मराठी समानार्थी शब्द संग्रह 2 Marathi Samanarthi Shabd Sangrah 2 Marathi synonym Words Collection 2
अनर्थ = संकट
अपघात = दुर्घटना
अपेक्षाभंग = हिरमोड
अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम
अभिनंदन = गौरव
अभिमान = गर्व
अभिनेता = नट
अरण्य = वन, जंगल, कानन
अवघड = कठीण
अवचित = एकदम
अवर्षण = दुष्काळ
अविरत = सतत, अखंड
अडचण = समस्या
अभ्यास = सराव
अन्न = आहार, खाद्य
अग्नी = आग
अचल = शांत, स्थिर
अचंबा = आश्चर्य, नवल
अतिथी = पाहुणा
अत्याचार = अन्याय
अपराध = गुन्हा, दोष
अपमान = मानभंग
अपाय = इजा
अश्रू = आसू
अंबर = वस्त्र
अमृत = पीयूष
अहंकार = गर्व
अंक = आकडा
आई = माता, माय, जननी, माउली
आकाश = आभाळ, गगन, नभ, अंबर
आठवण = स्मरण, स्मृती, सय
आठवडा = सप्ताह
आनंद = हर्ष
आजारी = पीडित, रोगी
आयुष्य = जीवन, हयात
आतुरता = उत्सुकता
आरोपी = गुन्हेगार, अपराधी
आश्चर्य = नवल, अचंबा
आसन = बैठक
आदर = मान
आवाज = ध्वनी, रव
आज्ञा = आदेश, हुकूम
आपुलकी = जवळीकता
आपत्ती = संकट
आरसा = दर्पण
आरंभ = सुरवात
आशा = इच्छा
आस = मनीषा
आसक्ती = लोभ
आशीर्वाद = शुभचिंतन
इलाज = उपाय
इशारा = सूचना
इंद्र = सुरेंद्र
इहलोक = मृत्युलोक
ईर्षा = चुरस
उत्सव = समारंभ, सण, सोहळा
उक्ती = वचन
उशीर = विलंब
उणीव = कमतरता
उपवन = बगीचा
उदर = पोट
उदास = खिन्न
उत्कर्ष = भरभराट
उपद्रव = त्रास
उपेक्षा = हेळसांड
ऊर्जा = शक्ती
ॠण = कर्ज
ॠतू = मोसम
एकजूट = एकी, ऐक्य
ऐश्वर्य = वैभव
ऐट = रुबाब, डौल
ओझे = वजन, भार
ओढा = झरा, नाला
ओळख = परिचय
औक्षण = ओवाळणे
अंत = शेवट
अंग = शरीर
अंघोळ = स्नान
अंधार = काळोख, तिमिर
अंगण = आवार
अंगार = निखारा
अंतरिक्ष = अवकाश
कथा = गोष्ट, कहाणी, हकिकत
कठीण = अवघड
कविता = काव्य, पद्य
करमणूक = मनोरंजन
कठोर = निर्दय
कनक = सोने
कटी = कंबर
कमळ = पंकज
कपाळ = ललाट
कष्ट = श्रम, मेहनत
कंजूष = कृपण
काम = कार्य, काज
काठ = किनारा, तीर, तट
काळ = समय, वेळ, अवधी
कान = श्रवण
कावळा = काक
काष्ठ = लाकूड
किल्ला = गड, दुर्ग
किमया = जादू
कार्य = काम
कारागृह = कैदखाना, तुरुंग
कीर्ती = प्रसिद्धी, लौकिक, ख्याती
कुतूहल = उत्सुकता
कुटुंब = परिवार
कुशल = हुशार, तरबेज
कुत्रा = श्वान
कुटी = झोपडी
कुचंबणा = घुसमट
कृपण = कंजूष
कृश = हडकुळा
कोवळीक = कोमलता
कोठार = भांडार
कोळिष्टक = जळमट
खण = कप्पा
खडक = मोठा दगड, पाषाण
खटाटोप = प्रयत्न
खग = पक्षी
खड्ग = तलवार
खरेपणा = न्यायनीती
ख्याती = कीर्ती, प्रसिद्धी, लौकिक
खात्री = विश्वास
खाली जाणे = अधोगती
खिडकी = गवाक्ष
खेडे = गाव, ग्राम
खोड्या = चेष्टा, मस्करी
गरज = आवश्यकता
गवत = तृण
गर्व = अहंकार
गाय = धेनू, गोमाता
गाणे = गीत, गान
गंमत = मौज, मजा
गंध = वास, दरवळ
ग्रंथ = पुस्तक
गाव = ग्राम, खेडे
गुन्हा = अपराध
गुलामी = दास्य
गोड = मधुर
गोणी = पोते
गोष्ट = कहाणी, कथा
गौरव = सन्मान
ग्राहक = गिऱ्हाईक
घर = सदन, गृह, निकेतन, आलय
घरटे = खोपा
घागर = घडा, मडके
घोडा = अश्व, हय, वारू
बदल = फेरफार, कलाटणी
बर्फ = हिम
बहीण = भगिनी
बक्षीस = पारितोषिक, पुरस्कार
बाग = बगीचा, उद्यान, वाटिका
बासरी = पावा
बेत = योजना
बाळ = बालक
बाप = पिता, वडील, जनक
बादशाहा = सम्राट
बुद्धी = मती
ब्रीद = बाणा
भरवसा = विश्वास
भरारी = झेप, उड्डाण
भव्य = टोलेजंग
भुंगा = भ्रमर, भृंग, मिलिंद, मधुकर
भाट = स्तुतिपाठक
भारती = भाषा, वैखरी
भांडण = तंटा
भाळ = कपाळ
भाऊ = बंधू, सहोदर, भ्राता
भेसळ = मिलावट
भेदभाव = फरक
भोजन = जेवण
भोंग = खोपटे, झोपडी
मदत = साहाय्य
ममता = माया, जिव्हाळा, वात्सल्य
मन = चित्त, अंतःकरण
मजूर = कामगार
महिना = मास
महिला = स्त्री, बाई, ललना
मजूर = कामगार
मस्तक = डोके, शीर, माथा
मानवता = माणुसकी
मान = गळा
माणूस = मानव
मंगल = पवित्र
मंदिर = देऊळ, देवालय
मंदपणा = मंडपाच्या
मंडपामां = मंडपामध्ये
मार्ग = रस्ता, वाट
म्होरक्या = पुढारी, नेता
मोहाची फुले = मोवा
मित्र = दोस्त, सोबती, सखा, सवंगडी
मिष्टान्न = गोडधोड
मुलगा = पुत्र, सुत, तनय, नंदन, तनुत
मुलगी = कन्या, तनया, दुहिता, नंदिनी, आत्मजा
मुद्रा = चेहरा, मुख, तोंड, वदन
मुख = तोंड, चेहरा
मुलुख = प्रदेश, प्रांत, परगणा
मेहनत = कष्ट, श्रम, परिश्रम
मैत्री = दोस्ती
मौज = मजा, गंमत
यश = सफलता
युक्ती = विचार, शक्कल
युद्ध = लढाई, संग्राम, लढा, समर
येतवरी = येईपर्यंत
योद्धा = लढवय्या
रक्त = रुधिर
रणांगण = रणभूमी, समरांगण
र्हास = हानी
राग = क्रोध, संताप, चीड
राजा = नरेश, नृप, भूपाल, राणा, राया
राष्ट्र = देश
रांग = ओळ
रात्र = निशा, रजनी, यामिनी
रान = वन, जंगल, अरण्य, कानन
रूप = सौंदर्य
रुबाब = ऐट, तोरा
रेखीव = सुंदर, सुबक
लग्न = विवाह, परिणय
लाट = लहर
लाज = शरम,
लोभ = हाव
लोटके = मडके
वरचा = वद्राचा
वडील = पिता
वस्त्र = कपडा
वद्रा = वर
वारा = वात, पवन, अनिल, मारुत, समीर, वायू
वाट = मार्ग, रस्ता
वाद्य = वाजप
वातावरण = रागरंग
वेग = गती
वेळ = समय, प्रहर
वेळू = बांबू
वेश = सोशाख
वेदना = यातना
विश्रांती = विसावा, आराम
वितरण = वाटप, वाटणी
विद्या = ज्ञान
विनंती = विनवणी
गड = पाषाण, खडक
दरवाजा = दार, कवाड
दाम = पैसा
दृश्य = देखावा
दृढता = मजबुती
दिवस = दिन, वार, वासर
दिवा = दीप, दीपक
दूध = दुग्ध, पय, क्षिर
द्वेष = मत्सर, हेवा
देव = ईश्वर, विधाता
देह = तनु, तन, काया, वपू, शरीर
देश = राष्ट्र
देखावा = दृश्य
देखत = बघत, पाहत
दार = दरवाजा
दारिद्र्य = गरिबी
दौलत = संपत्ती, धन
धरती = भूमी, धरणी
ध्वनी = आवाज, रव
नदी = सरिता, तटिनी, तरंगिणी, जलवाहिनी
नजर = दृष्टी
नवरा =भ्रतार, वल्लभ, पती, कांत, नाथ, दादला, धव, अम्बुला, कवेश
नक्कल = प्रतिकृती
नमस्कार = वंदन, नमन
नातेवाईक = नातलग
नाच = नृत्य
निश्चय = निर्धार
निर्धार = निश्चय
निर्मळ = स्वच्छ
नियम = पद्धत
निष्ठा = श्रद्धा
नृत्य = नाच
नोकर = सेवक
न्हौतं = नव्हते
ेकडी = हुकडी
ठग = चोर
ठिकाण = स्थान
डोके = मस्तक, शीर्ष, शीर
डोळा = नेत्र, नयन, लोचन, चक्षु, अक्ष, आवळू, अंबक
डोया = डोळा
डोंगर = पर्वत, गिरी
ढग = मेघ, जलद, पयोधर, अभ्र, अंबूद, निरद, पयोद, अब्द, घन
ॠण = कर्ज
तक्रार = गाऱ्हाणे
तलाव = तडाग, सरोवर, कासार
तळे = तलाव, सरोवर, तडाग
त्वचा = कातडी
तारण = रक्षण
ताणीस्नी = ताणून
ताल = ठेका
तुरंग = कैदखाना, बंदिवास
तुलना = साम्य
तोंड = तुंड, वक्र, आनन, वदन, मुख
थट्टा = मस्करी, चेष्टा
थवा = समूह
थोबाड = गालपट
झोपडी = कुटीर, खोप
झोप = निद्रा
झोका = झुला
झेंडा = ध्वज, निशाण
झुंझुरका = पहाटेस
१) आनंद = हर्ष, मोद, संतोष
२) दिवस = वार, वासर, अहन
३) वारा = अनिल, पवन, वायू, समीरण
४) सोने = कनक, सुवर्ण, हेम, कांचन
५) मुलगा = पुत्र, सुत, नंदन, तनुज
६) पान = पर्ण, पत्र, पल्लव
७) नदी = सरीता, तटिनी, तरंगिणी
८) अनल = विस्तव, पावक, अग्नी, वन्ही
९) तोंड = आनन , मुख, वदन
१०) दैत्य = दानव, राक्षस, असुर
शब्दसमूहाबद्दल एक शब्द :-
१) जे विसरता येणार नाही असे - अविस्मरणीय
२) परमेश्वराचे अस्तित्व मानणारा - आस्तिक
३) जाणून घेण्याची इच्छा असलेला - जिज्ञासू
४) सतत उद्योग करणारा - दीर्घोद्योगी
५) दुसऱ्याच्या जिवावर जगणारे - परोपजीवी
६) गावाचा कारभार - गावगाडा
७) वाजवीपेक्षा जास्त खर्च करणारा - उधळ्या
८) तीन रस्ते मिळतात ती जागा - तिठा
९) मोफत पाणी मिळण्याची व्यवस्था - पाणपोई
१०) घोड्यांना बांधण्याची जागा - पागा
शब्दाच्या जाती
1)नाम -
जे शब्द प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूची, वस्तूच्या गुणांची नावे असतात अशा शब्दांना नाम असे म्हणतात.
उदाहरण - घर, आकाश, गोड
2)सर्वनाम-
जे शब्द नामाच्या ऐवजी वापरले जातात त्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात.
उदाहरण - मी, तू, आम्ही
3) विशेषण-
जे शब्द नामाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना विशेषण असे म्हणतात.
उदाहरण - गोड, उंच
4)क्रियापद-
जे शब्द वाक्यातील क्रिया दाखवतात व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात.
उदाहरण - बसणे, पळणे
5)क्रियाविशेषण-
जे शब्द क्रियापदाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना क्रियाविशेषण असे म्हणतात.
उदाहरण - इथे, उद्या
6) शब्दयोगी अव्यय-
जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
उदाहरण - झाडाखाली, त्यासाठी
7) उभयान्वयी अव्यय-
जे शब्द दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडतात त्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उदाहरण - व, आणि, किंवा
8) केवलप्रयोगी अव्यय-
जे शब्द आपल्या मनातील वृत्तीकिंवा भवन व्यक्त करतात त्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.
उदाहरण - अरेरे, अबब
अंगाला लावून न घेणे' ही कला आत्मसात करा; यशस्वी व्हाल!
~~~~~~~~~
बालपणी कोणी काही बोलले की रागावून आपण आईजवळ तक्रार करायचो. त्यावर आईचे ठरलेले उत्तर असे, 'जाऊदे, लक्ष देऊ नकोस. तू चिडलास तर तर ते आणखी चिडवतील!" किती सोपा कानमंत्र होता, पण तो अमलात आणणे आजतागायत आपल्याला जमलेले नाही. तेच जमवता आले पाहिजे...!
कधी कधी आपण इतके संवेदनशील होतो, की कोणाच्याही वाईट बोलण्या-वागण्याचा आपल्या मानसिकतेवर, कामावर, स्वभावावर विपरित परिणाम होतो. बोलणारा बोलून जातो, आपण मात्र अश्रू ढाळत बसतो. संवेदनशील असणे, माणुसकीच्या दृष्टीने चांगले आहे. परंतु अति संवेदनशील होत आपली प्रगती खुंटवून घेणे, वेडेपणाचे ठरू शकते.
सद्यस्थितीत आपण आपल्या मनस्थितीचे अधिकार विनाकारण दुसऱ्याच्या हाती देऊन ठेवले आहेत. आपल्या कामाला जोवर दुसऱ्यांकडून प्रशंसा मिळत नाही, तोवर आपल्याला आपल्याच कलाकृतीचा आनंद मिळत नाही. समाज माध्यमांच्या भाषेत सांगायचे, तर लाईक, कमेंट, शेअर यावर आपला आनंद अवलंबून असतो. कमी लाईक आले, खोचक कमेंट आली, कोणी जाहीर सल्ला दिला, की आपल्या मन:शांतीला सुरूंग लागलाच म्हणून समजा. या आभासी जगात आपण एवढे गुंतून जातो, की चांगले वाईट याची समज गमावून बसता़े
आपल्या कामाचे आपल्याला समाधान मिळणे हे सर्वात आधी महत्त्वाचे आहे. इतरांनी प्रशंसा केली तर ठीक, नाही केली तरी ठीक. एवढी स्थितप्रज्ञता अंगी बाणता आली पाहिजे.
आपल्याला चांगल्या वाईट प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांचा उद्देश नेहमी निर्मळ असतोच असे नाही. कोणी खरी प्रशंसा करतात, कोणी खोटी, कोणी उगीच चुका काढतात, तर कोणी फक्त चुकाच शोधतात. म्हणून अशा चांगल्या वाईट प्रतिक्रियांसाठी बुद्धीची दारे खुली ठेवा, परंतु चांगले म्हटले म्हणून हुरळून जाऊ नका आणि वाईट बोलले म्हणून दुखावले जाऊ नका.
'हाथी चले बाजार, कुत्ते भोंकें हजार'
ही म्हण आत्मसात करा. यालाच मराठीत
'अंगाला लावून न घेणे'
असे म्हणतात. आपण राजकारणी, सिनेमा, कला, क्रिडा जगतातील प्रसिद्ध लोकांना पाहतो. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो तसेच अगदी हीन दर्जाची शेरेबाजीदेखील होते.
त्यांनी जर प्रत्येक प्रतिक्रिया मनाला लावून घ्यायची ठरवली, तर त्यांची प्रगती होऊ शकेल का? नाही ना? स्वत:ला सेलिब्रेटी समजा आणि प्रतिक्रियांचे स्वागत करा पण त्यात अडकून राहू नका.
या सवयीने तुमचे मन एवढे कणखर बनेल, की कोणी काहीही प्रतिक्रिया दिली, तरी तुमच्या आनंदावर विरजण पडणार नाही. चेहऱ्यावर क्षणिक प्रतिक्रिया उमटेल, पण त्यावर योग्य प्रतिसाद देण्यासाठी तुमच्या मनाची तयारी झालेली असेल.
एकाने दुसऱ्याच्या हातावर चापटी मारण्याचा खेळ आठवतो? तेव्हा एखाद दुसरा फटका बसतो, परंतु त्यानंतर आपण एवढे सावध होतो, की मारणारा निशाणा धरून कंटाळतो.
हाच खेळ आपल्याला आपल्या मनाला शिकवायचा आहे. एखाद दुसरा फटका बसेल, पण पुढच्यावेळेपासून मन सावध पवित्रा घेईल आणि कोणत्याही स्थितीत मन:शांती गमावणार नाही!
No comments:
Post a Comment