Kelkar Museum in Pune - See Virtually in 3D

पुण्याचे केळकर संग्रहालय 3D मध्ये घरबसल्या पहा !

Kelkar Museum in Pune - See Virtually in 3D

पुण्यातील राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय म्हणजे अक्षरश: एक चमत्कार आहे. पुरातन भारतीय संस्कृतीच्या भरजरी खुणा या संग्रहालयाने जपून ठेवल्या आहेत. जगातील बहुसंख्य संग्रहालये ही राजसत्तेच्या आश्रयाने उभी राहिली आहेत. तसेच जगातील धनाढ्य उद्योगपतींनी धंद्यातील पैशांवर अनेक संग्रहालये उभारली आहेत. पण धोतर-कोट-टोपी वापरणारे साधारणतः मध्यमवर्गीय असलेले कै. दिनकर उर्फ काका केळकर यांनी स्वतः पायपीट आणि पदरमोड करून जमवलेल्या वस्तू आपण पाहिल्यावर अक्षरश: अवाक होतो. पुण्यात त्यांनी स्वतःच्या दिवंगत पुत्राच्या नावाने उभारलेले वस्तू संग्रहालय म्हणजे साक्षात सरस्वतीचा दरबारच आहे !
            माझ्या संग्रहवेडापायी मी हे संग्रहालय आजवर ५० हुन अधिकवेळा पाहिले आहे. सध्या आपण कुठेही बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे आपण सर्व घरबसल्या हे संग्रहालय त्रिमितीने पाहू शकता. पुण्याच्या नितीन करमरकर यांनी हा त्रिमिती दर्शन ( 3D ) प्रकल्प आपल्यासाठी उपलब्ध केला आहे. सर्व संबंधितांचे शतश: आभार !
 खालील साईट उघडल्यावर टॅप करीत, डावीकडे उजवीकडे ड्रॅग करीत आपण ही जादुई सफर पूर्ण करू शकतो.
संग्रहमहर्षी काकासाहेब केळकरांना आदरांजली !
*** मकरंद करंदीकर

https://my.matterport.com/show/?m=VavyUHG166x&help=2&play=1&dh=1&nozoom=1

No comments:

Post a Comment