Saturday, March 28, 2020

जेव्हा पक्ष्यांचा किलबिलाट कानावर पडतो तेव्हा आज मी त्यांच्या मुक्त विहाराचा  हेवा करू लागतो . किती बळ आहे त्यांच्या पंखात . पण माणसाच्या मेंदू इतकं नाही ना . म्हणूनच  हा दोन पायांचा माणूस आपल्या हावरट मेंदूच ऐकून निसर्गाला आव्हान देतो .  संपूर्ण जंगल तोडतो .त्या जंगलात वसलेले असतात  कित्येक जीव. जे चिरडले जातात.  कैक घरटी उध्वस्त होतात . मोठे प्राणी पळून  जातात.  पक्षी उडून जातात .अश्यावेळी तग धरून राहतात  ते बिळात राहणारे.सध्या मी पण बिळात राहणार आहे  . तुम्ही उंदीर समजलात तरी चालेल.पण मला मुंगी होऊन हि लढाई जिंकायचीय .गरजेला बाहेर पडायचं झालंच तर रांगेचे नियम पाळीन .पण झुरळ होऊन शिकार होणार नाही . सध्या या गरजेसाठी पण किती जण आपले प्राण धोक्यात घालतायत .आज असं वाटतंय तेव्हा र धो कर्वेंचं ऐकलं असतं तर आज हि गर्दीची लाट जरा आटोक्यात ठेवता आली असती . पण आम्ही त्यांना  न्यायाच्या चौकटीत अडकवलं .   
असो कुणीतरी पेस्ट कंट्रोल सुरु केलंय. जाणून बुजून कि नकळत या चर्चेला आता अर्थ नाही .इतक्यात बागेमध्ये एक फुलपाखरू दिसलं . त्याच्या कडे बघून मला आठवल मला फुलपाखरू व्हायचंय भुंगा नाही .कारण गरजेचं रूपांतर लालसेत कधी होतं हे आपल्याला हि कळत नाही.
   
महेंद्र तुकाराम कदम
======================

मीडियावाले ज्यांचा श्रेष्ठ समाज सेवक किंवा विवेकवादी  किंवा विचारवंत म्हणून उल्लेख करत असतात ते कुमार सप्तर्षि, शाम मानव, हमिदभाय दाभोळकर, तृप्ति देसाई, तिस्ता सेटलवाड, अमर्त्य सेन, अरूंधती राॕय करोंनाच्या यद्धात कुठलीच आघाडी  सांभाळताना दिसत नाहीत.
निदान करोंनाचा कहर चालू असताना मशिदीत गोळा होऊ नका, नमाज पढून करोंना जात नाही एवढी तरी अंधश्रद्धा दूर करताना दिसत नाहीत. सगळ्या देवळात जाऊन अमका हक्क - तमक्या  हक्काच्या नावाखाली धुडगूस घालत असतात तेही डोंगरी भागात किंवा मालेगावात जाऊन रस्त्यावर जमू नका, गर्दी करू नका, पोलिसांना सहकार्य करा असे सांगायला दिसत नाहीत.
सगळेच काम  सरकारी पातळीवर चालू आहे किंवा  एखादी संघटना! बाकी सगळे पोलिस आणि आरोग्य कर्मचारीच सांभाळताहेत. सध्याच्या दिवसात उणी दुणी काढायची वेळ नाही, पण तमाम शाहू फुले आंबेडकर भक्त, डावे बाराही महीने हिंदूंच्या चुका शोधून शोधून दाखवण्यात मश्गुल असतात ते सगळे दिवाभिता सारखे  लपून बसलेत. यांच्या सेवादल, युवक बिरादरी सारख्या  छान छान संघटना / कार्यकर्ते आहेत त्यांना सामाजिक भान असावे अशी अपेक्षा होती.
 एरवीच्या १२ महिन्यात उधळलेला उत्साह(उन्माद) घेऊन ही मंडळी मैदानात उतरली तर सरकारवरचा आणि वैद्यकीय टीमवरचा भार कमी होईल. हे सगळे स्वतःला दीन-दुबळ्यांचे, अल्पसंख्यकांचे तारणहार आणि समाज सेवक मानतात म्हणून हे लिखाण. माझा आतला आवाज सांगतोय की हे सगळे पंचतारांकित वृत्तीचे ह्यातलं काहीही करणार नाहीत. मात्र, करोनाचं संकट संपलं की सरकारचं हे चुकलं, सरकारने ते का नाही केलं वगैरे सूर लावून अभद्र आणि अमंगळ कोल्हेकुई नक्की करतील.

======================


No comments:

Post a Comment