Saturday, March 28, 2020

How to live in Lockdown period of Corona Virus

सध्या लॉकडाउन चा काळ चालू आहे. आपल्या जिल्ह्यात  कोरोनाचा प्रसार होत आहे. पण तुम्हाला तुमच्या रोजच्या वस्तूंसाठी बाहेर पडावे लागेल. यासाठी खालील सूचनांचे पालन करा :-

🛑 १ व्यक्ती :- कुटुंबामधील एका प्रौढ व्यक्तीची बाहेर जाण्यासाठी निवड करा. फक्त तो/ ती बाहेर जाऊ शकेल. बाकी कोणीच जाणार नाही.

🛑 १ ड्रेस :- एकाच प्रकारचा आणि एकच ड्रेस त्या व्यक्तीला दरवेळी वापरायला द्या. शक्यतो पूर्ण बाह्याचा तो ड्रेस असावा. तो ड्रेस तुम्ही इतर कपड्यांमध्ये मिसळू देऊ नका.

🛑 १ पाकीट :- नेहमी एकच पाकीट वापरा. घरातील पैशांमध्ये त्या पाकिटातील चलनी नाणी, नोटा आणि कोणतेही कार्ड मिसळू देऊ नका.

🛑 १ सामानाची पिशवी :- दरवेळी एकच आणि तीच पिशवी सामान आणण्यासाठी वापरा.

🛑 १ वाहन :- एकच वाहन आणि त्याची एकच किल्ली नेहमी वापरा. सार्वजनिक वाहतूक करू नका.

🛑 १ वेळच जाणे :- सतत बाहेर जाणे टाळा. एकाच वेळी तुमची सर्व कामे करण्याचा प्रयत्न करा.

⛔तुमचा फोन सोबत घेणे / वापरणे टाळावे.

⛔गर्दी टाळा आणि तुमचे काम झाल्या झाल्या लगेच घरी परता.

⛔तुमचा नेहमीचा वापरात नसलेला हात किंवा कोपर वापरून दरवाजे उघडा, किंवा बटन दाबा.

🛑 तुम्ही घरी परतल्यानंतर :- तुमचे कपडे, पाकीट, पिशवी, किल्ल्या वेगळ्या पिशवीमध्ये ठेवा. त्यांना कोठेही मिसळू देऊ नका. कोठेही हात लावण्याआधी तुमचे हात आणि चेहरा संपूर्णपणे साबणाने / सॅनिटीझरने धुवून घ्या. तुमच्या फोनचा संपूर्ण भाग साबणाने / सॅनिटीझरने स्वच्छ करा.

📵 बाहेर जाताना फोन न वापरणे हाच सर्वात चांगला उपाय आहे.

लक्षात ठेवा, आपण रोगाचा प्रसार कधीच टाळू शकत नाही, पण त्याचा प्रसार कमी नक्कीच करू शकतो.

No comments:

Post a Comment