Essay On Police Officer In Marathi - पोलीस मराठी निबंध - Police Maza Abhiman Nibandh in Marathi





आपल्याला आयुष्यात वेळोवेळी पोलीस दिसत असतात. (भेटत नसतात याला आपण सुदैव मानतो.) त्यामुळे पोलीस हे कायम काहीतरी वाईट झालं तर भेटायची व्यक्ती असा आपला (गैर)समज असतो. खरंतर ते आपल्या सुव्यवस्थेसाठीच झटत असतात. पण तरीही दुर्दैवाने ते आपल्याला आपले वाटत नाहीत. का? याचा विचार करायची याहून योग्य वेळ नाही असं वाटलं आणि हा लेख लिहायला घेतला.

मुंबईत दोन मुलांनी डोक्यात बांबू मारला आणि त्यामुळे हवालदार शिंदे गेले. आज ते गेले म्हणून अख्खा महाराष्ट्र हळहळला. नेते मंडळींनी (मुख्यमंत्र्यांसकट) घरी गर्दी केली पण अशा दृश्य-अदृश्य काठय़ा हजारो पोलिसांच्या डोक्यावर वर्षांनुवर्षे बसतायत हे या भावनेच्या भरात आपण साफ विसरलो. कुणाला माफियांकडून, कुणाला राजकारण्यांकडून, कुणाला डिपार्टमेंटमधूनच. कुणाला निर्लज्ज जनतेकडून. आपल्या आजूबाजूचे असंख्य पोलीस या ठणकत्या जखमा घेऊनच वर्षांनुवर्षे डय़ूटी करत असू शकतील असा विचारही आपल्या मनाला कधी शिवत नाही.

विचार केला आणि जाणवलं, पोलिसांबद्दलची ही अनास्था आपल्या ‘कंडीशनिंग’मध्ये आहे. बालपणापासून ‘अमुक अमुक कर नाहीतर पोलीस काका येतील’ असं सांगितलं जातं, त्यामुळे पोलिसच मुलं उचलून घेऊन जातात असं वाटायला लागतं. त्यांच्याबद्दल आदराऐवजी धाक तयार होतो. कळत्या वयात, ज्याचा धाक वाटतोय ती ‘पोलीस’ नावाची व्यक्ती सिग्नलच्या कोपऱ्यात ‘शंभर-दोनशे’ रुपयांना मॅनेज होते हे कळतं आणि पोलीस म्हणजे ‘मॅनेज होणारा!’ यावर आपला ठाम विश्वास बसतो.


तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘पोलीस काहीही करू शकतात’ असा गैरसमज. यातून पोलिसांकडे असलेली प्रचंड ताकद आणि त्याचा गैरवापर करण्याची त्यांची सवय याचा अपप्रचार होत रहातो. वर्षांनुवर्षे हे ऐकत राहिल्यामुळे आणि स्वत:ला काही बेसिक अनुभव आल्यामुळे पोलिसांबद्दलचा आदर आणि धाक व्यस्त गुणोत्तरात येतात. आजूबाजूला पोलीस असणं हेसुद्धा काहीतरी प्रॉब्लेम असण्याचं, वातावरण ‘अनकम्र्फेटेबल’ असण्याचं लक्षण वाटायला लागतं आणि त्यांच्याबद्दलच्या कथा (ज्यात भ्रष्टाचार, गुन्हेगारांना साथ, तपासात ढिलाई) या आपल्या मनावर इतक्या बिंबवल्या जातात की त्यांच्या युनिफॉर्म पलीकडे असलेला माणूस कधी बुजून जातो कळत नाही.


त्यात आपण सिनेमे पाहतो. पोलिसांचं तद्दन हिंदी सिनेमाइतकं  नुकसान गुन्हेगारांनीही केलं नसेल. हिंदी सिनेमाने एकतर त्याला सुपरहिरो करून टाकला नाहीतर सुपर व्हिलन. त्याचा प्रामाणिकपणा हा भाबडा आदर्शवाद म्हणून दाखवला आणि त्याची दुर्बलता त्याचा अवगुण म्हणून. ‘अर्धसत्य’, ‘शूल’, ‘सरफरोश’, ‘अब तक छप्पन’, ‘ब्लॅक फ्रायडे’ सारखे मोजके सिनेमे ज्यांनी पोलिसांचा युनिफॉर्म सोलून आत असलेला माणूस दाखवला, आणि त्यालाही स्वभाव असतो, राग, हतबलता, जबाबदारी असते, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यालाही एक भूतकाळ असतो याची जाणीव करून दिली. या सगळ्या सिनेमांनी ‘पोलीस’ या एन्टिटीकडे ज्या नजरेनी पाहिलं त्याच नजरेने आपण आज त्याच्याकडे पाहणं प्रचंड गरजेचं आहे.


याची कारणं खूप आहेत. आज पोलीस हे भीतीदायक जगतायत. त्यांच्यावर प्रचंड प्रेशर आहे. मामुली चेन स्नॅचिंगपासून मल्टी स्टेट किडनी रॅकेटपर्यंत आणि तलावात ‘बुडवणाऱ्या’ गुंडापासून जागतिक दहशतवादापर्यंत सगळ्याची जबाबदारी फक्त त्यांच्यावर आहे. त्यांची अवस्था गोलकीपरसारखी आहे आणि समोर हजारो प्लेयर्स बॉल घेऊन तयार आहेत. तो अडवला तर कर्तव्य आणि नाही तर चूक या एकाच तत्त्वावर आज त्यांच्याशी सगळ्या स्तरातून वागलं जातंय. याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा, कारण त्यांच्यावर जबाबदाऱ्या प्रचंड आहेत आणि त्याबदल्यात मिळणारा मोबदला? अत्यंत किरकोळ.


अस्मानी सुलतानी संकटांना तोंड देणाऱ्या पोलिसांच्या हातात काय आहे आज? ना नीट पगार, ना नीट रहाण्याची सोय, ना सोयी सुविधा, ना आदराची वागणूक! राजकारण्यांच्या मागे पळणं, त्यांच्या बदलत्या राजकीय भूमिकांनुसार तत्पर रहाणं, सरकारच्या आदेशांचं पालन करण्यासाठी जीवाची पर्वा न करणं, तोच आदेश फिरवला की दात-ओठ खाणं, वर्षांतले बरेच दिवस आंदोलनं, रास्ता रोको, मोर्चे, धार्मिक सण, राजकीय रॅल्या यांच्यात अनुचित प्रसंग होऊ  नये म्हणून डोळ्यात तेल घालून घरदार सोडून थांबणं, तिथल्या माणसांकडून हीन दर्जाची वागणूक मिळणं, मिडीयाकडून सतत सकारात्मक नकारात्मक प्रेशर असणं, समाजातल्या वाढलेल्या उद्धटपणामुळे, बेशिस्तीमुळे त्रास करून घेणं, दबावाखाली लोकांना पकडणं, आणि दबावाखाली सोडून देणं, कधी बदली होण्यासाठी कधी न होण्यासाठी अक्षरश: हातापाया पडणं, प्रसंगी पैसे द्यायला लागणं, स्वत:च्या तब्येतीचे आणि मानसिकतेचे अतोनात हाल करणं यात सर्वसामान्य पोलिसांच्या सहनशक्तीचा काय कडेलोट होत असेल याची कल्पनाच न केलेली बरी!


पोलिसांमध्ये आणि जनतेत गेल्या काही काळापासून वारंवार उडणाऱ्या चकमकी हे आपल्यात पडत चाललेल्या दरीचं आणि पोलिसांमध्येही असलेल्या कमालीच्या असंतोषाचं मोठं ‘इंडिकेशन’ आहे, याची वेळीच दखल घ्यायला हवी. दुबळ्या माणसांवर पोलिसांचा दिसणारा खाक्या, हा त्यांच्या ‘पॉवरलेस’ वाटण्याचा परिणाम आहे, ‘पॉवरफुल’ वाटण्याचा नाही, हे समजून घ्यायला हवं. सरकार आपल्याला गुलाम म्हणून वागवतं आणि जनता गुंड म्हणून ही भावना पोलिसांमध्ये प्रबळ होत राहिली त्यांच्यातल्या असंतोषाचा स्फोट आपल्याला फार महागात पडेल!


आता कुणी म्हणेल, पोलिसांमध्ये दोष नाहीत का? तर तसंही नाही. आज सर्रास बाहेर ओरड होते की पोलिसात भरतीपासून भ्रष्टाचार होतो, पोलीस गुन्हेगारांना पाठीशी घालतात, पोलीस कामात दिरंगाई करतात, पोलीस प्रचंड पैसा छापतात, पोलीस त्रास देतात, पोलीस पैसे उकळतात. या तक्रारी काही प्रमाणात खऱ्या असतीलही, पण याने सरसकट पोलीस खात्याला धारेवर धरणं चूक वाटतं. भ्रष्ट होणं किंवा न होणं हा प्रत्येक माणसाच्या जडणघडणीतून, स्वभावातून आणि गरजेतून आलेला चॉईस आहे.


गेल्या काही वर्षांत समाज म्हणून टोकाचं प्रामाणिक असणं आणि टोकाचं भ्रष्ट असणं याच्यामध्ये जी ‘सोयीस्कर’ लोकांची जमात तयार झालीये, पोलीस हे त्याचंच बायप्रॉडक्ट आहे. सोयीनुसार प्रामाणिक आणि सोयीनुसार अ‍ॅडजस्ट होणारं कल्चर आता सगळीकडे सर्रास दिसतंय. पोलीस पैसे खातात म्हणून नावं ठेवणारे लोक स्वत:च्या हॉटेलसाठी लिकर लायसन्स मिळवायला राजकारण्यांना पैसे देतात. वर्षांतनं एकदा पोलिसांच्या कार्यक्रमाला जाणारे कलाकार नंतर कधीतरी ‘ड्रिंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’मध्ये पकडल्यावर त्याचाच दाखला देऊन सोडायचा आग्रह धरतात. आपल्याला समाज म्हणून कोणाचाही धाक नकोय आणि शिस्तीची तर आपल्याला अ‍ॅलर्जीच आहे. म्हणूनच पोलिसांना सरसकट ‘गैरवापर’ करणारे समजण्यात आणि वेळोवेळी त्यांना आपला वट वापरून ‘मॅनेज’ करण्यात आपण सगळे धन्यता मानतो ही आजची खरी शोकांतिका आहे.

पोलिसांकडे नव्या दृष्टिकोनाने पाहायची आज सर्वात जास्त गरज आहे. त्यांच्याशी सौजन्य हे ‘सप्ताहानं’ पाळून होणार नाही, त्यासाठी कायमस्वरूपी समन्वय असणं गरजेचा आहे. पोलिसांना कर्तव्य बजावताना अभिमान आणि चुकीचं पाऊल उचलताना भीती वाटणं इतपत ज्या दिवशी परिस्थिती बदलेलं त्या दिवशी पोलीस होणं ही शोकांतिका न रहाता आदराची गोष्ट होईल. मात्र तो दिवस येण्यासाठी सरकार, जनता आणि पोलीस खातं यांना अतोनात मेहनतीची, पारदर्शक संवादाची आणि एकमेकांबद्दल काळजी असण्याची नितांत गरज आहे. कारण कार्यक्षम शासन आणि शिस्तप्रिय समाजच प्रामाणिक आणि सक्षम पोलीस घडवण्यात मोलाचा वाटा उचलणार आहे. 


========================================



पोलीस हा जनतेचा मित्र असल्याचे सांगितले जाते, पण जनता आणि पोलीस यांच्यात नेहमीच एक अदृश्य अंतर असते. त्याला कारण, त्याच्या अंगावरची खाकी वर्दी.. या वर्दीच्या आतला माणूस नेहमीच सामान्यांसाठी गूढ असला, तरी तो माणूसच असतो. त्याला भावना असतात, वेदना असतात, विवंचनाहीvv07असतात. कधीतरी त्यातूनच तो वैफल्यग्रस्त होतो, आणि स्वतचे बरेवाईट करून घेतो. मग त्याच्यातल्या माणसाच्या वेदनांचा शोध सुरू होतो. आपल्या मुलाबाळांना चांगले आयुष्य देऊ शकत नाही या विवंचनेत तो कायमच असतो. त्यातूनच तो नैराश्याच्या पायऱ्या चढत जातो आणि शेवटी एका टोकाला जाऊन एकतर आत्महत्या करतो वा या तणावामुळे ग्रासल्याने अतिरक्तदाब, मधुमेह, नैराश्य यामुळे त्याला अकस्मात मृत्यू येतो. त्याच्या पश्चात कोणी त्याच्या कुटुंबीयांची काळजी घेत नाही. सेवानिवासस्थानही सहा महिन्यात रिक्त करावे लागते. वरिष्ठांकडे खेटे टाकूनही त्याच्या कुटुंबीयांना दाद मिळत नाही. भविष्यातील ही आपली स्थिती त्याला सतत पोखरत असते. यातून आपली कधीही सुटका नाही, याचीही त्याला कल्पना असते. आतापर्यंतच्या सरकारचे हेच अपयश आहे. पोलीस दलासाठी नेमके काय हवे आहे, याची जाणीव होऊन प्रत्यक्षात अमलबजावणी होईल तो पोलिसांसाठी सुदिन असेल!


राज्यभरातील पोलिसांच्या कुचंबणेचा घेतलेला धावता आढावा..

पोलीस दलाकडे नेहमीच अनुत्पादक (नॉन-प्रॉडक्टीव्ह) म्हणून पाहिले जाते. तरीही पोलीस हा महत्त्वाचा घटक आहे. पोलिसांच्या स्थितीकडे आतापर्यंत कुठल्याही सरकारला गंभीरपणे पाहावे असे न वाटल्याने पोलिसांची ‘हालत’ झाली आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या दृष्टिकोनात फरक पडेल, असे पोलिसांना वाटत होते. परंतु अजून तरी दृश्य स्वरूपात काहीही होऊ शकलेले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने गेल्या दोन-तीन वर्षांत संख्याबळ वाढविण्यावर भर दिला. परंतु केवळ मनुष्यबळ वाढवून पोलिसांवरील ताण कमी होणार आहे का? पोलिसांतील कामाचे समान वाटप जोपर्यंत होत नाही तसेच बदल्यांमध्ये पारदर्शकता येत नाही तोपर्यंतvv05पोलिसांवरील ताण कधीही संपुष्टात येणार नाही, असे माजी पोलीस अधिकाऱ्यांना वाटते.

पोलीस ठाण्यांचा अंदाज घेतला तर ‘मर्जी’तल्या पोलिसांवर नेहमीच मेहेरनजर केली गेल्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण कमी असतो आणि इतरांवर कमालीचा बोजा असतो. केवळ मुंबई पोलीस दलातच नाही तर राज्यातही इतरत्र अशाच तक्रारी ऐकू येतात. पोलिसांतील नैराश्याची पहिली ठिणगी तेथेच पडते. मुंबईतील ९३ पोलीस ठाण्यांचा विचार केला तर आजही अनेक पोलीस ठाण्यांची अवस्था दयनीय आहे. फारच कमी पोलीस ठाण्यांना स्वत:च्या इमारती आहेत. या इमारतीचीही दुरवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस ठाण्यांच्या देखभालीची काळजी वाहायची असते. परंतु वारंवार मागे लागूनही कुणीही ढुंकून बघत नाही, अशी स्थिती आहे. बहुसंख्य पोलीस ठाणी ही म्हाडा वसाहतीत वा पोलिसांच्या सेवानिवास स्थानात वा सरकारी बॅरेकमध्ये आहेत. आंबोली, जोगेश्वरी, कुरार, गोवंडी, धारावी, शिवाजीनगर, कस्तुरबा मार्ग, निर्मलनगर यासारख्या पोलीस ठाण्यांपेक्षा खुराडी बरी, असे म्हणण्याची पाळी येते. महिला पोलिसांची स्थिती तर भयानक आहे. लाजेखातर अनेक पोलीस ठाण्यांनी महिला पोलिसांना कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोली उपलब्ध करून दिली आहे. काही ठाण्यात आडोसा निर्माण करण्यात आला आहे.

त्यामुळे खासगी व्यक्तींच्या माध्यमातून पोलीस ठाण्याची रंगरंगोटी करण्याची पाळीही काही वरिष्ठ निरीक्षकांवर येते. खुच्र्या वा टेबल,े स्टेशनरीसाठीही पोलिसांना पुरस्कर्त्यांवर अवलंबून राहावे लागते.  

पोलीस दलात काम करणारा शिपाई, पोलीस नाईक, हवालदार आणि बढती मिळालेला सहायक उपनिरीक्षक हा अशा व्यवस्थेला बळी पडणारा खरा वर्ग आहे. उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक, निरीक्षक, वरिष्ठ निरीक्षक, सहायक आयुक्त, उपायुक्त ते महासंचालकही याच दलाचा भाग असला आणि त्यांच्यावरही तणाव असला तरी आर्थिकदृष्टय़ा (वेतनाच्या दृष्टिकोनातून) त्यांची स्थिती बरी असल्यामुळे त्यांना थेट फटका बसत नाही. मात्र कनिष्ठ स्तरावरील पोलीस या आगीत जळत असतो. त्यांच्या अडचणी ऐकून घ्यायला वरिष्ठांकडे वेळ नसतो. अशातच नैराश्य आलेला हा पोलीस त्यातून बाहेरच पडत नाही आणि मग आत्महत्येसारखा मार्ग अवलंबित असतो. हक्काची साप्ताहिक सुट्टीही नाकारली जाण्याची घटना जगभरात फक्त पोलीस दलातच घडू शकते. पूर्वी फक्त गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, दिवाळी तसेच ईद, सणानिमित्त बंदोबस्त लावला जात असे. त्यावेळीच सुट्टय़ा रद्द होत असत. आता तर प्रत्येक सणाला बंदोबस्त लावून सुट्टय़ा रद्द केल्या जातात.

घरापासून दूर असलेले पोलीस ठाणे, प्रवासात जाणारा वेळ आणि ठाण्यात गेल्यानंतर केवळ वरिष्ठच नव्हे तर आम जनतेकडूनही मिळणारी कस्पटासमान वागणूक याने तो पार पिचलेला असतो. परिणामी अनेक विकारांनी त्याला ग्रासले जाते. मुलाबाळांना चांगले घर, आयुष्य देऊ शकत नाही या विवंचनेत तो कायमच असतो. त्यातूनच तो नैराश्येच्या अनेक पायऱ्या चढत जातो आणि शेवटी एका टोकाला जाऊन एकतर आत्महत्या करतो वा या तणावामुळे अतिरक्तदाब, मधुमेह, नैराश्य यामुळे त्याला अकस्मात मृत्यू येतो. या दुष्टचक्राचा शेवट होण्याची राज्यातील पोलिसांना आस आहे.


पोलिसांतील नैराश्याची काही कारणे..

*सकाळी आठच्या डय़ुटीसाठी घरापासून दूर असलेल्या पोलीस ठाण्यात वेळेत पोहोचायचे. पण १२ तास डय़ुटी करूनही सुटका होईल याची शाश्वती नाही.

*दिवसभराच्या डय़ुटीतच केलेल्या चांगल्या कामाचे क्वचितच कौतुक.

*थोडासा हलगर्जीपणा झाला तरी वरिष्ठांचे खडे बोल हमखास ऐकावे लागत. कुणी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलाच तर वरिष्ठांचे ऐकत नाही, असा कांगावा.

*बंदोबस्ताच्या ठिकाणी कुठलीही व्यवस्था नाही. क्वचितच लोकांकडून मदत.

*हक्काची रजा अगोदर मागूनही ती शेवटपर्यंत मंजूर न करणे. आग्रह धरलाच तर कारवाईची धमकी.

*वरिष्ठांकडून खासगी कामे सांगितली जाणे. अगदी मुलीला शाळेतून आण वगैर.


कमी मनुष्यबळ, अपुऱ्या सुविधा अन् आरोग्याच्या समस्या!

पुणे

पुणे शहराचा विस्तार वेगाने होत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या साठ लाखांच्या जवळ पोहोचली आहे. या लोकसंख्येसाठी आता पुण्यात ३८ पोलीस ठाणी झाली आहेत. पण, त्या मानाने व लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस मनुष्यबळ फारच कमी आहे. त्यामुळे कामाचा वाढलेला ताण, एकूण पोलिसांपैकी निम्मे पोलीस घरापासून वंचित असलेल्या पोलिसांच्या घराची अवस्था बिकट, बारा तासांपेक्षा जास्त कामाचा कालावधी, त्यामुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या समस्या आणि कुटुंबाला वेळ न देता येणे, अशा मन:स्थितीत सध्या पुण्यातील पोलीस कर्मचारी काम करीत आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांत काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचे तर काहींना आजारपणामुळे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

अलीकडे पुण्याचा विकास वेगाने होत असून उपनगरांमध्ये झपाटय़ाने वाढ झाली आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अनेक गावे नव्याने समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे पुण्यात नव्याने आठ ते दहा पोलीस ठाणे निर्माण झाली. पण त्या तुलनेत पोलिसांचे संख्याबळ वाढले नाही. त्यामुळे एका-एका पोलीस ठाण्यात फक्त पन्नास ते साठ कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. साहजिकच त्याचा पोलिसांच्या कामावर ताण येतो. पुण्यात एक हजार नागरिकांमागे एक पोलीस अशी परिस्थिती आहे. आहे त्या मनुष्यबळातच बंदोबस्त, तपास, पोलीस ठाण्याचे काम, न्यायालयाचे काम पाहावे लागते. त्यात सुट्टी मिळत नसल्यामुळे कुटुंबीयांना वेळ देता येत नाही. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ नसतो. त्यामुळे पोलिसांना आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. याबरोबरच पुणे पोलीस आयुक्तालयात दहा हजार पोलीस अधिकारी कर्मचारी असले तरी फक्त चार हजार चारशे घरे उपलब्ध आहेत. त्यामुळे साडेपाच हजार पोलिसांना घरापासून वंचित राहावे लागत आहे. पुण्यात असलेल्या सहा पोलीस वसाहतीचीदेखील अवस्था फारच वाईट आहे. त्यातदेखील सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे अनेक पोलिसांनी बोलून दाखविले.




पोलिसांचे मनोगत निबंध मराठी

जिल्हा पोलीस प्रमुख

history of police

महाराष्ट्र पोलीस पदे

maharashtra police

पोलीस माहिती


पोलीस भरती माहिती

पोलीस माहिती

महाराष्ट्र पोलीस पदे

मी पोलिस होणार मराठी निबंध

जिल्हा पोलीस प्रमुख

पोलीस स्टेशन माहिती

essay on police officer in marathi

essay on traffic police in marathi

marathi essay on traffic policeman

essay in marathi on policeman

essay on policeman in marathi

No comments:

Post a Comment