Raja And Mantri Story in Marathi With Moral

 एका राज्यात एक राजा राहायचा. तो खुप धार्मिक आणि वीर होता. या राजामध्ये अनेक गुण होते. एक दिवस त्याच्या दरबारात एक ज्योतिषी आला. एका मंत्र्याने सांगितले की, तो खुप सिध्द ज्योतिषी आहे. याची भविष्यवाणी नेहमी सत्य होते. राजाची उत्सुकता वाढली. त्याने ज्योतिषीला आपल्या महालात बोलावले. महालात राजाने आपली कुंडली दाखवली. ज्योतिषी खुप वेळ कुंडलीचा अभ्यास करत राहिला, त्याने राजाला सांगितले की, तुमचे आयुष्य तर वाईट आहे. तुमच्या सर्व नातेवाईकांचा तुमच्यासमोर मृत्यू होईल. तुम्ही तुमच्या वंशात एकटेच जिवंत राहाल. 



- ज्योतिषीचे बोलणे ऐकून राजाला खुप धक्का बसला. तो निराशेत गेला. त्याचे कामात मन लागत नव्हते. दरबारात राजा गप्प गप्प राहत होता. हे पाहून सर्व मंत्री त्रस्त झाले. पण राजाला काय झाले आहे हे विचारण्याची कुणाचीही हिंमत झाली नाही. एक दिवस मणिराज नावाच्या एका समजदार मंत्र्याने एकांत पाहून राजाला उदास राहण्याचे कारण विचारले. तेव्हा राजाने मंत्र्याला ज्योतिषीने सांगितलेले सत्य सांगितले. राजा म्हणाला की, माझे सर्व कुटूंब माझ्यासमोर संपणार. या गोष्टींचा मला खुप धक्का बसला आहे. कुटूंबाच्या सुरक्षेसाठी मी खुप त्रस्त आहे. मंत्र्याला समजले की, राजा खुप अडचणीत आहे. मंत्री राजाला म्हणाला की, मी एक पंडित जगन्नाथजी यांना ओळखतो. ते खुप सिध्द आहेत. आपण त्यांना बोलायला हवे. 

- राजा म्हणाला ठिक आहे. त्यांना बोलवा. पंडित जगन्नाथ यांना बोलावण्यात आले. मंत्र्यांनी अडचण सांगितले. पहिल्या पंडितांनी केलेली भविष्यवाणीही सांगितली. पंडित जगन्नाथनेही राजाची कुंडली पाहिली. कुंडली पाहून पहिल्या पंडिताची भविष्यवाणी खरी असल्याचे जगन्नाथ पंडिताला कळाले. पण त्यांना राजाला खोटेही सांगता येत नव्हते. जगन्नाथ पंडितांनी दोन मिनिटे विचार केला. नंतर ते चेह-यावर चमक आणत म्हणाले की, तुमच्या कुंडलीत तर दुःखाचा कोणताच योग नाही, तुम्ही दिर्घकाळ राज करणार आहात. तुमचे राज्य सतत वाढत राहिल, वर्षानुवर्षे तुम्ही सिंहासनाची शोभा वाढवाल. धन आणि आयुष्यात तुम्ही सर्व कुटूंबाच्या पुढे असणार आहात. तुमच्या एवढे आयुष्य कुटूंबातील कुणाच्याही नशीबात नाही. तुमच्या कुंडलीत काहीच चुकीचे नाही. 



- पंडित जगन्नाथ यांनी पहिल्या पंडिताने केलेली भविष्यवाणी केली. पण राजा जिवंत असताना त्याचे सर्व नातेवाईकांचा मृत्यू होईल असे न सांगता, कुटूंबात सर्वात जास्त आयुष्य तुम्हाला लाभेल असे सांगितले. आणि हे ऐकून राजाला खुप आनंद झाला. राजाने पंडिताला खुप बक्षिस दिले. 



लाइफ मॅनेजमेंट 

सत्य हे कटू पध्दतीने सांगावे हे गरजेचे नसते. अनेक वेळा आपल्या बोलण्याच्या पध्दतीने वेगळे परिणाम होतात. सत्य कटू आहे किंवा कठोर असेल तर ते सकारात्मक पध्दतीने सांगितले जाऊ शकते. 

No comments:

Post a Comment