एका गावात एक मेहनती मुलगा राहत होता. तो आपले प्रत्येक काम प्रामाणिकपणे करायचा. एकदा राजाने सांगितले की, गावात एका स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे, यामध्ये भाग घेणा-यांना उंच पर्वत सर करावा लागेल. जो ही स्पर्धा जिंकेल, त्याला राजाकडून बक्षीस देण्यात येईल.
यापुर्वीही कुणीही तो पर्वत सर करु शकला नव्हता. ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, ते परत येऊ शकले नाही. तरीही खुप लोकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या मेहनती तरुणालाही या स्पर्धेची माहिती मिळाली. त्याने स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेतला. पण तो पर्वत सर करणे खुप अवघड होते.
हळुहळू गावात वृत्त पसरले की, त्या पर्वतावर जंगली प्राणी राहतात. या पर्वतावर चढणा-यांना ते खाऊन टाकतात. काही लोकांनी सांगितले की, या पर्वताचे रस्ते खुप कठीण आहेत. हे ऐकून अनेक लोकांना स्पर्धेमधून माघार घेतली. पण तरीही काही लोकांनी स्पर्धेत सहभागी होण्यास होकार दिला. हे पाहून काही लोक त्यांना पुन्हा घाबरवू लागले. यामुळे अजून काही तरुण मागे फिरले. आता फक्त 10 तरुण या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राहिले होते. यामध्ये हा मेहनती मुलगाही होता. स्पर्धा सुरु झाली. सर्वांना पर्वत सर करणे सुरु केले. तेव्हा गावातील लोकांनी पुन्हा काहीही बोलायला सुरुवात केली. स्पर्धकांना घाबरवण्याचा सर्वांनी प्रयत्न केला. पण तो मेहनती मुलगा त्याच्या गतीने पर्वतावर चढला आणि जिंकला. तेव्हा लोकांनी त्याला त्याच्या जिंकण्याचे कारण विचारले. तर तेव्हा सर्वांना कळाले की, तो बालपणापासून बहिरा आहे.
Moral
जेव्हा आपण एखादे नवीन काम सुरु करतो, तेव्हा बरेच लोक आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतात. काही लोक त्यांचे बोलणे ऐकूण आपले निर्णय बदलतात. काही लोक थोडेसे प्रयत्न करुन हार मानतात. पण काही लोक असतात, जे कुणाचेही ऐकत नाही. कारण त्यांना त्यांच्या मेहनतीवर विश्वास असतो. असे लोकच आपले लक्ष्य प्राप्त करु शकतात.
No comments:
Post a Comment