inquiry was meant to invite suspicion and discontent against the regime. So we had to find an excuse that Zadlot is an inspection for sewage facilities and taxes.




There was no assurance that the direct questions asked would be answered perfectly and honestly. He tried many ways to convince her. Most mohallas have 'gates'. The gates used to be closed at night. The patrol used to guard the gate. They used to know who lived in which house in which locality. With the information provided by the people in the house, it was possible to introduce the patrol guards and the house servants. More houses with a square open courtyard in the center with rooms facing each other. These rooms were rented for different periods of time.


Some of the neighborhoods were clusters of castes and occupations. They used to be the heads of those professions and castes. Some used to be patrons! According to their caste, they were known as Chaudhuri, Dalpati, Jattidar, Kotwali, Mahant. She got verification from those heads. The number of people attending weddings / funerals / funerals was measured by face. During Sanavari Yatra, eminent people used to run food stalls. They used to spread the number of that community. Prinsep also set out to verify and re-verify the figures collected by the administration. In the report written by him, it is not clear from whom he got such assurance. For example, Raghunath Pant, Prabhu's Trimbakaravan, Chitrapuri Saraswat's Bal Dixit, Bhatachi Ratanji of Mewar have written about the Yajurvedi Brahmins among the Kashivasi 'Dra Vid' Brahmins. There are many types of Brahmins because most of the common worship or rituals of most of the castes in that province used to perform ‘wholesale shraddha’ with their hands. The same story of artisan castes, Shudras and Hindu fakirs from different provinces. There is a record of what business they do, what their livelihood depends on. For example, Kanphate sadhu begs from Bhairavnath temple. The Kabir sect has land in Gorakhpur. There are one hundred and eighteen who teach Kathak dance. There are 2500 oils. There are 1850 leather workers and 500 footwear makers. If we look at the caste division of Hindus, Brahmins from all provinces are 26.46 per cent; Vaishya-Shudradi artisan castes and Hindu fakirs are recorded at 61.92 per cent and all Kshatriyas at 11.60 per cent. ‘Muslims are twenty percent. Around the number of Brahmins, but not many. But most of them live outside the city. '




Of special note is the fact that ‘overall the sex ratio is the same but the proportion of little girls is much less than that of little boys. There are two reasons for this - child marriage and how many boys are asked, the number of girls is mixed. ' Similar cases have been reported in Vardhman district of Bengal.




Varanasi used to receive a large number of devotees from outside during eclipses, Kumbh Mela and other pilgrimages. He did a survey experiment to get his idea. The eclipse took place on May 21, 1826. Chowks were set up on all the five major roads coming from outside Varanasi. Also on other small roads. Each outpost was packed with two wickets and sacks. If a person came in, he would put a piece in a sack. There were four canoes to reach by river. A similar arrangement was made on the boats there. 37,830 on the main road; 2,475 by river; On the other hand, 55,000 eclipse pilgrims were found out of 15,000! That's about thirty percent of the local population!




Will the ruler forget the revenue side while making such a fuss? Looking at the total population, what is the consumption of grains, salt and oil? What is their perception? A separate ten-year chart of retention is also found attached to the same report. This is the census report prepared by Prinsep due to the administrative need of that time! This year's census! It started its occupation of India in 1891 during the British rule. This Princep made Kashiyatra is one of the first experimental steps of that huge industry!

No comments:

Post a Comment