Buddha Angulimal Story With Moral In Marathi, English
Gautama Buddha had many disciples, but one of them was the most different, he was a bandit. People used to call him Angulimal. Once Gautama Buddha was traveling through Vaishali city. They were stopped by some people. People told Buddha that in the forest outside Vaishali lives a robber named Angulimal. He robs people, kills them, and then cuts off their fingers. Instead of going in front of such a dangerous person, you should stay here tonight.
Gautama Buddha said, once I decide to travel, I do not look back. I have to go. People tried hard to stop him, saying that he would come with them for safety, but the Buddha left alone. Gautam Buddha alone set out for another city by forest road. The road was thick with jungle and it was getting dark. Then Angulimal came and stood in front of them. Gautama Buddha was not frightened, calmed down and kept looking at him.
The robber said who are you? The Buddha introduced himself. The robber said to the Buddha, "I will kill you and make a ring out of your fingers." The Buddha said nothing and kept smiling. The fingertips became a little uncomfortable. He said angrily, Your death is before you, give me whatever you have. Otherwise I will kill you.
The Buddha replied calmly, "Brother, I have nothing, I am a beggar, I beg from people myself." Angulimar spoke angrily again, if you have nothing to give, get ready to die. I will kill you and make a ring around your neck. Gautama Buddha looked at him and kept smiling. He asked the Buddha, You are not afraid of death.
The Buddha said, brother, why should I be afraid of you, you are also a man like me. Why should one man be afraid of another? I am not afraid of death. If you want to kill me and be happy, kill me without hesitation. What could be bigger for me than my death being the cause of someone’s happiness. Kill me without hesitation.
The sword fell out of Angulimal's hand. He had never seen such a person standing so easily before death. All his terror was defeated before the personality of the Buddha. He grabbed the Buddha's feet. The Buddha embraced him, rescued him, and made him his disciple.
Moral of the story
No matter how bad a person is, but if you don't give up your goodness, no one can hurt you. Every evil deed has to bow before truth and religion. It is useless to be afraid to face difficulties and problems. Face it with a calm mind.
==========
गौतम बुध्दांचे अनेक शिष्य होते, पण त्यांच्यामधील एक सर्वात वेगळा होता, तो एक डाकू होता. त्याला लोक अंगुलीमाल नावाने ओळखायचे. एकदा गौतम बुध्द वैशाली नगरातून प्रवास करत होते. त्यांना काही लोकांनी अडवले. बुध्दांना लोकांनी सांगितले की, वैशालीच्या बाहेरच्या जंगलात एक अंगुलीमाल नावाचा डाकू राहतो. तो लोकांना लूटतो, मारतो आणि नंतर त्यांच्या हाताचे बोटे कापून त्याची माळ बनवून घालतो. अशा खतरनाक व्यक्तीसमोर जाण्यापेक्षा तुम्ही आज रात्री येथेच मुक्काम करा.
- गौतम बुध्द म्हणाले, मी एकदा प्रवास करण्याचा निर्णय घेतला तर मी मागे वळून पाहत नाही. मला जावेच लागेल. लोकांनी अडवण्याचा खुप प्रयत्न केला, सुरक्षेसाठी सोबत येतो असेही म्हणाले, पण बुध्द एकटेच निघाले. एकटे गौतम बुध्द जंगलाच्या रस्त्याने दूस-या शहरासाठी निघाले. रस्त्यात दाट जंगल आले आणि अंधार पडू लागला. तेव्हाच अंगुलीमाल त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला. गोतम बुध्द घाबरले नाही, शांत होऊन त्याला पाहत राहिले.
- डाकू म्हणाला तुम्ही कोण आहात? बुध्दांनी आपला परिचय दिला. डाकू बुध्दांना म्हणाला की, तुला मारुन तुझ्या हाताच्या बोटांची माळ बनवून घालेल. बुध्द काहीच बोलले नाही आणि हसत राहिले. अंगुलीमाल थोडा असहज झाला. तो रागात म्हणाला, तुझा मृत्यू तुझ्यासमोर उभा आहे, तुझ्याकडे जे काही असेल तर मला दे. अन्यथा मी तुला मारुन टाकेल.
- बुध्दांनी शांततेत उत्तर दिले, भाऊ माझ्याकडे तर काहीच नाही, मी तर एक भिक्षुक आहे, स्वतः लोकांकडून मागून खातो. अंगुलीमार पुन्हा रागात बोलला, तुझ्याकडे देण्यासाठी काही नसेल तर मरण्यासाठी तयार हो. मी तुला मारुन तुझ्या बोटांची माळ बनवून गळ्यात घालेल. गौतम बुध्द त्याला पाहून हसत राहिले. त्याने बुध्दांना विचारले, तुला मरणाची भीती वाटत नाही.
- बुध्द म्हणाले, भाऊ मी तुला का घाबरु, तु पण माझ्याप्रमाणे मनुष्य आहेत. एका मनुष्याने दूस-या मनुष्याला का घाबरावे. मला मृत्यूचे भय वाटत नाही. जर मला मारुन तुला आनंद मिळणार असेल, तर नि:संकोच तु माझा वध कर. माझा मृत्यू एखाद्याच्या प्रसन्नतेचे कारण बनत असेल, यापेक्षा मोठे माझ्यासाठी काय असू शकते. तु निःसंकोच माझी हत्या कर.
अंगुलीमालच्या हातातून तलवार पडली. मृत्यूसमोर एवढ्या सहजरित्या उभा राहणारी व्यक्ती त्याने यापुर्वी पाहिली नव्हती. बुध्दांच्या व्यक्तित्वापुढे त्याचा सर्व आतंक पराभूत झाला. त्याने बुध्दाचे पाय पकडले. बुध्दांनी त्याची गळाभेट घेऊन त्याचा उध्दार केला आणि त्याला आपला शिष्य बनवले.
कथेचे तात्पर्य
एखादा व्यक्ती किती वाईट असली, पण जर तुम्ही तुमचा चांगूलपणा सोडला नाही तर कुणीही तुमचे काहीच बिघडवू शकत नाही. सत्य आणि धर्मापुढे प्रत्येक वाईट गोष्टीला झुकावे लागते. अडचणी आणि समस्यांना समोर बघून घाबरणे निरर्थक आहे. शांत मनाने त्याचा सामना करा.
No comments:
Post a Comment