How to save money on Corona Virus Lockdown Period
माझे नाव आहे डॉ.प्रवीण कुलकर्णी मी तुम्हाला व तुमच्या विचारांना बदलून देतो.
मी आत्ता जे काही सांगणार आहे त्यामुळे घाबरू नका, हा लेखनप्रपंच तुम्हाला सावधान करण्यासाठी आहे. गरीबाला सरकार मदत करतय. श्रीमंताचे फारसे काही बिघडणार नाही. पण कनिष्ठ व मध्य मध्यमवर्गीय वर्गातल्या लोकांनी स्वतःच स्वतःची मदत आत्तापासूनच सुरू करायचीय.
म्हणजे आत्ता जो काही पैसा तुमच्याकडे आहे. तो पुढचे सहा महिने कसा पुरेल हे आजपासून ठरवा व तो पुरवता आला पाहिजे असे नियोजन करा. तुमच्याकडे असणाऱ्या पैशांचे व खात्रीलायक येवू शकणाऱ्या पैशांचे नियोजन पुढील सहा महिने तोच पुरवून पूरवून वापरायचा आहे. लक्षात ठेवा सरकारने गरीबांचे जुलैपर्यंतचे नियोजन केलय याचा अर्थ हे लॉकडाउन वैगैरेचा काळ जुलैपर्यंत वाढू शकतो असा माझा कयास आहे.
आता समजा जुलैपर्यंत तुम्हाला काही कमवायला बाहेर पडता येणार नाही. व रोजचे खर्च चालूच रहाणार आहेत. त्यानंतर सगळ चालू व्हायला तुम्ही ज्या छोट्यामोठ्या कंपनीला किंवा तुम्ही जो छोटामोठा व्यवसाय करताय तो पुन्हा सुरू होवून फायदा किंवा पगार मिळायला पुढचा एक महिना लागेल. म्हणजे अॉगस्टच्या मध्यावर कुठेतरी तुमच्याकडे पैशांची आवक सुरू होवू शकते. त्यातही तुम्ही याअगोदर जितके कमवत होता तितके मिळतीलच याची खात्री नाही. म्हणून तुमच्याकडे 1)एप्रिल, 2)मे, 3)जून, 4)जुलै 5 वा अॉगस्ट इतके महिने पकडून तुमच्याकडे असलेली बचत वापरावी लागेल. ज्याची कमाई कोरोनामुळे थांबली आहे. त्यांनी या सुचनेचा आवश्य विचार करावा. आज आत्तापासूनच हा विचार करा. शक्यतोवर आपल्याकडे आहे त्यातच भागवायला हवय. रात्र वैऱ्याची आहे.
तेंव्हा या काळात उधारी उसणवारी टाळा.आर्थिक नियोजन बुध्दी चालण्यासाठी व घरात शांतता राखण्यासाठी फायदेशीर ठरते. अशा नाजुक प्रसंगात सावधानता, काटकसर खूप महत्वाची ठरते.
आत्ता 4 किलो तेल लागत असेल तर दोन किलोत भागवायला लागेल. अशा अनेक गोष्टी असतील शोधा. याला लुप होल्स म्हणतात. जे कमी वापरले तरी चालते व जे वापरलेच नाही तर काही बिघडत नाही.
अशा कमी करता येणाऱ्या व न वापरू शकणाऱ्या वस्तू गोष्टी टाळा याला मिनिमलिजम् असेही आपण म्हणू शकतो. बघा तुमचे आमचे संसार हातावरचे आहेत. महिण्याचं ठराविक उत्पन्न व खर्च याची सांगड घालता घालता नाकी नवू येतात. त्यात आजारपणं, पै पाहुणे सण वार हे सगळ सांभाळताना तारेवरची कसरत असते. आणि सरकारच्या लेखी आपण गरीब नसून मध्यमवर्गीय असतो. आपल्याला फारतर इएमआय भरला नाही तर त्यावर लागणारा दंड माफ केला जावू शकतो किंवा इएसआय पीएफ सरकार भरेल इतकेच. तेंव्हा काटकसर व भावनिकतेला आवर यावरच आर्थिक नियोजन करा.आहे ती परिस्थिती स्विकारावी लागेल. कुठल्याही कर्ज खात्याला जोडलेल्या अकौंटला पैसे न ठेवता अशा अकौंटला ठेवा तुमचे पैसे बँक परस्पर कापू शकणार नाही. तुम्हाला हे अकौंट सहज वापरता येईल. समजा हे सगळं खूप लवकर निवळलं तर पुढे खर्चायला तुम्हालाच मिळतील जे शिल्लक रहातील ते.

No comments:
Post a Comment