Friday, April 16, 2021

Businessman and his Lazy Son - Story in Marathi with Moral

 

एका शहरात एक व्यापारी राहत होता. त्याला एकुलता एक मुलगा होता. हा मुलगा खूप आळशी होता. मुलगा कोणतेही काम करत नव्हता, फक्त वडिलांचे पैसे खर्च करायचा. व्यापाऱ्याने विचार केला की, असेच चालू राहिले तर माझा बिझनेस हा मुलगा बुडवून टाकेल.



 एके दिवशी व्यापाऱ्याने मुलाला बोलावून घेतले आणि सांगितले की, आज तू बाजारात जाऊन दिवसभर काम करायचे आणि जे काही पैसे कमावशील ते मला आणून द्यायचे. अन्यथा तुला घरात प्रवेश दिला जाणार नाही. वडिलांचे शब्द ऐकून मुलगा घाबरला आणि त्याने सर्व घटना आल्या आईला सांगितली.

आईने लगेच त्याला सोन्याचे एक नाणे दिले. संध्याकाळी व्यापारी घरी आल्यानंतर त्याने मुलाला विचारले, आज किती पैसे कमावले? मुलाने लगेच सोन्याचे नाणे वडिलांच्या हातामध्ये ठेवले. वडील म्हणाले हे नाणे बाहेर विहिरीत टाकून ये. मुलानेही तसेच केले.

व्यापाऱ्याच्या लक्षात आले होते, मुलाला सोन्याचे नाणे कोणी दिले होते. दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्याने आपल्या पत्नीला एका नातेवाईकाकडे पाठवले आणि मुलासमोर पुन्हा तीच अट ठेवली. यावेळी मुलगा बहिणीकडे गेला. बाहिनेने त्याला काही रुपये दिले. संध्याकाळी व्यापारी घरी आल्यानंतर त्याने तेच पैसे व्यापाऱ्याला दिले

व्यापाऱ्याने पुन्हा ते पैसे विहिरीत टाकून देण्यास सांगितले. मुलानेही तसेच केले. व्यापाऱ्याला पुन्हा सर्व सत्य समजले. यावेळी व्यापाऱ्याने आपल्या मुलीलाही नातेवाईकांकडे पाठवेल आणि मुलासमोर तीच अट ठेवली. यावेळी मुलाकडे कष्ट करण्याशिवाय इतर कोणताही मार्ग शिल्लक नव्हता.

मुलगा सकाळी उठून बाजार गेला. तेथे एका दुकानदाराने त्याला दुकानात सामान ठेवण्याचे काम दिले. सामान खूप जड होते. व्यापाऱ्याच्या मुलाने कसेतरी काम पूर्ण केले. दुकानदाराने त्याला 100 रु. दिले. संध्याकाळी थकलेला मुलगा घरी पोहोचल्यानंतर वडिलांनी आज किती रुपये कमावले असे विचारले.

मुलाने 100 रुपये वडिलांच्या हातावर ठेवले. वडिलांनी पुन्हा त्याला ते पैसे विहिरीत टाकून देण्यास सांगितले. हे ऐकताच मुलाला खूप राग आला आणि तो वडिलांना म्हणाला- एवढ्याश्या पैशांसाठी आज मला दिवसभर कष्ट करावे लागले आणि तुम्ही मला हे पैसे विहिरीत टाकण्यासाठी सांगणात आहात.

मुलाचे उत्तर एकूण व्यापारी म्हणाला- आज तुला समजले की पैसे किती कष्टाने कमवावे लागतात आणि एवढे वर्ष झाले तू माझ्या पैशांवर ऐश करत होता. मुलाला वडिलांचे बोलणे लक्षात आले आणि त्याने वडिलांची क्षमा मागून बिझनेसमध्ये तुम्हाला मदत करणार असे वचन दिले.

Moral

जीवनात सुख-सुविधा, आराम अशाच मिळत नाही त्यामागे कष्ट असतात. योग्य वेळ आल्यानंतर आपणही आपली जबाबदारी पार पडण्यास सज्ज राहावे अन्यथा शेवटी हातामध्ये काहीही राहणार नाही.


farmer and his lazy sons story in marathi

lazy son story in written

farmer and his four sons story in marathi

the farmer and his lazy sons

the farmer and his four sons moral story in marathi language

laziness moral story

lazy son story in english pdf

a farmer and his three sons story for class 5

No comments:

Post a Comment